माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 30 July 2020

भौगोलिक सामान्यज्ञान प्रश्नावली ( एका शब्दात उत्तरे )


● प्रश्नांची प्रत्येकी एका शब्दात उत्तरे सांगा.

(१) साठ सेकंदाचा कालावधी.


उतर -- मिनिट
-----------------------------------------------
(२) साठ मिनिटांचा कालावधी.

उत्तर -- तास
-----------------------------------------------
(३) चोवीस तासांचा कालावधी.

उतर -- दिवस
-----------------------------------------------
(४) सात दिवसांचा कालावधी.

उतर -- आठवडा
-----------------------------------------------
(५) पंधरा दिवसांचा कालावधी.

उतर -- पंधरवाडा
-----------------------------------------------
(६) तीस दिवसांचा कालावधी.

उतर -- महिना
-----------------------------------------------
(७) बारा महिन्याचा कालावधी.

उतर -- वर्ष
-----------------------------------------------
(८) लुकलुकणा-या चांदण्या.

उतर -- तारे
-----------------------------------------------
(९) चंद्राचा प्रकाश.

उतर -- चांदणे
-----------------------------------------------
(१०) ग्रेगरियन (इंग्रजी) वर्षाचे महिने.

उत्तर -- बारा
-----------------------------------------------
(११) एका सप्ताहाचे दिवस.

उत्तर -- सात
-----------------------------------------------
(१२) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तचा काल.

उत्तर -- दिन
-----------------------------------------------
(१३) सूर्यास्तापासून सूर्योदयापर्य॔तचा काल.

उतर -- रात्र
-----------------------------------------------
(१४) नैसर्गिक सपाट जमिन.

उतर -- मैदान
-----------------------------------------------
(१५) मुख्य ॠतू.

उतर -- तीन
------------------------------------------------
(१६) पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्तोत्र.

उतर -- पाऊस
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 28 July 2020

शब्द जोड्या ( शब्द उच्चारातील फरक )


कण -- खण

कप -- खप
गर -- घर
गण -- घण
गड -- घड
जळ -- झळ
टक -- ठक
दर -- धर
पळ -- फळ
बट -- भट
नल -- नळ
बल -- बळ
सण -- सन
मण -- मन
कडा -- खडा
काठ -- खाट
गार -- घार
गाव -- घाव
चाप -- छाप
चावा -- छावा
जगा -- झगा
जाड -- झाड
तवा -- थवा
ताट -- थाट
ताप -- थाप
सात -- साथ
दार -- धार
पळा -- फळा
माप -- माफ
साप -- साफ
पार -- फार
काल -- काळ
चाल -- चाळ
माल -- माळ
गाल -- गाळ
शाप -- साप
माशा -- मासा
कडी -- खडी
कळी -- खळी
गडी -- घडी
कडी -- कढी
दीर -- धीर
बाजी -- भाजी
कुळ -- खुळ
दूर -- धूर
केळ -- खेळ
वेल -- वेळ
वेश -- वेस
देव -- वेष
गोट -- घोट
टोक -- ठोक
डोल -- ढोल
कोण -- कोन
घोष -- घोस
कोष -- कोस
गोटा -- घोटा
संत -- संथ
बाई -- भाई
कडक -- खडक
पडके -- फडके
कळकळ -- खळखळ
चमचम -- छमछम
चणचण -- छणछण
तडतड -- थडथड
बडबड -- भडभड
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


Monday 27 July 2020

म्हणी (आदिवासी कोकणी भाषामं)


(१) ढेकूण माराला, कु-हाड नोको.


(२) चार दिवस सासुसना , चार ओहूसना.

(३) बहास तश्या पोसा.

(४) चोरन्या वाटा, चोरलाच माहित.

(५) जश्या करशाल, तश्या भरशाल.

(६) तण खा धन.

(७) खात नही, तो देवला निवद.

(८) पाच बोटा, सारखा नही.

(९) पिक तठ, ईकात नही.

(१०)सावठा खावाना नि मसानमं जावाना.

(११) मनमं मांडा, पदरमं धोंडा.

(१२ ) धाकला मूय, मोठा घास.
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा शिक्षक)
काकरपाडा (चौपाळे) ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

Friday 24 July 2020

भारतातील प्रमुख स्थळे / शहरे व त्यांची प्रसिद्धी


(१) दार्जिलिंग


--- पश्चिम बंगाल मधील चहाचे मळे असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे.

(२) गंगोत्री
--- उत्तराखंड राज्यातील गंगा नदीचा उगम स्थान असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे.

(३) नालंदा
--- बिहार राज्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. प्राचीन बौध्द विद्यापीठाचे स्थान आहे.

(४) अजमेर
--- राजस्थान राज्यात सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांची कबर व दर्गा आहे.

(५) कटक
--- ओडिशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान आहे.

(६) कोहिमा
--- नागालँडची राज्याची राजधानी असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे.

(७) आगरतळा
--- त्रिपुरा राज्याची राजधानी असलेले ठिकाण. शुभ्र उज्जयंता पॅलेस आहे.

(८) अहमदाबाद
--- साबरमती आश्रम असलेले गुजरात राज्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे.

(९) ऐजवाल
--- मिझोराम राज्याची राजधानी असलेले डोंगर  
उतावरील सुंदर गाव आहे. 

(१०) गांधीनगर
--- गुजरात राज्याची राजधानी आहे. या ठिकाणी अक्षरधाम मंदिर आहे.
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 23 July 2020

मराठी भाषा --- यमक शब्द जोड्या.


● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. 

१) नंदन -- वंदन चंदन बंधन 

२) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती 

३) धनवान -- बलवान भगवान  विद्वान

४) कमाई -- मिठाई शिलाई लढाई 

५) टाकाऊ -- विकाऊ शिकाऊ जळाऊ 

६) तेलकट -- मातकट धुरकट मळकट 

७) खेळकर -- खोडकर प्रभाकर विणकर

८) शेतकरी -- गावकरी मानकरी भाडेकरी 

९) कलाकार -- सावकार चित्रकार शिल्पकार 

१०) फाटकी -- शेतकी मोडकी  गावकी

११) भांडखोर -- चिडखोर दरोडेखोर चहाडखोर

१२) जाणार -- करणार धावणार मिळणार

१३) लहानपण -- बालपण दडपण मोठेपण 

१४) लहानपणा -- शहाणपणा कमीपणा मोठेपणा 

१५) भाजीवाला -- पाववाला दूधवाला मसालेवाला

१६) वर्षभर -- वीतभर टोपलीभर दिवसभर 

१७) काळसर -- ओलसर लालसर गोडसर 

१८)कामगार --   रोजगार गुन्हेगार  किमयागार

१९) दुकानदार -- साथीदार धारदार फौजदार 

२०) कारखाना -- दवाखाना तोफखाना हत्तीखाना. 
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड 
ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७६

Wednesday 22 July 2020

बडबड गाना ( आदिवासी कोकणी भाषामं )

ड ड डबडा
त त तंगडा
ग ग गधडा
प प पयडा
ड ड डफडा
गा गा गाडा
ना ना नाडा
ता ता तागडा
भा भा भातडा
ला ला लाकडा
वा वा वाकडा
सा सा सापडा
ई ई ईसडा
के के केकडा
धा धा धाबडा
का का कातडा
सू सू सूपडा
टु टु टुकडा
लि लि लिमडा
पि पि पिसूडा
शे शे शेकडा
टे टे टेकडा
से से सेअडा
भे भे भेंडा
गो गो गोंडा
घो घो घोंगडा
सो सो सोबडा
डो डो डोबडा
दौ दौ दौडा
==============================
लेखक / कवी :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
काकरपाडा (चौपाळे ) ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Opposite Words (आॅपोझीट वर्डस ) विरूध्दार्थी शब्द


1) cold (कॉल्ड ) × hot (हाॅट )


2) cry ( क्राय ) × laugh ( लाफ )

3) dry ( ड्राय ) × wet ( वेट )

4) end (एंड ) × start ( स्टार्ट )

5) empty ( एम्टी ) × full ( फुल )

6) fast (फास्ट ) × slow ( स्लो )

7) fat ( फॅट ) × thin ( थीन )

8) first ( फर्स्ट) × last ( लास्ट)

9) gain ( गेन ) × loss ( लाॅस )

10) give ( गिव ) × take ( टेक )

11) hard ( हार्ड) × soft ( साॅफ्ट )

12) high (हाय ) × low ( लो)

13) young ( यंग) × old (ओल्ड)

14) wild (वाईल्ड) × tame ( टेम)

15) true ( ट्रू ) × false ( फाॅल्स)

16) tall ( टाॅल) × short ( शाॅर्ट )

17) sweet ( स्वीट) × bitter ( बिटर)

18) quick ( क्वीक ) × slow ( स्लो )

19) pull ( पुल ) × push ( पुश )

20) poor ( पुअर) × rich ( रिच )

21) plus ( प्लस ) × minus ( मायनस)

22) pass ( पास) × fail ( फेल )

23) out ( आऊट) × in ( इन )

24) oral (ओरल) × written (रीटन)

25) open ( ओपन) × close ( क्लोज )

26) now ( नाऊ) × then ( देन)

27) no ( नो) × yes ( यस )

28) rise ( राईज ) × set ( सेट )

29) left ( लेफ्ट ) × right ( राईट )

30) day ( डे ) × night ( नाईट )
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

सामान्यज्ञान -- महाराष्ट्र

 
१) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण -- नंदुरबार

२) चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा -- सोलापूर
३) पन्हाळा किल्ला -- कोल्हापूर
४) कळसुबाई शिखर -- अहमदनगर
५) अर्नाळा किल्ला -- पालघर
६) शिरीषकुमार स्मारक -- नंदुरबार
७) महाराष्ट्राची उपराजधानी -- नागपूर
८) प्रसिद्ध वीडी उद्योग ठिकाण -- संगमनेर
९) महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा -- कोल्हापूर
१०) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण -- गंगापूर
११) महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव --भिलार
१२) रंकाळ तलाव -- कोल्हापूर
१३) गोदावरी नदीचा उगम -- त्र्यंबकेश्वर
१४) संत्री फळासाठी प्रसिद्ध जिल्हा -- नागपूर
१५) अस्तंभा शिखर -- नंदुरबार
१६) बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर -- लोणार
१७) पेंच राष्ट्रीय उद्यान -- नागपूर
१८) राधानगरी जलविद्युत प्रकल्प -- कोल्हापूर
१९) भीमा नदीच्या काठावरील शहर -- पंढरपूर
२०) विशाळगड किल्ला -- कोल्हापूर
================================
संकलक :-, शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 20 July 2020

चला आपण भूरूपांची माहिती घेऊया !


● भूरूपे म्हणजे काय ?

उत्तर -- उंचवटा व खोलगटपणा यांमुळे

तयार होणारे जमिनीचे विविध आकार, म्हणजे ' भूरूपे ' होत. 
-------------------------------------
● भूरूपे सांगा ?

---- मैदान, टेकडी, पठार, डोंगर, दरी, खिंड, पर्वत, शिखर.
------------------------------------------
(१) मैदान कशास म्हणतात ?

उत्तर -- नैसर्गिक सपाट जमिनीस मैदान म्हणतात.
-------------------------------------------------------
(२) टेकडी म्हणजे काय ?

उत्तर -- जमिनीवरील उंचवट्याचा भाग म्हणजे टेकडी होय.
-------------------------------------------------------
(३) पठार म्हणजे काय ?

उत्तर -- उंचावरील सपाट प्रदेश म्हणजे पठार होय.
-------------------------------------------------------
(४) डोंगर म्हणजे काय ?

उत्तर -- उंच टेकडीला डोंगर म्हणतात.
-------------------------------------------------------
(५) दरी म्हणजे काय ?

उत्तर -- डोंगरातील खूप खोल व लांबट भागास दरी म्हणतात.
-------------------------------------------------------
(६) खिंड म्हणजे काय ?

उत्तर -- दोन डोंगरातील अथवा पर्वतांतील खोलगट अरूंद भागास खिंड म्हणतात.
-------------------------------------------------------
(७) पर्वत म्हणजे काय ?

उत्तर -- उंच डोंगरांना पर्वत म्हणतात.
-------------------------------------------------------
(८) शिखर म्हणजे काय ?

उत्तर -- पर्वताचे निमुळते टोक म्हणजे शिखर होय.
-------------------------------------------------------
(९) डोंगररांगा म्हणजे काय ?

उत्तर -- जे डोंगर लांबवर पसलेले असतात, त्यांना डोंगररांगा म्हणतात.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 19 July 2020

मराठी -- निबंध लेखन ( १. पावसाळा / २. मोर )


(१) पावसाळा

पावसाळा ऋतू मला आवडतो. पावसामुळे सर्व
सृष्टी हिरवीगार होते. पाऊस पडला की नदी, नाले,
ओढे वाहू लागतात. झाडे पाण्याने आंघोळ करतात.
पशुपक्ष्यांना आनंद होतो. पाऊस पडला की शेतक-याला
आनंद होतो. पावसामुळे शेतात धान्य पिकते.
पशुपक्ष्यांना, माणसांना व सर्व निसर्गाला पाण्याची
खूप गरज असते. पावसामुळे पृथ्वीवरील जीवन सुरू
आहे. पाऊस नसेल, तर सर्व सृष्टी उजाड व भकास
होईल. म्हणुनच पाण्याला ' जीवन ' म्हटले आहे.
मला पावसात भिजायला खूप आवडते.
================================

(२) माझा आवडता पक्षी -- मोर

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. सर्व पक्ष्यांमध्ये
मला मोर खूप आवडतो. मोराचा पिसारा डौलदार असतो. मोराच्या पिसा-यातील हिरवा व निळा रंग
खुलून दिसतो. मोराच्या डोक्यावर ऐटबाज तुरा असतो.
आकाशात काळे पावसाळी ढग दाटून आले की मोर
रानामध्ये थुई थुई नाचू लागतो. त्यावेळी तो त्याचा
पिसारा फुलवून नाचतो. नाचताना मोर खूप सुंदर दिसतो.
पावसाळी ढगांकडे पाहून मोर आनंदाने ओरडतो.
असा हा दिमाखदार पक्षी मला फार आवडतो.
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday 17 July 2020

समूहदर्शक शब्द ( प्रश्नावली )


(१) भारा कशाचा ? -- गवताचा

(२) तांडा कोणाचा ? -- उंटांचा
(३) गुच्छ कशाचा ? -- फुलांचा
(४) घड कशाचा ? -- 
केळयांचा 

(५) जाळी कशाची ? -- करवंदांची
(६) पेंढी कशाची ? -- गवताची
(७) उत्तरंड कशाची ? -- मडक्यांची
(८) मोळी कशाची ? -- लाकडांची

(९) कळप कोणाचा ? -- हरणांचा
(१०) ताफा कशाचा ? -- विमानांचा
(११) संच कशाचा ? -- वस्तूंचा
(१२) चवड कशांची ? -- भाक-यांची

(१३) जुडगा कशांचा ? -- किल्ल्यांचा
(१४) काफिला कशांचा ? -- जहाजांचा
(१५) ढीग कशाचा ? -- नारळांचा
(१६) जुडी कशाची ? -- पालेभाज्यांची

(१७) जथा कोणाचा ? -- साधूंचा
(१८) कुंज कशांचा ? -- वेलींचा
(१९) कळप कोणाचा ? -- मेंढ्यांचा
(२०) संघ कोणाचा ? -- खेळाडूंचा

(२१) थवा कुणाचा ? -- पक्ष्यांचा
(२२) वृंद कशाचा ? -- वाद्यांचा
(२३) पुंज कशाचा ? -- तारकांचा
(२४) झुबका कशाचा ? -- केसांचा
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

बडबड गाना (आदिवासी कोकणी भाषामं )


अ अ अठ
त त तठ
क क कंग
त त तंग
आ आ आया

ब ब बया
ख ख खळा
इ इ इळा
ई ई ईज
नि नि निज
इ इ इवन
ल ल लवन
इ इ इचू
चि चि चिचू
म म मडका
फ फ फडका
पो पो पोसा
डो डो डोसा
पो पो पोसी
डो डो डोसी
============================
लेखक / कवि :- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 16 July 2020

जगातील प्रमुख देश व राजधान्या ( प्रश्नावली )

(१) पाकिस्तान या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर -- इस्लामाबाद


(२) न्यूझीलंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- वेलींग्टन


(३) भारत या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- दिल्ली


(४) चीन या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बिजींग


(५) जपान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- टोकिओ


(६) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- काठमांडू


(७) बांग्लादेश या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- ढाका


(८) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर - वाॅशिंग्टन


(९) इंग्लंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- लंडन


(१०) रशिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- माॅस्को


(११) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बर्लिन


(१२) इटली या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- रोम


(१३) केनिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- नैरोबी


(१४) इंडोनेशिया या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- जकार्ता


(१५) थायलंड या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- बँकाॅक


(१६) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- पॅरीस


(१७) कॅनडा या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- ओटावा


(१८) अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर --- काबुल


(१९) इस्त्राईल या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- जेरूसलेम


(२०) सिंगापूर या देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- सिंगापूर
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 15 July 2020

शब्द सोबती ( समानार्थी शब्द )


लता म्हणजे वेल

पुष्प म्हणजे फूल
झोक म्हणजे कल

आश्चर्य म्हणजे नवल
पर्वत म्हणजे अचल
भ्रमण म्हणजे सहल
ऐट म्हणजे डौल
रिवाज म्हणजे चाल
नीर म्हणजे जल
अरण्य म्हणजे जंगल
अग्नी म्हणजे अनल
कपाळ म्हणजे भाल
सुखरूप म्हणजे कुशल
विस्तीर्ण म्हणजे विशाल
गिरी म्हणजे शैल
सैन्य म्हणजे दल
पिता म्हणजे वडील
पवन म्हणजे अनिल
पाणी म्हणजे सलिल
थंड म्हणजे शीतल
दुर्जन म्हणजे खल
पंक म्हणजे चिखल
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 13 July 2020

ADJECTIVE ( अॅडजेक्टीव्ह ) -- विशेषणे


Small -- स्माॅल -- लहान

Nice -- नाईस -- छान
Hard -- हार्ड -- कठीण
Great -- ग्रेट -- महान
New -- न्यू -- नवीन
Young -- यंग -- तरूण
Up -- अप -- वर
Far -- फार -- दूर
Brave -- ब्रेव्ह -- शूर
Late -- लेट -- उशीर
Dark -- डार्क -- अंधार
Beautiful -- ब्यूटिफुल -- सुंदर
Early -- अर्ली -- लवकर
Clever -- क्लिव्हर -- हुशार
Near -- निअर -- जवळ
Many -- मेनी -- पुष्कळ
Active -- अॅक्टीव्ह -- चपळ
Noisy -- नाॅइझी -- गोंधळ
Sweet -- स्वीट -- गोड
Cold -- कोल्ड -- थंड
Big -- बीग -- मोठा
Good -- गूड -- चांगला
Tall -- टाॅल -- उंच
Fast -- फास्ट -- जलद
Slow -- स्लो -- सावकाश
Rich -- रिच -- श्रीमंत
Kind -- काइंड -- दयाळू
Poor -- पुअर -- गरीब
Blue -- ब्लू -- निळा
Dry -- ड्राय -- कोरडे
Dirty -- डर्टी -- घाणरडे
Red -- रेड -- लाल
White -- व्हाइट -- पांढरा
Fat -- फॅट -- लठ्ठ
Sad -- सॅड -- दुःख
Easy -- ईझी -- सोपे
Happy -- हॅप्पी -- आनंदी
Lazy -- लेझी -- आळशी
Bad -- बॅड -- वाईट
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
9422736775

प्रश्न पढो और उत्तर लिखो । (विषय -- हिंदी )

(१) बालदिन कब मनाया जाता हैं ?

उत्तर -- १४ नवंबर
---------------------------------------
(२) महाराष्ट्र की राजधानी कौन सी हैं ?

उत्तर -- मुंबई
----------------------------------------
(३) भारत के प्रथम राष्ट्रपति कौन थे ?

उत्तर -- डाँ . राजेंद्रप्रसाद
-------------------------------------------------------
(४) ' वनस्पतियाँ सजीव होती हैं ' इसे किसने सिद्ध
किया ?

उत्तर -- जगदीशचंद्र बोस
-------------------------------------------------------
(५) फलों का राजा कौन हैं ?

उत्तर -- आम
-------------------------------------------------------
(६) ' हिंदी दिवस ' कब मनाया जाता है ?

उत्तर -- चौदह सितंबर
-------------------------------------------------------
(७) जायकवाडी बाँध कहाँ हैं ?

उत्तर -- पैठण में गोदावरी नदी पर हैं ।
-------------------------------------------------------
(८) जायकवाडी बाँध के विशाल जलाशय को क्या कहते हैं ?
उत्तर -- नाथ सागर
-------------------------------------------------------
(९) न्यायालय मे मुकदमे का निर्णय कौन करता हैं ?

उत्तर -- न्यायाधीश
-------------------------------------------------------
(१०) भारत का सर्वोच्च न्यायालय कहाँ है ?

उत्तर -- दिल्ली में
-------------------------------------------------------
(११) महाराष्ट्र राज्य का उच्च न्यायालय कहाँ है ?

उत्तर -- मुंबई मे
-------------------------------------------------------
(१२) कन्नड किस प्रदेश की भाषा हैं ?

उत्तर -- कर्नाटक
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 12 July 2020

दिलेल्या मराठी शब्दाचा अर्थ सांगा. ( शब्दांची फोड )

(१) आजन्म
--- जन्मापासून .
-----------------------------------

(२) आमरण
--- मरेपर्यंत .
-----------------------------------
(३) दरसाल
--- प्रत्येक वर्षी.
-----------------------------------
(४) हररोज
--- प्रत्येक दिवशी.
-----------------------------------
(५) घरोघरी
--- प्रत्येक घरी.
-----------------------------------
(६) दररोज
--- प्रत्येक दिवशी.
-----------------------------------
(७) पोनोपानी
--- प्रत्येक पानात.
-----------------------------------
(८) गल्लोगल्ली
--- प्रत्येक गल्लीत.
-----------------------------------
(९) दारोदार
--- प्रत्येक दारी.
-----------------------------------
(१०) गायरान
--- गाईंसाठी रान.
-----------------------------------
(११) सेवानिवृत्त
--- सेवेतून निवृत्त.
-----------------------------------
(१२) राजपुत्र
--- राजाचा पुत्र
-----------------------------------
(१३) राजवाडा
--- राजाचा वाडा.
-----------------------------------
(१४) वनभोजन
--- वनातील भोजन.
-----------------------------------
(१५) पाणकोंबडा
--- पाण्यातील कोंबडा.
-----------------------------------
(१६) पाणसाप
--- पाण्यातील साप.
-----------------------------------
(१७) शेतकरी
--- शेती करणारा.
-----------------------------------
(१८) नापसंत
--- पसंत नसलेला.
-----------------------------------
(१९) बेकायदा
--- कायदेशीर नसलेला.
-----------------------------------
(२०) अहिंसा
--- हिंसा नसलेला.
-----------------------------------
(२१) अनादर
--- आदर नसलेला.
-----------------------------------
(२२) नाइलाज
--- इलाज नसलेला.
-----------------------------------
(२३) निर्दोष
--- दोष नसलेला.
-----------------------------------
(२४) अशक्य
--- शक्य नसलेला.
-----------------------------------
(२५) अन्याय
--- न्याय नसलेला.
-----------------------------------
(२६) अयोग्य
--- योग्य नसलेला.
-----------------------------------
(२७) निरोगी
--- रोग नसलेला.
-----------------------------------
(२८) बेसावध
--- सावध नसलेला.
-----------------------------------
(२९) हिरवागार
--- खूप हिरवा.
-----------------------------------
(३०) लालभडक
--- खूप लाल.
-----------------------------------
(३१) नवरात्र
--- नऊ रात्रींचा समूह.
-----------------------------------
(३२) सप्ताह
--- सात दिवसांचा समूह.
-----------------------------------
(३३) पुरणपोळी
--- पुरण घालून केलेली पोळी.
-----------------------------------
(३४) पंधरासोळा
--- पंधरा किंवा सोळा.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 11 July 2020

भौगोलिक सामान्यज्ञान


(१) वर्षाचे मुख्य ॠतू किती आहेत ?


उत्तर -- तीन
--------------------------------------
(२) मुख्य ॠतूंची नावे लिहा.

उत्तर -- उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
-----------------------------------------
(३) मुख्य दिशा किती आहेत ?

उत्तर -- चार
------------------------------------------------------
(४) मुख्य दिशांची नावे लिहा.

उत्तर -- पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
------------------------------------------------------
(५) उपदिशा किती आहेत ?

उत्तर -- चार
------------------------------------------------------
(६) उपदिशांची नावे लिहा.

उत्तर -- ईशान्य, आग्नेय, नैर्ॠत्य, वायव्य.
------------------------------------------------------
(७) पूर्व आणि उत्तर यांमधील दिशा कोणती आहे ?

उत्तर -- ईशान्य
------------------------------------------------------
(८) पूर्व आणि दक्षिण यांमधील दिशा कोणती आहे ?

उत्तर --- आग्नेय
------------------------------------------------------
(९) दक्षिण आणि पश्चिम यांमधील दिशा कोणती आहे ?

उत्तर -- नैर्ॠत्य
------------------------------------------------------
(१०) पश्चिम आणि उत्तर यांमधील दिशा कोणती आहे ?

उत्तर -- वायव्य
------------------------------------------------------
(११) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?

उत्तर -- पूर्व
------------------------------------------------------
(१२) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?

उत्तर -- पश्चिम
------------------------------------------------------
(१३) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?

उत्तर -- पश्चिम
------------------------------------------------------
(१४) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?

उत्तर -- उत्तर
------------------------------------------------------
(१५) ग्रेगरियन (इंग्रजी ) वर्षाचे महिने किती ?

उत्तर -- बारा
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday 10 July 2020

' घ ' अक्षर मराठी भाषा शब्दसंपत्ती ( ' घ ' ची शब्दसाखळी )


घट घटक घटका घटणे घटती घटना घटसर्प घटस्थापना

घटस्फोट घटिका घटी घट्ट घड घडण घडणावळ घडणे घडता घडती घडते घडवंची घडवट घडा घडाई घडाडणे घडामोड घडी घडीघडी घडीबंद घडीव घड्याळ घण घणघण घणघणणे घणवट घणसर घणावणे घणावली घन घनघोर घनचक्कर घनफळ घनवट घनश्याम घबाड घम घमघमाट घमंड
------------------------------------
घमेंड घर घरकुल घरकोंबडा घरगुती घरघर घरचा घरचारीण घरजावई घरट घरटा घरटी घरटी घरटे घरबंद घरणी घरदार घरपट्टी घरफोडी घरबुडव्या घरबुडी घरबैठा घरभरणी घरभेद्या घराऊ घराणे घरोटी घरोबा घर्म घर्षण घवघवणे घवघवीत घस घसघस घसघसीत घसट घसण घसणी घसरद घसरडे घसरणी घसरणे घसरपट्टी घसरा घसवटणे घसा घसाघस घळ घळघळ घळघळा घळघळीत घळण
------------------------------------------------------
घाइवट घाई घाऊक घागर घागरा घागरी घाट घांट घाटणे घाटनाळ घाटमाथा घाटले घाटवळ घाटसरी घाटा घांटी घाटी घाट्या घाण घाणा घाणी घाणेरडा घात घातक घातकी घातपात घातवार घातुक घाबरणे घाबरा घाम घामाघूम घामटा घामाघूम घामोळी घामोळी घाय घायपात घायवटणे घायवटा घायाळ घार घारा घारी घालणी घालणे घालमेल घालविणे घाला घाव घावणे घावन घास घासाघीस घासणी घासाघीस घाळ घाळण
------------------------------------------------------
घिरटी घिसघिस घिसाडी घी घीस घुंगट घुगरी घुंगरमाळ घुघु घुटका घुटमळणे घुटी घुणा घुबड घुमड घुमणे घुमरी घुमा घुम्या घुमारा घुला घुसडणे घुसणे घुसळखांब घुसळणे घुसा घूस घृणा
------------------------------------------------------
घेऊ घेणी घेणे घेणेकरी घेते घेर घेरा घेरणे घेरी घेवडा घेवदेव घेवाण घो घोक घोकणी घोकणी घोकरी घोकीव घोक्या घोंगडी घोंगड्या घोगरा घोंगाट घोंगावणे घोट घोटणी घोटणे घोटा घोटाळणे घोटाळा घोटीव घोडचूक घोडदळ घोडा घोडी घोडे घोण घोप घोर घोरणे घोरपड घोल घोषघोषणा घोस घोसदार घोसाळे घोळ घोळका घोळघोळून घोळणे घोळविणे घ्राण ================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 9 July 2020

भौमितिक सामान्यज्ञान


(१) बिंदू

--- बिंदू दर्शविण्यासाठी अतिशय अणुकुचीदार टोकाने

टिंब काढतात.
--- बिंदूला लांबी, रूंदी, उंची नसते.
-----------------------------------
(२) रेषा

--- रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद असते.
--- तिची अमर्यादता दर्शविण्यासाठी दोन्ही टोकांना बाण दाखवतात.
--- रेषा अनंत बिंदूनी बनलेली असते.
---------------------------------------
(३) किरण

--- किरण एका टोकाकडे बिंदूने मर्यादित असतो, तर दुस-या टोकाकडे अमर्याद असतो.
------------------------------------------------------
(४) रेषाखंड

--- रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला 'रेषाखंड ' म्हणतात.
--- रेषाखंडात अनंत बिंदू असतात.
------------------------------------------------------
(५) कोन

--- एकच आरंभबिंदू असणा-या मात्र एकाच रेषेत नसणा-या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणा-या आकृतीला ' कोन ' म्हणतात.
------------------------------------------------------
(६) लघुकोन

--- ९० अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला ' लघुकोन ' म्हणतात.
------------------------------------------------------
(७) कोटकोन

--- ९० अंशाचा मापाच्या कोनाला ' काटकोन ' म्हणतात.
------------------------------------------------------
(८) विशालकोन

--- ९० अंशापेक्षा जास्त माप असणा-या कोनाला ' विशालकोन ' म्हणतात.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री , जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 8 July 2020

नातेसंबंधाविषयक सामान्यज्ञान


● नातेसंबंधाविषयक प्रश्नोत्तरे वाचा व वहीत लिहा.

(१) आईचे वडिल आपले कोण ?


उत्तर -- आजोबा
----------------------------------
(२) आईची आई आपली कोण ?

उत्तर -- आजी
------------------------------------
(३) वडीलांचे वडील आपले कोण ?

उत्तर -- आजोबा
------------------------------------------------------
(४) वडीलांची आई आपली कोण ?

उत्तर -- आजी
------------------------------------------------------
(५) आईचे भाऊ आपले कोण ?

उत्तर -- मामा
------------------------------------------------------
(६) वडीलांचे भाऊ आपले कोण ?

उत्तर -- काका
------------------------------------------------------
(७) आईची बहिण आपली कोण ?

उत्तर -- मावशी
------------------------------------------------------
(८) वडीलांची बहिण आपली कोण ?

उत्तर -- आत्या
------------------------------------------------------
(९) आईच्या बहिणीचे पती आपले कोण ?

उत्तर -- काका
------------------------------------------------------
(१०) आईच्या भावाची पत्नी आपले कोण ?

उत्तर -- मामी
------------------------------------------------------
(११) वडीलांच्या भावाची पत्नी आपली कोण ?

उत्तर -- काकी
------------------------------------------------------
(१२) आईचे सासरे आपले कोण ?

उत्तर -- आजोबा
------------------------------------------------------
(१३) आईची सासू आपली कोण ?

उत्तर -- आजी
------------------------------------------------------
(१४) वडिलांचे सासरे आपले कोण ?

उत्तर -- आजोबा
------------------------------------------------------
(१५) वडीलांची सासू आपली कोण ?

उत्तर -- आजी
------------------------------------------------------
(१६) वडीलांच्या भावाची मुलगी आपली कोण ?

उत्तर -- चुलत बहिण
------------------------------------------------------
(१७) वडीलांच्या भावाचा मुलगा आपला कोण ?

उत्तर -- चुलत भाऊ
------------------------------------------------------
(१८) आईच्या बहिणीचा मुलगा आपला कोण ?

उत्तर -- मावस भाऊ
------------------------------------------------------
(१९) आईच्या बहिणीची मुलगी आपली कोण ?

उत्तर -- मावस बहिण
------------------------------------------------------
(२०) वडीलांच्या बहिणीची मुलगी आपली कोण ?

उत्तर -- आते बहिण
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा केंद्र रोहोड
ता साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 7 July 2020

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत ?


उत्तर -- प्रतिभाताई पाटील
---------------------------------------
(२) कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडल्याने डोळ्यातून पाणी येते ?

उत्तर -- अमोनिया
----------------------------------------
(३) दुधाची शुध्दता मोजण्याचे उपकरण कोणते ?

उत्तर -- लॅक्टोमीटर
-------------------------------------------------------
(४) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------------
(५) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?

उत्तर -- अमृतसर
-------------------------------------------------------
(६) भगतसिंह , राजगुरु यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय आहे ?

उत्तर -- सुखदेव
-------------------------------------------------------
(७) मेरी काॅम कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------------
(८) आॅस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?

उत्तर -- चित्रपट
-------------------------------------------------------
(९) भारतरत्न हा मान मिळवणारा पहिला खेळाडू कोण ?

उत्तर -- सचिन तेंडुलकर
-------------------------------------------------------
(१०) भारताच्या संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात ?

उत्तर -- खासदार
-------------------------------------------------------
(१२) भारतरत्न मिळालेली पहिली महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी
-------------------------------------------------------
(१३) भारतीय रेल्वेचे प्रमुख मुख्यालय कोठे आहे ?

उत्तर -- मुंबई
-------------------------------------------------------
(१४) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद
-------------------------------------------------------
(१५) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

उत्तर -- रविंद्रनाथ टागोर
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 6 July 2020

Read and write ( रिड अॅड राईट )


a map and a tap. (अ मॅप अॅन्ड अ टॅप )

a cap and a map (अ कॅप अॅन्ड अ मॅप )

a pin and a tin ( अ पिन अॅन्ड अ टिन )


a bug and a mug (अ बग अॅन्ड अ मग )


a fin and a tin ( अ फिन अॅन्ड अ टिन )

a rug and a mug ( अ रग अॅन्ड अ मग )

a pen and a hen ( अ पेन अॅन्ड अ हेन )

a bat and a mat ( अ बॅट अॅन्ड अ मॅट )

a fan and a man ( अ फॅन अॅन्ड अ मॅन )

a cot and a pot ( अ काॅट अॅन्ड अ पाॅट )

a car and a jar ( अ कार अॅन्ड अ जार )

a hut and a nut ( अ हट अॅन्ड अ नट )

a net and a jet ( अ नेट अॅन्ड अ जेट )

a boy and a toy ( अ बाॅय अॅन्ड अ टाॅय )

a ram and a dam ( अ रॅम अॅन्ड अ डॅम )

a pig and a fig ( अ पिग अॅन्ड अ फिग )

a bell and a well ( अ बेल अॅन्ड अ वेल )

a book and a hook ( अ बुक अॅन्ड अ हुक )

a cock and a lock ( अ काॅक अॅन्ड अ लाॅक )

a fish and a dish ( अ फिश अॅन्ड अ डिश )

a boat and a goat ( अ बोट अॅन्ड अ गोट )

a hill and a mill ( अ हिल अॅन्ड अ मिल )

a king and a ring ( अ किंग अॅन्ड अ रिंग )

a slate and a plate ( अ स्लेट अॅन्ड अ प्लेट )

a pocket and a rocket (अ पाॅकेट अॅन्ड अ राॅकेट)

a team and a beam( अ टिम अॅन्ड अ बिम )
=============================
SHANKAR SITARAM CHAURE
Z. P. SCHOOL JAMNEPADA
TAL SAKRI DIST DHULE
9422736775

Sunday 5 July 2020

ओळखा बरे , मी आहे कोण ?


(१) रात्रंदिवस मी सीमेवर उभा असतो.
देश माझा धर्म असतो.
दुसरे माझे कर्म नाही.
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?'
---------------------------------------

(२) सर्दी खोकला तुम्हा येता ,
तुम्ही माझ्याकडे धावत येता.
मी तुम्हांस बरे करतो.
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ? '
-------------------------------------------

(३) झुकझुक मी धावत असते
'पों पों मी आवाज करते.
तुम्हा तुमच्या गावा नेते
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?'
-------------------------------------------------

(४) इवले इवले माझे डोळे
इकडून तिकडे माझे पळणे
पाण्यावाचून नाही जीवन माझे
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?
-------------------------------------------------

(५) तुम्ही दिवसभर कोठे ही जा.
संध्याकाळ झाली की तुम्ही माझ्याकडे येता.
ऊन, पाऊस व वारा यांपासून मी तुमचे रक्षण करतो.
तर मग ओळखा बरे 'मी आहे कोण ?
----------------------------------------------------------------
उत्तरे :- १) सैनिक, (२) डाॅक्टर, (३) आगगाडी, (४) मासा, (५) घर
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 4 July 2020

' ग ' अक्षर मराठी भाषा शब्दसंपत्ती ( ' ग ' ची शब्द साखळी )


गय गगन गंगा गज गंज गचका गचगच गचाळ गच्ची गज

गंज गजकर्ण गजगजाट गंजणे गजनी गजब गजबज गजबजणे गडबड गजर गजरा गजल गजानन गंजी गजेरी गट गटकळी गटगट गटर गटार गट्टी गड्डी गठ्ठा गड गडकरी गडगच्च गडगंज गडगडणे गडगडाट गडद गडप गडबड गडबडणे गडबडाट गंडा गंडांतर गडी गडू गरगरा गरगरीत गरज गरजणे गरजवंत गरजू गॅरंटी गरद गरदन गरम गरमागरम गरमी गरसळी गरळा गरा गराडा गरीब गरीबनवाज गरीबी गरूड गरूरी गरोदर गर्क गर्जना गर्ता गर्द गर्दी गर्भ गर्भपात गर्भश्रीमंत गर्व गल गलका गलगा गलत गलतन गलथा गलन गलफ गलबत गलबल गलबला गलबल्या गलिच्छ गलोल गल्ला गल्ली गवई गवगवा गवंडी गवत गवताळ गवस गवळण गवळी गवा गवाळा गव्हाण गस्त गस्ती गहन गहिना गहाण गहाळ गहिरा गळ गळका गळचेपी गळणे गळफास गळसर गळसरी गळा गळाठा गळीत गळेकापू
------------------------------------------------------------------
गाई गांगरणे गाजणे गांजणे गाजर गाजविणे गांजा गाजावाजा गाठोडी गाठोडे गाडगे गाडा गाडी गाडीवान गांडूळ गाढ गाढव गाढवी गाढा गाण गाणे गाथा गांदणे 
गादा गादी गांध गांधी गान गाफील गाभण गाभा गाभार  गाभारा गांभीर्य गाभुळणे गाय गायक गायकी गायत्री गायन गायरान गार गारगोटी गारठणे गारठा गारवट गारवा गारा गारूड गारूडी गार्ड गा-हाणे गाल गालपट गालफड गालफुगी गालिचा गाव गावकरी गावकी गावकूस गावगुंड गावठाण गावठी गांवढळ गाशा गाहाळ गाळ गाळण गाळणी गाळणे गाळा गाळी 
-------------------------------------------------------------
गिचगिचीत गिचमीड गिधड गिधाड गिरका गिरकी गिरगिरी गिरटी गिरणी गिरफ्तार गिरविणे गिराणी गिरी गिर्द गि-हाईक गिलकी गिलवा गिळंकृत गिळणे गीत गीता गीर
-------------------------------------------------------------
गुंग गुंगी गुचकी गुच्छ गुंज गुज गुजगुज गुजगोष्टी गुजर गुजरणे गुजराण गुजरात गुजराथी गुजरी गुंजारव गुजारा गुटका गुटमळणे गुंठा गुडघा गुंडा गुंडाळणे गुंडाळा गुंडाळी गुढी गुढीपाडवा गुण गुणक गुणकारी गुणगुण गुणणे गुणवान गुणाकार गुणी गुणोत्तर गुण्य गुण्या गुण्यागोविंदाने गुंतणे गुंतले गुंता गुंतागंत गुदगुली गुदमरणे गुदमारा गुद्दा गुन्हा गुन्हेगार गुन्हेगारी गुपचिप गुपित गुप्त गुप्ती गुंफणे गुफा गुबगुबीत गुबारा गुम गुमान गुरगुरणे 
गुरगुराट गुरफटणे गुरफटा गुरव गुरळी गुराखी गुरू गुरूकिल्ली गुरूकुल गुरूत्व गुरुत्वाकर्षण गुरूपूजा गुरुबंधु गुरूमंत्र गुरूवार गु-हाळ गुल गुलकंद गुलगुलीत गुलजार गुलदस्त गुलाब गुलाम गुलामगिरी गुलाल गुहा गुळखोबरे गुळ गुळगुळीत गुळचट गुळणा गुळवणी गुळवेल गुळाळा गुळी गूज गूढ गूल गृहस्थ गृहस्थाश्रम गृहिणी गृहीत 
-------------------------------------------------------------
गेट गेंडा गेंद गेरू गेह गैर गैरशिस्त गैरसमजूत गैरसावध गैरसोय गैरहजर गैरा गैरी गोकर्ण गोकुळ गोकुळाष्टमी गोखरू गोगलगाय गोंगाट गोग्रास गोचडी गोचीड गोंजारणे गोजिरवाणे गोजिरे गोट गोटा गोटी गोठ गोठण गोठणे गोठा गोड गोडधोड गोडबोल्या गोडवा गोडा गोडवी गोडवे गोंडस गोंडा गोडी गोण गोणपाट गोणी गोत गोतपात गोता गोतावळ गोत्र गोंद गोदडी गोंदणे गोदावरी गोदी गोधडी गोधन गोंधळ गोंधळणे गोंधळी गोप गोपनीय गोपाल गोपाळ गोपाळकाला गोपी गोफ गोफण गोफाटणे गोबरा गोम गोमटे गोमा गोमाशी गोमुख गोरख गोरगरीब गोरक्षण गोरा गोरागोरापान गोरी गो-हा गोल गोलंदाज गोवणे गोवरी गोवर्धन गोवारी गोविंद गोशाळा गोषवारा गोष्ट गोसावी गोळ गोळा गोळी गोळीबार गौड गौडबंगाल गौण गौर गौरव गौरवणे गौरी गौसी ग्यान गॅस ग्रंथ ग्रथकार ग्रंथी गंध ग्रस्त ग्रह ग्रहण ग्राम ग्रामीण ग्रामस्थ ग्रास ग्रासणे ग्राहक ग्राह्य ग्रीष्म ग्लनी ग्लास ग्वाही 
================================
संकलक/ लेखक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५



Friday 3 July 2020

सामान्यज्ञान प्रश्नावली (भारत देश )

   

(१) आकारमानाने भारत देशातील सर्वात मोठे राज्य

कोणते ?

उत्तर -- राजस्थान
---------------------------------------
(२) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

उत्तर -- गंगा
----------------------------------------
(३) माउंटअबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर -- राजस्थान
-------------------------------------------------------
(४) गोवा राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर -- पणजी
-------------------------------------------------------
(५) मध्यप्रदेश राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर -- भोपाळ
-------------------------------------------------------
(६) भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर मानले जाते ?

उत्तर -- मुंबई
-------------------------------------------------------
(७) तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर -- चेन्नई
-------------------------------------------------------
(८) सापूतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर -- गुजरात
-------------------------------------------------------
(९) बिहार राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर -- पाटणा
-------------------------------------------------------
(१०) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर -- रांची
-------------------------------------------------------
(११) दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?

उत्तर -- सिल्व्हासा
-------------------------------------------------------
(१२) ताजमहल कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर -- उत्तरप्रदेश
-------------------------------------------------------
(१३) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

उत्तर -- थरचे वाळवंट ( राजस्थान )
-------------------------------------------------------
(१४) भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण कोणते ?

उत्तर -- लेह
-------------------------------------------------------
(१५) जिजामाता उद्यान कोणत्या शहरात आहे ?

उत्तर -- मुंबई
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 2 July 2020

शब्दांचा लपंडाव (मराठी भाषिक उपक्रम )


● खालील शब्दात लपलेले शरीराचे अवयव शोधा.

प्रश्न शब्द       ---      उत्तर


(१) पोपट       --       पोट

(२) बंगाल      --       गाल

(३) सन्मान     --      मान

(४) पायरी       --      पाय

(५) नाटक       --      नाक

(६) मानव       --       मान

(७) दुकान       --       कान

(८) नाकतोडा  --      नाक

(९) वेगळा        --      गळा

(१०) पायवाट   --       पाय

(११) बोलपट   --        बोट

(१२) मुंगळा     --        गळा

(१३) नायक     --        नाक

(१४) अभिमान  --        मान

(१५) कानस      --       कान

(१६) उपाय        --        पाय

(१७) भटजी        --       जीभ

(१८) तोंडसुख     --        तोंड

(१९) कमान         --       मान

(२०) वेगळा          --       गळा
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 1 July 2020

RHYMING WORDS (-हायमिंग वर्डस् )


(1)  mat    bat    cat     hat    rat


       मॅट       बॅट     कॅट     हॅट     रॅट
-------------------------------------
(2)  car    jar    bar   war  far
      कार    जार   बार    वार     फार
-------------------------------------
(3) cot    pot    dot    hot    lot
     काॅट    पाॅट    डाॅट     हाॅट    लाॅट
---------------------------------------------
(4)  day    may    way    ray
       डे        मे         वे         रे  
---------------------------------------------
(5) win    tin    sin     pin     bin
      विन    टिन    सिन    पिन     बिन
---------------------------------------------
(6)  net    wet    bet   set    get
      नेट     वेट     बेट     सेट     गेट
---------------------------------------------
(7) hut    cut    but    put   nut
       हट     कट     बट     पुट     नट
---------------------------------------------
(8)  sun    run    gun    fun
       सन      रन     गन      फन
---------------------------------------------
(9)  pad    mad    bad    sad
       पॅड     मॅड        बॅड     सॅड
---------------------------------------------
(10) dry     try     cry       fry
        ड्राॅय    ट्राॅय     क्राॅय    फ्राॅय
-------------------------------------------
(11) tea   sea    pea   lea  
       टी      सी     पी       ली
-------------------------------------------
(12) pet   set   net   wet    bet
        पेट     सेट     नेट    वेट      बेट
--------------------------------------------
(13) man   fan   van   pan   ban
       मॅन     फॅन    व्हॅन    पॅन     बॅन
-----------------------------------------------
(14) wig     big    pig    dig    fig
       विंग     बिंग    पिंग    डिग    फिग
------------------------------------------------
(15) ram    jam    cam    dam
        रॅम     जॅम      कॅम       डॅम
-------------------------------------------------
(16) lip      tip    nip     dip 
      लिप    टिप    निप    डिप
------------------------------------------------
(17) ball     tall     fall     wall
        बाॅल    टाॅल     फाॅल    वाॅल
---------------------------------------------------
(18) cool    pool    wool    fool
        कूल     पूल      वूल       फूल
---------------------------------------------------
(19) gold   hold    sold    told     fold
       गोल्ड   होल्ड   सोल्ड   टोल्ड   फोल्ड
---------------------------------------------------
20)good  food  mood   wood  hood
        गूड    फूड    मूड         वूड    हूड
---------------------------------------------------
(21) bell    tell    well    sell  dell
       बेल    टेल    वेल       सेल   डेल
---------------------------------------------------
(22 ) hill   mill   will  bill   kill
         हिल   मिल   विल   बिल   किल
---------------------------------------------------
(23 ) pain   main  gain    rain  vain
          पेन    मेन      गेन      रेन      वेन
---------------------------------------------------
(24) kind     mind    find     bind
       काडन्ड  माइंड   फाइन्ड   बाइन्ड
---------------------------------------------------
(25) band   hand   sand   land
         बॅन्ड     हॅन्ड      सॅन्ड      लॅन्ड
---------------------------------------------------
(26) right   night   tight   hight
        राइट    नाइट     टाइट    हाइट
---------------------------------------------------
(27) nine   line   fine   mine
        नाइन   लाइन   फाइन   माइन
---------------------------------------------------
(28) book   look   cook   took
        बूक     लूक     कूक     टूक
---------------------------------------------------
(29) rice   nice   mice
        राइस   नाइस   माइस
---------------------------------------------------
(30) rest   best  nest   test
       रेस्ट    बेस्ट     नेस्ट    टेस्ट
-------------------------------------------------
( 31 ) seat   beat    heat   neat
         सीट      बीट      हीट       नीट
------------------------------------------------
(32) cock   lock   rock   sock
       काॅक    लाॅक    राॅक     साॅक
-----------------------------------------------
(33 ) link    pink   sink   wink
       लिंक    पिंक    सिंक    डिंक
---------------------------------------------------
(34 ) care    mare   hare    dare
         केअर    मेअर    हेअर     डेअर
---------------------------------------------------
(35) name   game   came  same
         नेम       गेम         केम      सेम
---------------------------------------------------
(36 ) tent   sent  went  rent   gent
         टेन्ट    सेन्ट    वेन्ट   रेन्ट    जेन्ट
---------------------------------------------------
(37) coat    goat   boat
         कोट     गोट      बोट
---------------------------------------------------
(38) back   pack   rack   sack
        बॅक     पॅक     रॅक     सॅक
---------------------------------------------------
(39) pick   tick   lick   kick   wick
        पिक   टिक   लिक   किक   विक
---------------------------------------------------
(40 ) bank   rank    tank
         बँक      रँक       टँक 
-------------------------------------
(41) yard   hard   ward
        यार्ड      हार्ड      वार्ड
----------------------------------------------
(42) dear   bear   hear 
      डिअर    बिअर   हिअर
----------------------------------------------
(43) round   found   sound
       राउंड      फाउंड      साउंड
---------------------------------------------------
(44) date   gate   late
         डेट     गेट      ले
---------------------------------------------------
(45 ) fast   cast   past   last
         फास्ट   कास्ट   पास्ट   लास्ट
---------------------------------------------------
(46 ) jeep   keep   deep   weep
       जीप   कीप     डीप      वीप
---------------------------------------------------
(47) pocket   locket   rocket
       पाॅकेट      लाॅकेट     राॅकेट
---------------------------------------------------
(48  )  cake   lake  take   make
          केक    लेक    टेक   मेक
---------------------------------------------------
(49 ) cain   main   pain   rain   gain
         केन     मेन       पेन      रेन     गेन
---------------------------------------------------
(50  ) bold   cold   fold     gold   sold
         बोल्ड   कोल्ड  फोल्ड   गोल्ड सोल्ड
---------------------------------------------------
(51) rope   hope   Pope   cope
         रोप     होप      पोप       कोप
---------------------------------------------------
(52 ) boil       coil        soil
         बाॅईल    काॅईल     साईल

==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
    जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा
    केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळ
📞 9422736775

' ख ' अक्षर मराठी भाषा शब्दसंपत्ती.



● ' ख ' ची शब्द साखळी

खग खच खडक खजाना खजिना खंजिरी खगोल खग्रास खजिनदार खंजीर खजुरी खजूर खटकन खटका खटखट खटनट खटपट खटपट्या खटला खटाई खटारा खट्याळ खंड खडकाळ खडखडणे खडखडाट खडखडीत खंडणी खडतर खंडन खडखड खबबड खडबडणे खडबडाट खडबडीत खडसर खडा खडखडाट खडाजंगी खंडित खडी खंडी खडीसाखर खडू खड्डा खण खणका खत्रा खणखणाट खणखणीत खणणे खंत खत खतवड खतवणी खंदक खदाखदा खंदा खनन खप खपणे खपला खपली खपा खबदड खबर खबरदार खर खबरदारी खबरबात खंबीर खमखम खरखरा खरखरीत खरचटणे खरड खरडा खरप खरपूस खरबूज खरमरीत खरवस खरा खराखुरा खराटा खराब खराब खराबा खरीद खरीददार खरीदी खरीप खरीप खरूज खरे खरेदी खरोखर खर्च खर्चिक खर्व खलबत खलबत्ता खलाशी खलास खवखव खवखवणे खवट खवय्या खवा खस खसखशीत खसखस खळ खळका खळखळ खळखळणे खळखळाट खळगा खळगी खळगे खळी खळे
------------------------------------------------------------------
खाऊ खाक खाकर खाका खाक्या खाच खाज खाजगी खाट खाटा खाटिक खाटी खांडकी खाडी खाण खाणाखुणा खाणावळ खाणी खाणे खातर खातरजमा खातरदारी खाती खातेदार खादी खांदी खाद्य खानदान खानेसुमारी खापर खापरपणजा खापरपोळी खार खारट खारवा खारा खारी खास खारीक खालती खाली खालवणे खालसा खालील खालोखाल खावटी खासखबर खासगी खासडा खासदार खासा खासी
----------------------------------------------------------------
खिंखाळणे खिचडी खिचणे खिजणे खिजविणे खिटी खिंड खिंडार खिंडी खिदळणे खिन्न खिरापत खिल्लार खिसा खिसारा खिस्त खिळखिळा खिळणे खिळा खीर खीळ खुजा
----------------------------------------------------------------
खुंट खुंटणे खुंटा खुडणे खुडा खुतणे खुनसी खुनी खुपणे खुपणी खुपसणे खुपिया खुबा खुबीदार खुमखुम खुर खुरखुर खुरटा खुरडणे खुरपणे खुरपी खुराक खुराडे खुरसानी खुरी खुर्ची खुर्द खुलणे खुलविणे खुला खुश खुशकी खुशामत खुशाल खुशाली खुशी खुशामत खुळा खुशखुशीत खुसपणे खुळसट खुळाखुळा खूट खूण खूणखाण खूणगाठ खूद खून खूप खूळ
-----------------------------------------------------------------

खेकडा खेचणे खेचर खेचाखेची खेट खेटणे खेटर खेटा खेडणे खेडवळ खेडू खेती खेद खेप खेर खेरीज खेळ खेळकर खेळगडी खेळणी खेळणे खेळविणे खेळाखेळी खैर खैरात
----------------------------‐--------------------------‐----------
खोकड खोकणे खोकला खोका खो खो खोगीर खोगीरभरती खोचणे खोचा खोट खोटा खोटाई खोंड खोड खोडकर खोडणे खोडावा खोडसर खोडा खोडखोड खोडी खोत खोदकाम खोदणे खोदाई खोदीव खोप खोपट खोपा खोपी खोबरे खोबरेल खोरसणी खोरा खोरी खोल खोलगट खोलणे खोरवट खोलवा खोली खोळ खोळी खोळंबा खौस ख्यात ख्याती ख्यालीखुशाली
==================================
संकलक/लेखक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५