माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 30 August 2019

गणितीय सामान्यज्ञान प्रश्नावली


 (१) एकशे म्हणजे किती  ?
---  १००

(२)  सव्वाशे म्हणजे किती  ?
---   १२५ 

(३) दीडशे म्हणजे किती  ?
---  १५०

(४) अडीचशे म्हणजे किती  ?
---  २५०

(५) साडेतीनशे म्हणजे किती  ?
---  ३५०

(६) पाऊणशे म्हणजे किती  ?
---  ७५

(७) पावणेदोनशे म्हणजे किती  ?
---  १७५

(८) पावणेतीनशे म्हणजे किती  ?
---  २७५

(९) पावणेनऊशे  म्हणजे किती  ?
---  ८७५

(१०) १०० चा पाव भाग म्हणजे किती  ?
---    २५

(११) १०० चा अर्धा भाग म्हणजे किती  ?
---    ५०

(१२) १०० चा पाऊण भाग म्हणजे किती  ?
---    ७५

(१३) शंभराच्या  (१००) दुप्पट म्हणजे किती  ?
---    दोनशे  (२००)

(१४) एक हजारच्या(१०००) अर्धा म्हणजे किती  ?
---    ५००

(१५) पन्नासच्या (५०) चौपट म्हणजे किती  ?
---  दोनशे  ( २०० )   /  ५०× ४ = २००

(१६) पन्नासच्या (५०) तिप्पट म्हणजे किती  ?
--- एकशे पन्नास (१५०)  /  ५०× ३ = १५०

============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
       पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
      ९४२२७३६७७५

Wednesday 28 August 2019

यांचे उपयोग सांगा पाहू.


  (१) लोहखनिजाचे उपयोग :--
---  लोहखनिजापासून लोखंड  व  पोलाद तयार
      करतात.
--------------------------------------------------

(२) अॅल्युमिनिअमचे उपयोग :--
---  अॅल्युमिनिअमपासून भांडी व विजेच्या तारा
     तयार करतात.
--------------------------------------------------

(३) चुनखडकाचा उपयोग  :-
---  चुनखडकाचा उपयोग चुना व सिमेंट तयार
      करण्यासाठी होतो.
--------------------------------------------------

(४) दगडी कोळशाचे उपयोग  :-
--- १. दगडी कोळशाचा उपयोग आगगाडी इंजिने,
     कारखाने, वीटभट्टया यांत इंधन म्हणून होतो.
   २. वीज निर्मिती करण्यासाठी दगडी कोळशाचा
      उपयोग होतो.
--------------------------------------------------

(५) खडकांचे उपयोग  :--
---  खडकांपासून दगड व खडी मिळते. त्यांचा
     उपयोग घरांच्या बांधकामासाठी व रस्ते तयार
     करण्यासाठी होतो.   --------------------------------------------------

(६) मिठाचे उपयोग  :--
---  १ .आपण अन्नात मीठ वापरतो. त्यामुळे अन्नाला
     चव येते. २. मासे टिकवण्यासाठी माशांना मीठ
     लावून ते खारवतात.  ३. लोणची टिकवण्यासाठी
     मिठाचा उपयोग होतो.
--------------------------------------------------

(७) तांबे धातूचा उपयोग :--
---  १. भांडी बनवण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो.
 २. विद्यतुवाहक तारा बनवण्यासाठी तांबे वापरतात.

--------------------------------------------------

(८) लाकडाचे उपयोग  :--
---  १. जळणासाठी लाकडाचा उपयोग होतो.
 २ इमारती बांधकामासाठी लाकडाचा उपयोग होतो.

==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
       पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

Tuesday 27 August 2019

आगगाडी,अग्निबाण,  सायकल,संगणक यांची वैज्ञानिक स्पष्टीकरणात माहिती

(१) आगगाडी --

--- आगगाडी हे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन
आहे. प्रवासी गाडी व मालवाहक गाडी असे
आगगाडीचे दोन प्रकार आहेत. आगगाडी अतिशय
जड वजन नेण्यास सक्षम असते. सुरूवातीला
आगगाडीत वाफेचे इंजिन वापरत असे. आता
इलेक्ट्रीक इंजिन व डिझेल इंजिन सुध्दा वापरात
आहे. बुलेट ट्रेन हा आगगाडीचा आधुनिक प्रकार
आहे. आगगाडी लोखंडापासून बनलेल्या रुळावरून
धावते.
----------------------------------------------------

(२) अग्निबाण --

---   अग्निबाणाच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह
अवकाशात सोडले जातात. अग्निबाणात अतिशय
ज्वलनशील इंधन ठासून भरले जाते. त्याचे ज्वलन
होतांना तो वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावतो.
अग्निबाणाचे प्रक्षेपण करतांना वेळेची उलट मोजणी
केली जाते व शून्य झाल्यास त्याचे प्रक्षेपण केलं
जाते. अवकाशात जाण्यासाठी आता आधुनिक
अग्निबाणांचा  वापर केला जातो.

--------------------------------------------------

(३) सायकल --

---  सायकल हे वाहतुकीचे तसेच खेळाचे दुचाकी
वाहन आहे.  सायकल हे शारीरिक शक्तीने चालते.
त्याला कुठल्याही  प्रकारच्या इंधनाची गरज नाही.
सायकलमुळे प्रदूषण होत नाही. सायकलने शारीरिक
व्यायाम होतो. आधुनिक सायकलचा शोध
स्काॅटलंडच्या मॅकमिलन नावाच्या लोहाराने लावला.

--------------------------------------------------

(४) संगणक --

---  संगणक हे एक यंत्र आहे.  सीपीयू , माऊस हे
त्याचे भाग आहे.  त्याला हार्डवेअर असे म्हणतात.
संगणकाची बुध्दी शुन्य आहे. तो बनविलेल्या
प्रोग्रामप्रमाणे काम करतो. त्याच्या मदतीने आपण
जलद गतीने आकडेमोड करू शकतो. त्यामध्ये
मोठ्या प्रमाणात माहिती साठविता येते. आज
प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर केल्या जातो.
भारताचा पहिला सुपर कम्प्युटर परम हा विजय
भटकर यांनी बनविला.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक )
            पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Monday 26 August 2019

 Rhyming  Words (-हायमिंग वर्डस )   यमक जुळणारे शब्द

(1) game   name  same   came
    
(2) band    hand    land     sand   

(3)  cold     gold     fold     told

(4) cake    take   make   lake

(5) cock    lock    rock    sock

(6)  mind   wind    find   kind

(7) rest   best   nest   test

(8) back   pack   sack   rack

(9) fast     cast     past    last

(10) mark   dark   park   bark

(11) nine   line   fine   pine

(12) rose   nose   tose   pose

(13) dear   near    hear   tear

(14) king   ring   sing   wing

(15) pick   lick   kick   tick

(16) seat   beat   heat   neat

(17)  pain   main   gain   vain

(18)  tent    sent   rent   went

(19)  duck   luck    tuck   buck

(20)  care   mare   hare   dare

============================
SHANKAR   SITARAM   CHAURE
Pimpalner (Dhule ) -- 9422736775

Sunday 25 August 2019

उपक्रम --परिसरातील प्राणी त्यांची वैशिष्ट्ये

● जवळच्या प्राणीसंग्रहालयास भेट द्या किंवा   तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांची यादी
करा व त्यांची वैशिष्ट्ये लिहा.

■ परिसरात आढळणारे प्राणी - त्यांची वैशिष्ट्ये -

(१)  कुत्री
---  कुत्रीला चार पाय, दोन कान, एक शेपूटअसते. कुत्री ही पिल्लांना जन्म देते. ती पाळीव प्राणी आहे. घराची राखण करण्याचे काम कुत्री करते. कुत्री भू भू असा आवाज करते.

--------------------------------------------------

(२) गाय --
---  गायीला चार पाय, दोन कान, एक शेपटी असते. गाय ही पा प्राणी आहे. ती पिल्लांना जन्म देते.    गायीपासून दूध मिळते. या दुधापासून अनेक 
दुग्धजन्य पदार्थ तयार होतात.  गाय हंबरते.

--------------------------------------------------

(३) मांजर --
--- मांजरीला दोन कान, चार पाय, एक शेपटी असते.
तिचे डोळे घारे असतात. तिचे खाद्य घरातील उंदीर
असते. घरातील दूधही तिचे आवडते खाद्य आहे.
मांजर म्यॅव  म्यॅव असा आवाज करते.

--------------------------------------------------

(४) गाढव --
---  गाढव हा खाली मान घालून सरळ चालणारा
प्राणी आहे. हा पाळीव प्राणी आहे. याचा उपयोग
कुंभार माती व ओझे वाहून आणण्यासाठी करतो.
गाढवाचा ओरडण्याचा आवाज विचित्र असतो.
गाढव ड्यॅचू ड्यूॅचू असा आवाज करून करून
ओरडतो.

--------------------------------------------------

(५) बकरी --
---  बकरी ही कळपाने राहणारा प्राणी आहे.
ही पाळीव प्राणी आहे.  यापासून दूध मिळते.
तिच्या विष्टेपासून खत तयार केले जाते. बकरी
बॅ बॅ असा आवाज करते.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा .शिक्षक)
         पिंपळनेर,  ता. साक्री,  जि. धुळे
         ९४२२७३६७७५

Friday 23 August 2019

शब्दाबद्दल शब्दसमूह (मराठी शब्द सौंदर्य )


(१) अजिंक्य --
---  ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा.

(२) अतुलनीय --
---  ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे.

(३)असाध्य --
---  जे साध्य होणार नाही असा.

(४) अपूर्व --
---  पूर्वी कधीही घडले नाही असे.

(५) अटळ --
---  न टाळता येणारे.

(६)आदिवासी --
---  अगदी पूर्वीपासून राहणारे.

(७) आस्तिक --
---  देव आहे असे मानणारा.

(८) उत्क्रांती --
---  हळूहळू घडून येणारा बदल.

(९) उदयोन्मुख --
---  उदयाला येत असलेला.

(१०) कर्तव्यदक्ष --
---  कर्तव्यात तत्पर असणारा.

(११) क्रांती --
---  कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल.

(१२) कृष्णपक्ष --
---   काळोख्या रात्रीचा पंधरवडा.

(१३) पुरोगामी --
---  आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा.

(१४) मितभाषी --
---   मोजकेच बोलणारा.

(१५) शाश्वत --
---   कायम टिकणारे.

(१६) शुक्लपक्ष --
---   चांदणे असलेला पंधरवडा.

(१७) हुतात्मा --
देशासाठी /समाजासाठी आपले प्राण अर्पण करणारा .

(१८) सुभाषित --
---   बोधवचन.

(१९) स्वच्छंदी --
---   स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैरपणे वागणारा.

(२०) पूरग्रस्त --
---   पूरांमुळे नुकसान झालेले लोक.

(२१) नास्तिक --
---   ईश्वर नाही असे मानणारा.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
           पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Wednesday 21 August 2019

म्हणजे काय ? (भौगोलिक थोडक्यात माहिती )

(१) ऋतु  :-
-- बदलत्या हवेनुसार आपल्याकडे वर्षाचे तीन भाग पडतात, त्यांना ऋतू म्हणतात.

(२) ऋतुचक्र :-
-- उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु
एकामागून एक येत राहतात. ऋतूंच्या या बदलास ऋतुचक्र म्हणतात.

(३) हवामान  :-
-- हवेतील उष्णता, थंडी, दमटपणा, कोरडेपणा, त्याचप्रमाणे ऊन, वारा, ढग, पाऊस या सर्व घटकांचा विचार करून एखाद्या ठिकाणच्या हवेची एकूण परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणचे हवामान होय.

(४) सम हवामान :-
-- एखाद्या ठिकाणी उन्हाळ्यात फार उष्णता नसते व हिवाळ्यात खूप थंडी नसते, हवामानाच्या अशा
स्थितीत सम हवामान म्हणतात.

(५) विषम हवामान  :-
-- एखाद्या ठिकाणी उन्हाळ्यात खूप उष्णता असते व हिवाळ्यात खूप थंडी असते, हवामानाच्या अशा स्थितीस विषम हवामान म्हणतात.

(६) दमट हवा :-
--- ज्या हवेत बाष्प जास्त असते, अशा हवेस दमट हवा म्हणतात.
    

(७) कोरडी हवा  :-
---  ज्या हवेत बाष्प कमी असते, अशा हवेस कोरडी हवा म्हणतात.

(८) बाष्पीभवन :--
---  सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ (बाष्प ) होते,
      या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात. 

(९) जलचक्र  :--
---  सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ
होते. ती वाफ हवेमध्ये मिसळते. अशी बाष्प
असलेली हवा वर गेल्यावर थंड होऊन तिचे ढग तयार होतात. त्या ढगांपासून पाऊस पडतो. पावसाचे जे पाणी जमिनीच्या उतारावरून वाहते, त्यातील काही पाणी नदीतून वाहत जाऊन परत समुद्राला मिळते. या पाण्याची पुन्हा वाफ होते. अशी क्रिया सतत होत असते, या क्रियेला जलचक्र म्हणतात.
==============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            पिंपळनेर ता. साक्री,  जि. धुळे
            ९४२२७३६७७५
    

Monday 19 August 2019

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) कळ लावणे
--- भांडण लावणे.

(२) आहुती देणे.
---  बलिदान देणे.

(३) उत्तेजन देणे.
---  प्रोत्साहन देणे.

(४) हुलकावणी देणे.
---  फसवणे.  / चकवणे.

(५) हात जोडणे.
---  नम्रपणे विनंती करणे.

(६) सैरावैरा पळणे.
---  वाट मिळेल तिकडे पळणे.

(७) वाहवा करणे.
---  स्तुती करणे.  / कौतुक करणे.

(८) वचपा काढणे.
---  बदला घेणे.  / सूड घेणे.

(९) बाजी मारणे.
---  विजयी होणे.  / यशस्वी होणे.

(१०) नष्ट करणे.
---    नाहीसे करणे.

(११) धडकी भरणे.
---    खूप भीती वाटणे.

(१२) नाराज होणे.
---    निराश होणे.

(१३) दिवस फिरणे.
---   वाईट दिवस येणे.

(१४) झुंबड उडणे.
---    गर्दी होणे.

(१५) चेहरा खुलणे.
---    आनंद होणे.

(१६) कान टवकारणे.
---   सावध होणे.

(१७) नवल वाटणे.
---    आश्चर्य वाटणे. / चकित होणे.

(१९) पाय धरणे.
---    माफी मागणे.  / शरण जाणे.

(२०) उदरनिर्वाह करणे.
---    पोट भरणे.
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा.शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री,  जि. धुळे
            ९४२२७३६७७५

Friday 16 August 2019

भौगोलिक सामान्यज्ञान

     (१) देशातील पहिले मातीचे धरण कोठे आहे ?

---  गंगापूर  (नाशिक - महाराष्ट्र )
--------------------------------------------------

(२) महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?

--- नंदुरबार
--------------------------------------------------

(३) महाराष्ट्रातील सोने शुध्दीकरण कारखाना कोठे आहे  ?

---  शिरपूर  (धुळे )
--------------------------------------------------

(४)सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रात कोणत्या  जिल्ह्य़ात आहेत  ?

---  अहमदनगर
--------------------------------------------------

(५)हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे  ?

---  उत्तर
--------------------------------------------------

(६) हिंदी महासागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे  ?

---  दक्षिण
--------------------------------------------------

(७)अरबी समुद्र भारताच्या कोणत्या दिशेला आहे  ?

---  पश्चिम
--------------------------------------------------

(८) भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत  ?

---  ७ (सात )
--------------------------------------------------

(९)महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती  ?

---  तापी

--------------------------------------------------

(१०) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते  ?

---  कळसूबाई
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर,  ता. साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Wednesday 14 August 2019

भारतातील विशेष (सामान्यज्ञान )

(१) भारताचे राष्ट्रगीत -- जन गण मन

(२) भारताचा राष्ट्रीय प्राणी -- वाघ

(३) भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर

(४) भारताचा राष्ट्रीय खेळ -- हाॅकी

(५) भारताचे राष्ट्रीय फूल -- कमळ

(६) भारताची राष्ट्रीय भाषा -- हिंदी

(७) भारताची राष्ट्रीय लिपी -- देवनागरी

(८) भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य -सत्यमेव जयते.

(९) भारताचा राष्ट्रीय वृक्ष -- वड

(१०) भारताचे राष्ट्रीय फळ -- आंबा

(११) भारताचे सर्वोच्च पद -- राष्ट्रपती

(१२) भारताचे सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र

(१३) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न

(१४) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी -- डॉल्फिन
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
              पिंपळनेर , ता. साक्री, जि. धुळे
              ९४२२७३६७७५

Tuesday 13 August 2019

CHILD   ACTIVITY( चाईल्ड  अॅक्टीविटी)          लहान मुलांची कृती


(1) Smile  -- स्माईल - स्मित हास्य करा.

(2)Laugh laudly -- लाॅफ लाॅउडली - मोठ्याने हसा.

(3) Shout -- शाऊट  -- ओरडा.

( 4) Take out the book -- टेक आऊट द बूक -
पुस्तक काढा.

(5)Open  the book -- ओपन द बुक -पुस्तक उघडा.

(6) Turn the page -- टर्न द पेज - पान पलटा.

(7) Read  book.-- रीड बुक - पुस्तक वाचा.

( 8 ) Read  silently -- रीड साइलन्टली - शांतपणे वाचा.

(9) Close the book -- क्लोज द बुक - पुस्तक बद करा.

(10) Clap.  क्लॅप  -- टाळी वाजवा.

(11) Stand.  -- स्टॅन्ड  -- उभे राहा.

(12) Jump.  -- जम्प   -- उडी मारा.

(13)Make  a queue -- मेक अ क्यू - रांग बनवा.

(14)Turn  the  left -- टर्न द लेफ्ट - डावीकडे वळा.

(15) Come to the front -- कम टु द फ्रण्ट -
समोर या.

(16)Stop  talking -- स्टाॅप टाॅकिंग - बोलणे थांबवा.

(17) Hands  up -- हॅण्डस अप - हात वर करा.

( 18 ) Hands  down -- हॅण्डस डाऊन - हात खाली करा.

(19  ) Sing  a Song -- सिंग अ  साॅग - गाणे गा.

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
            9422736775

Monday 12 August 2019

गणितीय प्रश्नावली

        
(१) १ वही तयार करण्यास १०० कागद लागतात;
     तर १२०० कागदांच्या किती वह्या तयार
     होतील ?

---  १२ वह्या.
---------------------------------------------------

(२) ६ खुर्च्यांची किंमत ३००० रूपये आहे; तर
      अशा २ डझन  खुर्च्यांची किंमत किती  ?

--- १२०००  रुपये.
---------------------------------------------------

(३) सुप्रियाकडे  ८०० फुले आहेत. प्रत्येक हारात
     २० फुले, याप्रमाणे किती हार तयार होतील,
     किती फुले उरतील  ?

---  ४० हार तयार होतील.
---------------------------------------------------

(४) २००० रूपये देऊन  १० रूपयांच्या
    जास्तीत जास्त किती नोटा मिळतील  ?

--- २०० नोटा मिळतील.
---------------------------------------------------

(५)  प्रत्येक रांगेत १० रोपे, अशा १०० रांगांत
      किती रोपे  ?

---  १००० रोपे.
---------------------------------------------------

(६) सव्वापाच हजार व पावणेदोन हजार यांची
      बेरीज किती  ?

---  ७०००
---------------------------------------------------

(७) १ ते १५  या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या
     सम संख्यांची बेरीज किती  ?

---  ५६
---------------------------------------------------

(८) एका आठवड्याचे ७ दिवस तर २५
     आठवड्याचे दिवस किती  ?

---  १७५ दिवस
---------------------------------------------------

(९) ६ वर्षे म्हणजे किती महिने  ?

--- ७२ महिने
---------------------------------------------------

(१०) चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती  ?

---  ९९९९

============================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Sunday 11 August 2019

मराठी - हिंदी - इंग्रजी शब्द शिकूया  !


मराठी   =   हिंदी     =  इंग्रजी

मांजर  --  बिल्ली  -- कॅट (cat )
उंदीर   --  चुहा    --  रॅट  (rat )
झोपडी  --  कुटी  -- हट  ( hut )
जाळी  -- जाली   --   नेट  (net )
मुंगी   --  चिट्टी    --  अॅण्ट (ant )
हृदय  -- दिल     -- हार्ट  (heart)

माणूस  -- आदमी  - मॅन (man)
लेखणी  -- कलम  - पेन  (pen )
दहा       --  दस     - टेन  (ten)
कोंबडी   -- मुर्गी    - हेन ( hen)
सूर्य     --  सुरज   -- सन  (sun)

सिंह  --     शेर    -- लायन  (lion)
चंद्र    --   चाँद   -- मून  (moon)
मुलगा  -- बेटा  -- सन  (son)
कातडी  --चमडी  -- स्किन  (skin)
हाड     -- हड्डी     -- बोन  (bone)

पोपट  -- तोता  -- पॅरट   parrot)
खिसा  -- जेब  -- पाॅकेट  (pocket)
पाऊल  -- पैर   -- फुट  (foot)
ससा    -- खरगोश  -- रॅबिट (rabbit)

समुद्र  - सागर   -- सी  (sea)
चहा   - चाय     - टी  (tea )
मटार -- मटर   -- पी  (pea)
मधमाशी  -- मधुमक्खी  -- बी (bee )

केस   --  बाल   - हेयर  (hair)
बहिण  -- बहन  -- सिस्टर  (sister)
आई  --  माता   -- मदर  (mother)
वडिल  -- बाप  -- फादर  (father)
भाऊ   -- भाई  -- ब्रदर  (brother)

हरिण   -- हिरन  -- डिअर  (dee )
अश्रू   -- आँसू     -- टिअर (tear)
वाघ   -- बाघ     -- टाइगर  (tiger)
कागद  -- कागज  -- पेपर  (paper )
साखर  -- चीनी   -- शुगर  (Sugar)

गाढव  -- गधा  -- डाॅकी ( donkey)
माकड  - बंदर  -- मंकी (monkey)
किल्ली  -- चाबी  -- की  (Key)

डोके  - शिर   -- हेड  (head )
हात  -- हाथ   --  हैण्ड  ( hand )
लाकूड -- लकडी  -- वूड  ( wood )
रक्त     -- खून   -- ब्लड  (blood )

कुलूप  -- ताला  --  लाॅक  ( lock )
कोंबडा  -- मुर्गा  -- काॅक  (cock )
पुस्तक  -- किताब  --  बुक  (book )
मान  -- गर्दन  -- नेक  ( neck )

बाहुली -- गुडीया  -- डाॅल  (doll )
चेंडू  -- गेंद  -- बाॅल  (ball )
भिंत  --  दीवार  -- वाल  (wall )
उंच  - उचा  -- टाॅल  (tall)

नळ   --  नल   -- टॅप  ( tap )
साबण   -- साबुन  -- सोप  (soap )
डोळा  -- आँख    -- आय  (eye)
रडणे  -- रोना    -- क्राय  (cry)
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
       पिंपळनेर ता. साक्री,  जि. धुळे
       ९४२२७३६७७५

Wednesday 7 August 2019

OPPOSITE  WORDS (विरूद्धर्थी शब्द)

(1) go  ×  come
(2)  give  × take
(3) push  ×  pull
(4) throw  ×  catch
(5) show   ×  hide
(6) start   ×  end
(7) work   ×  rest
(8)  sleep   ×  awake
(9) little   ×  big
(10) different  ×  same
(11) sad   ×  happy
(12) clean  ×  dirty
(13) good  ×  bad
(14) rich  ×  poor
(15) long  ×  short
(16)  heavy  × light
(17) light   ×  dark
(19) right  × left
(20) small   ×  big
(21) now   ×  then
(22) up   ×  down
(23) inside   ×  outside
(24) right  ×  wrong
(25) slowly  ×  fastly
(26) day   ×  night
(27) here   ×  there
(28) today  ×  yesterday
(29) sell   ×  buy
(30) open  ×  close
(31) stop   ×  start
(32) cold   ×  hot
(33) in   ×  out
(34) off   ×  on
(35) kind   ×  cruel

Friday 2 August 2019

Answer  the following questions about you.


 ● तुमच्याबद्दल प्रश्नांची उत्तरे द्या .

(1) What is your full name  ?

--- Sumit  Shankar  Chaure

---------------------------------------------------
(2) What subjects do you like  ?

---  English and Maths.

---------------------------------------------------
(3) What  games do you play  ?

--- I play football and cricket.

---------------------------------------------------
(4) What's your favourite dish  ?

--- Rasagulla.

---------------------------------------------------
(5) What is your favourite  colour  ?

---  Sky - blue.

---------------------------------------------------
(6) What is your favourite game  ?

--- Chess

---------------------------------------------------
(7) What  is  your favourite player  ?

---  Vishwanathan  Anand

---------------------------------------------------
(8) What is  your hobby  ?

--- Painting

---------------------------------------------------
(9) When is your birthday  ?

--- 31st January.

---------------------------------------------------
(10) What is your favourite movie  ?

---  ' Tarre  Jamin  Par '.

============================
 SHANKAR  SITARAM  CHAURE
PIMPALNER  TAL.  SAKRI
DIST -DHULE - 9422736775

Thursday 1 August 2019

माहित आहे का तुम्हांला  ?

(१) जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना
आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता
यावेत, म्हणून २१ सप्टेंबर हा दिवस संयुक्त
राष्ट्रांतर्फ  ' आंतरराष्ट्रीय शांतता दिन ' म्हणून
जगभर साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त
राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात,
स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता घंटा
वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली
जाते.  सुमारे ६० देशांतील लोकांनी दिलेल्या
नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आली आहे.

--------------------------------------------------

(२) सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युतनिर्मिती
करणाऱ्या बॅटरीही असतात. त्यांना  " सौरघट "
म्हणतात.
  सूर्याची उष्णता, वाहते वारे  हे कधीही न संपणारे
आहेत. त्यांच्यापासून वीजनिर्मिती केल्यास प्रदूषण
होत नाही, परंतु या पध्दती खूप महाग आहेत;
मात्र कुठल्याही पध्दतीने वीजनिर्मिती करण्यासाठी
पर्यावरणातील साधनांचा वापर होतो. याशिवाय
खर्च हा येतोच. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या
ऊर्जेचा वापर कमीत कमी प्रमाणात करण्याची
सवय होणे हे आजच्या जगात गरजेचे आहे.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            पिंपळनेर ता. साक्री,  जि. धुळे
             ९४२२७३६७७५