माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 8 December 2017

आमच्या मनातील कुतूहल(का व कसे ?)

(१) दव म्हणजे काय  ?

- रात्रीच्या वेळी जमीन थंड होताच तिच्याजवळ
असणारी हवेतील वाफही थंड होते. त्याबरोबर
या वाफेचे रूपान्तर पाण्यात होऊन ती जवळ-
च्या वस्तूवर साचते. खडक, जमीन, वनस्पती,
छप्पर यांवर पाण्याचा पातळसर थर साचून
राहतो. पानांवर पाणी थेंबांच्या रूपात साचते.
आपण त्यांना 'दवबिंदू ' असे म्हणतो. ' दव
पडले ' असे आपण म्हणतो ते बरोबर नाही.
दव साचले असेच म्हटले पाहिजे.जमिनीवरील
थंड वस्तूंवर ते रात्रभर राहते. सूर्योदयाबरोबर
पानांवर ते चकाकू लागते. सूर्य वर येताच
वस्तू तापतात आणि त्यावरील दवाची वाफ
होते. रात्र होताच हवेतील थंडाव्यामुळे या
वाफेचे दव बिंदू होतात. दव निर्माण होण्यासाठी
हवेत उबदार आर्द्रता असावी लागते. अशी
हवा थंड पृष्ठभागाच्या सान्निध्यात असावी
लागते. दव बिंदू पाने, गवत यांवर दिसते.

(२)नवे कपडे धुतल्यानंतर का आक्रसते  ?
-- कापड तयार करताना शेवटच्या टप्प्यात
त्यावर स्टार्चची क्रिया केली जाते. त्यामुळे
कापड कडक बनते. असे नवे कापड जेव्हा
आपण पाण्यात टाकतो. तेव्हा त्यावरचे स्टार्च
निघून गेल्याने कापडाचे धागे सैल होतात व ते
एकमेकांच्या जास्त जवळ येतात.
   कापडाचे धागे एकमेकांच्या जास्त जवळ
आल्याने कापड आक्रसते.

संकलन:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                 ९४२२७३६७७५

Tuesday, 5 December 2017

शोध घ्या . (सामान्यज्ञान )

(१)चलनी नोटांचा कागद कसा तयार
     केलेला असतो  ?
-- आपल्या देशात चलनी नोटा या कापसाचा
 लगदा, तेरड्याचे खोड आणि खास प्रकारचे
 रंग वापरून तयार केल्या जातात. काही नोटा
स्टार्चमिश्रित कागद आणि त्यात कापड तयार
करायचे धागे वापरूनही केल्या जातात. नोटा
तयार करते वेळी त्यांना जिलेटीनचा थर दिला
जातो. त्यामुळे त्या कुरकुरीत व कडक
राहतात.
-------------------------------------------------
(२) ' मोती ' हे रत्न कसे मिळवतात  ?
-- ' मोती ' हे रत्न शिंपल्यात बनते. नैसर्गिकरीत्या
 कोणताही परकीय कण प्रजातीच्या शिंपल्यात
शिरला की, त्याच्या सभोवताली कॅन्कर नावाच्या
पदार्थाचे थर टाकले जातात. त्यातून मोती तयार
होतो. कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत पर्ल आॅयस्टर
या शिंपल्यासारख्या प्राण्याच्या शरीरात मणीवजा
वस्तू टाकली जाते आणि त्याच्या वर हा प्राणी
कॅन्करची आवरणे टाकतो. अशा रितीने कल्चर्ड
मोती तयार केला जातो.

--------------------------------------------------
(३) मीठ कसे तयार करतात  ?
-- मीठ समुद्राच्या किनारी असलेल्या मिठागरांत
 तयार होते. मिठागरे समुद्रकिनारी उथळ जागेत
असतात .समुद्राचे खारट पाणी या जागेत साठवून
ठेवले जाते. उन्हाने या पाण्याचे बाष्पीभवन होते.
बाष्पीभवनने साठवून ठेवलेल्या सगळ्या
पाण्याची वाफ होते आणि त्या जागी मीठ शिल्लक
राहते.

--------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Sunday, 3 December 2017

आपल्या मनातील कुतूहल (सामान्यज्ञान)


(१)रीम हे कशाचे माप आहे ?

-- रीम हे कागद मोजण्याचे माप आहे.
   एका रीममध्ये ४८० कागद असतात.
------------------------------------------------

(२)पाणी आणि पेट्रोल यांचे मिश्रण कसे*
    *वेगळे कराल ?

-- पाणी आणि पेट्रोल हे पदार्थ एकमेकांत
   मिसळत नाहीत. ते एकत्र केल्यास त्यांचे
   दोन स्वतंत्र थर दिसतात. पेट्रोल हलके
   असल्यामुळे ते पाण्यावर तरंगते. नंतर ते
   अलगत बाजूला काढून घेता येते.
--------------------------------------------------

(३)एक मोजपट्टी आणि दोरी यांच्या साहाय्याने चेंडूचा परीघ कसा मोजाल  ?

-- चेंडूच्या मध्यभागाभोवती दोरी गुंडाळावी
   लागेल. जेवढी दोरीची लांबी होईल, तेवढा
   चेंडूचा परीघ असेल.
-----------------------------------------------------

(४)मालमोटारींमध्ये भरून आणलेल्या ऊसाचे वस्तुमान कोणत्या एककात नोंदवतात  ?

-- वस्तुमान टनामध्ये किंवा क्विंटलमध्ये
  मोजतात.
--------------------------------------------------

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि. धुळे
                  ९४२२७३६७७५