माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 27 March 2024

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) आकाशाचा रंग कसा असतो ?
उत्तर -- निळा
-----------------
(२) चंद्राच्या प्रकाशाला काय म्हणतात ?
उत्तर -- चांदणे
----------------------------------
(३) बैलाची पूजा कोणत्या सणाला करतात ?
उत्तर -- पोळा 
----------------------------------
(४) आकाश - दिवा कोणत्या सणाला लावतात ?
उत्तर -- दिवाळी
----------------------------------
(५) तीळगूळ कोणत्या सणाला वाटतात ?
उत्तर -- मकरसंक्रांत 
----------------------------------
(६) नाताळचा सण कोणत्या महिन्यात असतो ?
उत्तर -- डिसेंबर 
----------------------------------
(७) आपला स्वातंत्र्य - दिन केव्हा असतो ?
उत्तर -- १५ ऑगस्ट 
----------------------------------
(८) आपला प्रजासत्ताक - दिन केव्हा असतो ?
उत्तर -- २६ जानेवारी 
----------------------------------
(९) महाराष्ट्र - दिन कोणत्या तारखेला असतो ?
उत्तर -- १ मे 
----------------------------------
(१०)  आपले राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ 
----------------------------------
(११) कोंबड्याच्या तु-याचा रंग कसा असतो ?
उत्तर -- लाल 
----------------------------------
(१२) चिमणी कसा आवाज करते ?
उत्तर -- चिवचिव
----------------------------------
(१३) कावळा कसा ओरडतो ?
उत्तर -- कावकाव
----------------------------------
(१४) कोकिळा कशी गाते ?
उत्तर -- कुहुकुहू 
----------------------------------
(१५) बेडूक कसा ओरडतो ?
उत्तर -- डराॅव  डराॅव 
----------------------------------
(१६)  पक्ष्यांना किती पाय असतात ?
उत्तर -- दोन 
----------------------------------
(१७) लोकर कोणत्या प्राण्यापासून मिळते ?
उत्तर -- मेंढी
----------------------------------
(१८)  कच्च्या कै-यांचे काय बनवितात ?
उत्तर -- लोणचे
----------------------------------
(१९) आपले राष्ट्रगीत कोणते आहे ?
उत्तर -- जनगणमन
----------------------------------
(२०) आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग कोणते आहेत ?
उत्तर -- केसरी, पांढरा, हिरवा 
----------------------------------
(२१) केसांचा रंग कोणता ?
उत्तर -- काळा 
----------------------------------
(२२) लांब मानेचा प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ
----------------------------------
(२३) झाडावर तुरूतुरू धावणारा प्राणी कोणता?
उत्तर -- खार ( खारूताई )
----------------------------------
(२४) सोंड असलेला मोठा प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती 
----------------------------------
(२५) कोणता पक्षी पिसारा फुलवून नाचतो ?
उत्तर -- मोर 
----------------------------------
(२६) कोणता प्राणी डुलत डुलत चालतो ?
उत्तर -- हत्ती
----------------------------------
(२७) आकाशात चांदण्या केव्हा दिसतात ?
उत्तर -- रात्री
----------------------------------
(२८) गुळाची चव कशी असते ?
उत्तर -- गोड
----------------------------------
(२९) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट
----------------------------------
(३०) मिठाची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट
----------------------------------
(३१) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर -- कडू 
----------------------------------
(३२) गुढी कोणत्या सणाला उभारतात ?
उत्तर -- गुढीपाडवा 
----------------------------------
(३३) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा  / बछडा 
----------------------------------
(३४) कोणत्या फळावर काटे असतात ?
उत्तर -- फणस
----------------------------------
(३५) पोपटाचा रंग कोणता आहे ?
उत्तर -- हिरवा 
----------------------------------
(३६) पोपट कसा बोलतो ?
उत्तर -- विठूविठू
----------------------------------
(३७) पोपटाच्या चोचीचा रंग कोणता आहे ?
उत्तर -- लाल
----------------------------------
(३८) चिमणी काय खाते ?
उत्तर -- दाणे / किडे
----------------------------------
(३९) गाय काय खाते ?
उत्तर -- चारा
----------------------------------
(४०) गायीला किती शिंगे असतात ?
उत्तर -- दोन
----------------------------------
(४१) गाईला किती पाय असतात ?
उत्तर -- चार
----------------------------------
(४२) कुत्रा कसा भुकंतो ?
उत्तर -- भो भो
----------------------------------
(४३) छत्री केव्हा वापरतात ?
उत्तर -- पावसाळ्यात
----------------------------------
(४४) पहाटे पहाटे कोणता पक्षी आरवतो ?
उत्तर -- कोंबडा 
----------------------------------
(४५) सायकलला किती चाके असतात ?
उत्तर -- दोन
----------------------------------
(४६) मासे कुठे राहतात ?
उत्तर -- पाण्यात
----------------------------------
(४७) बैलाच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- हंबरणे
----------------------------------
(४८) बकरी कशी ओरडते ?
उत्तर -- बेंबें
----------------------------------
(४९) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे
----------------------------------
(५०) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू
----------------------------------
(५१) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू
======================
संकलक / लेखन :-
श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496

Tuesday 26 March 2024

मनोरंजक यमक शब्द साखळी ( भाषिक उपक्रम )


✓उपक्रमाचा हेतू :
१) विद्यार्थ्यांना मराठी वाचन-लेखनाची आवड निर्माण करणे.
२) यमक जुळणाऱ्या शब्दांची ओळख होणे.
३) वि‌द्यार्थी कविता स्वनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या शब्दांचा परिचय होणे.
४) आनंददायी भाषिक उपक्रमातून शिक्षण देणे.

✓कृती
1) उपक्रम सुरु करण्यापूर्वी मराठी यमक जुळणाऱ्या शब्दजोड्‌या दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द, चार अक्षरी शब्द संग्रहित करावे.
२) संग्रहित केलेल्या यमक जुळणाऱ्या शब्द जोड्यांचे संच तयार करून घ्यावे.

१) घर वर तर थर धर जर नर
२) गड वड धड जड़ कह घड़ थड
३) घट-पट नट फट गट अट भट
४) कळ नळ पळ मळ वळ बळ गळ
५) मन धन सन वन तन घन बन
६) धरण हरण वरण चरण करण सरण मरण
७) कान मान छान पान रान जान धान
८) नाक चाक ताक हाक बाक आक पाक
९) गार दार खार धार चार धार हार
१०) हात दात जात भात रात सात वात
११) शाल लाल गाल काल ढाल पाल साल
१२) आग नाग बाग राग साग डाग भाग
१३) घास खास डास तास पास वास रास
१४) झाड माड आड जाड ताड नाङ धाड
१५) गाव नाव भाव धाव डाव चाव पाव
१६) साप ताप छाप पाप बाप शाप माप
१७) वाट घाट पाट ताट लाट भाट थाट
१८) बाळ लाळ डाळ काळ गाळ माळ टाळ
१९) ससा बसा हसा रसा घसा ठसा वसा
२०) धडा वडा सड़ा कड़ा खड़ा घड़ा तडा
२१) वारा तारा चारा बारा धारा खारा सारा
२२) शाळा बाळा माळा काळा जाळा आळा वाळा
२३) बालक पालक मालक चालक / गायक  लायक
२४) घागर जागर सागर / भाकर चाकर ठाकर
२५) कळी अळी खळी नळी मळी बळी तळी
२६) आई बाई माई ताई दाई शाई जाई
२७) पूर दूर सूर धूर तूर खूर भूर
२८) वारे तारे सारे खारे घारे आरे भारे
२९) मोर बोर चोर थोर पोर दोर कोर
३०) होळी पोळी मोळी झोळी टोळी कोळी गोळी

✓३) यमक जुळणाऱ्या शब्दांचे कार्ड तयार करणे.
४) दर शनिवारी यमक जुळणाऱ्या शब्द कार्डाचे वाचन करून घ्यावे.
५) यमक जुळणाऱ्या शब्द वाचनाचे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून ती ऐकविण्यात यावी.
६) यमक जुळणाऱ्या शब्द वाचनाची गोडी निर्माण होऊन छोट्या छोट्या चारोळ्या किंवा कविता रचना करण्यास प्रोत्साहन द्यावे.

✓ फलश्रुति /निष्पत्ति :-

१) विद्यार्थी मराठी यमक जुळणाऱ्या शब्दांचे वाचन लेखन आवडीने करू लागतात.
२) या शब्द संग्रहामुळे स्वनिर्मितीचा आनंद वि‌द्यार्थ्यांना मिळतो.
३) यमक जुळणाऱ्या शब्द‌जोड्या नवनवीन शोधण्यातून शोधक वृत्ती वाढते.
४) काव्य निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या यमक शब्दांची मदत होते.
=========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Saturday 23 March 2024

बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नावली


(१) एका रांगेत मनिषा समोरून दहावी व मागून 15 वी आहे.
तर रांगेत किती विद्यार्थी बसले आहेत ?

--- (1) 25
--- (2) 24 ✓✓ ( उत्तर )
--- (3) 26
--- (4) 27
=============
(२) एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात. तेच काम
करण्यासाठी 24 माणसे किती दिवस घेतील ?

--- (1) 25
--- (2) 24
--- (3) 10 ✓✓ ( उत्तर )
--- (4 ) 40
======================
(3) एका संख्येच्या 50 % मधून 50 वजा केले असता‌ 50 उरतात, तर ती संख्या कोणती ?

--- (1) 50
--- (2) 200 ✓✓ ( उत्तर )
--- (3) 100
--- (4) 400
======================
(4) ' अ '  'ब'  चे वडील आहेत, परंतु  ' ब '  'अ' चा मुलगा नाही;  ' ब ' व  'अ ' चे एकमेकांशी नाते काय ?

--- (1) 'ब '  'अ' चा भाऊ
--- (2)  'ब'  'अ' चे वडील
--- (3)  'ब '  'अ ' ची मुलगी ✓✓ ( उत्तर  )
--- (4)  ' अ '. ' ब ' ची मुलगी 
======================
(5) चंदनाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते; तर किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षांची होईल ?

--- (1) 3
--- (2) 15
--- (3) 11 ✓✓ ( उत्तर )
--- (4) 12
=======================
(6) मनिषाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावाचे नाव किरण आहे, तर किरणला बहिणी किती ?

--- (1) दोन
--- (2) एक
--- (3) चार
--- (4) तीन ✓✓ ( उत्तर )
========================
(7) सुमितला चार काका आहेत ; तर नाशिकला राहणाऱ्या त्याच्या काकाला भाऊ किती ?

--- (1) 6
--- (2) 5
--- (3) 4  ✓✓ ( उत्तर )
--- (4) 3
=========================
(8) माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते. तर तुझी आई माझी कोण ?

--- (1) आत्या
--- (2) मावशी
--- (3) मामी ✓✓ ( उत्तर )
--- (4) काकी 
========================
(9)  वर्षाची सुरुवात जून महिन्याने केल्यास क्रमाने 7 वा  महिना कोणता येईल ?

--- (1) नोव्हेंबर
--- (2) डिसेंबर ✓✓ ( उत्तर )
--- (3) जुलै
--- (4) जानेवारी 
========================
(10) रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती ?

--- (1) 22
--- (2) 23
--- (3) 21 ✓✓ ( उत्तर )
--- (4) यापैकी नाही.
========================
(11) मुलींच्या रांगेत सानियाचा क्रमांक डावीकडून 17 वा व उजवीकडून 7 वा आहे; तर रांगेत एकूण मुली किती ?

--- (1) 23 ✓✓ (उत्तर )
--- (2) 24
--- (3) 25
--- (4) 22
===========================
संकलक / लेखक :-
श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा (रोहोड)
ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496


Monday 18 March 2024

मी पाहिलेली चिऊताई (चिमणी)


   चिमणीचा चिवचिवाट न ऐकलेला माणूस विरळच म्हणवा लागेल. अगदी तान्ह्या बाळाला सुध्दा 'चिऊताई' माहीत असते. रात्रीच्या वेळी थव्यांनी एकत्र राहणा-या चिमण्या दिवसा जोडीजोडीने किंवा छोट्या थव्यांनी खाद्य शोधत हिंडतात. दुपारी मात्र थोडी विश्रांती घेतात.
      करड्या रंगाच्या या इटुकल्या चिमण्या नेहमी कामात असतात. एकतर वर्षातून तीन - चार वेळा वीण होते. त्यामुळे घरट्यात नेहमीच पिल्लं वाढत असतात. पिल्लांचं खांद्य म्हणजे छोटे कीटक आणि अळ्या. त्या पकडून आणणं, भरवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरटं स्वच्छ करणं या कामामध्ये चिमण्या दंग असतात. बारकाईनं बघा चिमण्या - चिमणीत फरक असतो.
    अधूनमधून दाणे टिपणा-या ह्या छोट्या चिमण्या पिकांवर येणारे कीटक, आणि त्यांच्या अळ्या खाऊन शेतक-यांना फार मदत करतात. मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच काहीसं म्हणता येईल. आपल्या चिऊताई बद्दल !

२० मार्च जागतिक चिमण्या दिवस निमित्त लेख...
-------------------------------------------------
लेखन ‌:- शंकर सिताराम चौरे (प्रा.‌शिक्षक‌ )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र -- रोहोड, ता.‌साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Saturday 16 March 2024

रक्तसंबंध नाते ( Blood Relation ) प्रश्नावली


(१) सासरे व जवाई दोघे जेवायला बसले. मायलेकी वाढत होत्या. माय म्हणते, 'माझ्या बाबा तु खा मुलगी म्हणते' 'माझ्या बाबा तु खा' तर सासरा असलेल्या व्यक्तीचे लेक असलेल्या व्यक्तीशी काय नाते होईल?

--- 1. पती
--- 2. वडीलांचे वडील
--- 3. आईचे वडील ✓✓ ( उत्तर )
--- 4. वडील
==========
(२) रंजनाची आई सुप्रियाची आत्या लागते. तर सुप्रियाची आई
रंजनाच्या आईची कोण ?

--- 1. आत्या 
--- 2. बहीण 
--- 3. ननंद 
--- 4. वहिणी  ✓✓ ( उत्तर )
===================
(३) चंदना ही शंकरची पत्नी व राजकुमारची बहिण आहे. रूस्तम हे राजकुमाराचे वडील आहेत, रूस्तम हे शंकरचे कोण ?

---- 1. काका
---- 2. मामा
---- 3. सासरे ✓✓ ( उत्तर )
---- 4.आजोबा 
==================
(४) सुमितच्या आईची नंनद रविंद्रची आई आहे. तर सुमितची आई रविंद्रची कोण ?

--- 1. मामी ✓✓ ( उत्तर )
--- 2. मावशी
--- 3. काकू
--- 4. आत्या 
===================
(५) लीलाची मुलगी शंकरच्या मुलाची आते बहीण आहे, तर
शंकर लीलाचा कोण ?

--- 1. आते भाऊ
--- 2. पुतण्या
--- 3. मावस भाऊ
--- 4. भाऊ  ✓✓ ( उत्तर )
====================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Sunday 10 March 2024

नवी दिशा, नवे उपक्रम समूहाचा "शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे" पुस्तक प्रकाशन सोहळा (शंकर चौरे सरांची विचारधारा )


शतक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे 
 पुस्तक प्रकाशनाचा उधळला रंग 
पुस्तक रूपी उपक्रमात 
तीन महिने होतो दंग

नवी दिशा, नवे उपक्रम समूहात 
ताई - भाऊंची जोड 
चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाने
प्रकाशन सोहळा झाला गोड

शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे 
गुणगाऊ मनोभाव
देवराव चव्हाण सरांनी 
मार्गदर्शन केलं प्रेमभाव

शतक नाविन्यपूर्ण उपक्रमात 
ज्ञानाची आहे गमंत
भाषा, गणित, विज्ञान आणि 
सामान्यज्ञानाची संगत

बळीराम जाधव सरांच्या मनात
सोज्वळतेचा दिवा
शतक नाविन्यपूर्ण उपक्रम 
पुस्तक रूपाने लाभला ठेवा.

शतक नाविन्यपूर्ण उपक्रम 
पुस्तक ज्ञानरूपी दर्पण.
आपण सर्व उपक्रमशील शिक्षकांनी 
ज्ञान केलं अर्पण.

शतक नाविन्यपूर्ण उपक्रम 
ज्ञानसागराची किनार
आपण सर्व दिलं एकमेकांना
मनापासून आधार

शतक नाविन्यपूर्ण उपक्रमाला 
आज आली शोभा
बळीराम जाधव सरांच्या रूपाने 
मार्गदर्शक उभा.

शतक नाविन्यपूर्ण उपक्रम 
ज्ञानरूपी सोनेरी कळस
या सोहळ्यात नाही 
नाही वाटलं आळस.

शतक नाविन्यपूर्ण उपक्रम
 अप्रतिम सुंदर 
कर्तृत्ववान भाऊ - ताईंची
पुरस्काराने झाली कदर.

शतक नाविन्यपूर्ण उपक्रमात
गुरूजनं कुशल
उपक्रम, सामान्यज्ञानाची
दिशा आहे स्पेशल.

शतक नाविन्यपूर्ण उपक्रम 
आहे पवित्र 
या पुस्तकातील उपक्रम 
सादर होतील सर्वत्र

इंग्रजी भाषेत चंद्रला 
म्हणतात मून
शतक नाविन्यपूर्ण उपक्रमात
सप्तरंगी गुण
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Tuesday 5 March 2024

महिला दिन विशेष सामान्यज्ञान


(1) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी 
-------------------------
(2) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले 
--------------------------
(3) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
-------------------------------------------------
(4) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी 
-------------------------------------------------
(5) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर 
------------------------------------------------
(6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील 
------------------------------------------------
(7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------
(8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी 
------------------------------------------------
(9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल 
------------------------------------------------
(10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार 
------------------------------------------------
(11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी 
-----------------------------------------------
(12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 
------------------------------------------------
(13) भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण ?
उत्तर -- मादाम भिकाजी कामा 
------------------------------------------------
(14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा 
------------------------------------------------
(15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी 
------------------------------------------------
(16)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
(17) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
(18) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस 
-----------------------------------------------
(19) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग 
-------------------------------------------------
(20) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी 
-------------------------------------------------
(21) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-------------------------------------------------
(22) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ 
-------------------------------------------------
(23) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग 
-------------------------------------------------
(24) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ
--------------------------------------
(25) ' हिमा दास ' कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- धावपटू ( ॶॅथेलेटिक्स )
-----------------------------------------------------------
(26) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------------------
(27)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
(28) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
------------------------------------------------
(29) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-----------------------------------------------
(30) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
------------------------------------------------
(31) 'कविता राऊत ' कोणत्या क्रीडाप्रकारासाठी. 
प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- धावपटू ( ॶॅथेलेटिक्स )
-----------------------------------------------
(32) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
-----------------------------------------------
(33) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू (ॶॅथेलेटिक्स )
=========================
 संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा,
केंद्र रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 4 March 2024

सामान्य ज्ञान कसोटी


(1)  एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड कापायला किती दिवस लागतील ?

उत्तर --- 9 दिवस 
----------------------
(2) जर डाॅक्टरांनी तुम्हांला 6 गोळ्या दर अर्ध्या तासाने एक प्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला
किती वेळ लागेल ?

उत्तर ---  2 तास 30 मिनिटे 
----------------------------------
(3) एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 6 मीटर कापड कापले जात असेल तर ते पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील ?

उत्तर ---  4 दिवस 
-----------------------------------
(4) जर एक साडी वाळायला 10 मिनिटे लागत असतील तर अशा 10 साड्या वाळायला किती वेळ लागेल ?

उत्तर --- 10  मिनिटे 
-----------------------------------
(5) लिंबू , वाटाणा, कलिंगड, मोसंबी व मोहरी योग्य क्रमाने लावल्यास मधोमध काय असेल ?

उत्तर --- लिंबू 
-------------------------------------
(6) एका  20 मीटर लांबीच्या कापडातून रोज 2 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील ?

उत्तर --- 9 दिवस 
------------------------------------
(7) एका दिवसाचे तास व अशोक चक्रातील आ-यांची संख्या यांचा संबंध काय ?

उत्तर --- दोन्हींची संख्या समान आहे.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  / 7721941496

Friday 1 March 2024

गणितीय सामान्यज्ञान


(1) सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे.
(2) सर्वांत मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही.
(3) लहानात लहान पूर्ण संख्या ' 0 ' आहे.
(4) मोठ्यात मोठी पर्ण संख्या सांगता येत नाही.
(5) लहानात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही.
(6) मोठ्यात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही.
(7) मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या  -- 1 आहे.
(8) लहानात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे.
(9)  0 ही संख्या धनही नाही व ऋणही नाही.
(10) सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.
(11) दोन क्रमागत सम संख्यामध्ये दोनचा फरक असतो.
(12) दोन क्रमागत विषम संख्यांमध्ये 2 चा फरक असतो.
(13) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 55 आहे.
(14) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज 30 आहे.
(15) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज 25 आहे.
(16) 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत.
(17) सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.
(18) सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे.
(19) 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत.
(20) 1 ही संख्या संयुक्तही नाही व मूळही नाही.
(21) सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे.
(22)  सम असणारी एकमेव मूळ संख्या 2 आहे.
(23) सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.
(24) सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.
(25) सर्वात लहान संयुक्त विषम संख्या 9 आहे.
(26) एक अंकी लहानात लहान संख्या 1 आहे.
(27) दोन अंकी लहानात लहान संख्या 10 आहे.
(28) तीन अंकी लहानात लहान 100 आहे.
(29) चार अंकी लहानात लहान संख्या 1,000 आहे.
(30) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे.
(31) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे.
(32) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे.
(33) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 999 आहे.
(34) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक एकूण 11 वेळा येतो.
(35) 1 ते 100 पर्यंत  1 हा अंक एकूण 21 वेळा येतो.
(36) मीटर हे लांबी मोजण्याचे मुख्य परिमाण आहे. 
(37) लीटर हे धारकता / पातळ पदार्थ मोजण्याचे मुख्य परिमाण आहे.
(38) ग्रॅम हे वजन मोजण्याचे मुख्य परिमाण आहे.
(39) काल मोजण्यासाठी तास, मिनिट, सेकंद, दिवस, महिना, वर्ष इत्यादी एकके वापरतात.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 /  7721941496