माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 4 December 2020

म्हणजे काय ? (अनेक शब्दांबद्दल एक शब्द )


(१) चंद्रापासून येणारा प्रकाश.

--- चांदणे

(२) लग्नात द्यावयाची भेट.
--- आहेर

(३) गुप्त बातम्या काढणारा.
--- गुप्तहेर

(४) नाणी तयार करण्याचा कारखाना.
--- टंगसाळ

(५) सापाचा खेळ करणारा.
--- गारूडी

(६) फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरूंद वाट.
--- पाऊलवाट

(७) तीन रस्ते एकवटतात ती जागा.
--- तिठा

(८) अस्वलाचा खेळ करणारा.
--- दरवेशी

(९) पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ.
--- पेय

(१०) दगडावर कोरलेला लेख.
--- शिलालेख

(११) नव-या मुलाची आई.
--- वरमाय

(१२) चांदणे असलेला पंधरवडा.
--- शुक्लपक्ष

(१३) अंधा-या रात्रीचा पंधरवडा.
--- कृष्णपक्ष

(१४) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख.
--- ताम्रपट

(१५) चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
--- बेट

(१६) माकडाचा खेळ करून दाखवणार.
--- मदारी

(१७) चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
--- चौक

(१८) कविता करणारा / रचणारा.
--- कवी

(१९) कविता करणारी.
--- कवयित्री

(२०) कुस्ती खेळण्याची जागा.
--- आखाडा
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 3 December 2020

सामान्य विज्ञान प्रश्नावली

     
(१) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सियस असते ?
उत्तर -- ३७ ° अंश सेल्सियस

(२) माणसाच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?
उत्तर -- ७२

(३) कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?
उत्तर -- ओ ( O )

(४) मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते ?
उत्तर -- २०६

(५) मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
उत्तर -- २४

(६) मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते ?
उत्तर -- ३३

(७) पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास
इजा होते ?
उत्तर -- मज्जासंस्था

(८) प्लेग हा रोग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ?
उत्तर -- उंदीर

(९) सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे काय होते ?
उत्तर -- बाष्पीभवन

(१०) समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?
उत्तर -- पाण्यातील भूकंप

(११) मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के रक्त शरीरात असते ?
उत्तर -- ९ %

(१२) शुध्द सोने किती कॅरेटचे असते ?
उत्तर -- २४ कॅरेट
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५


Tuesday, 1 December 2020

स्पर्धा परीक्षा सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) कुठल्या शहरात सुप्रिध्द ताजमहल आहे ?
उत्तर -- आग्रा

(२) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे .
उत्तर -- दिल्ली

(३) शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर -- नांदेड

(४) महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला ?
उत्तर -- साबरमती

(५) अंदमान - निकोबार बेटांचे राजधानीचे शहर कोणते आहे ?
उत्तर -- पोर्ट ब्लेअर

(६) संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- अमरावती

(७) बिहू हे नृत्य कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- आसाम

(८) महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते ?
उत्तर -- धसई ( ठाणे )

(९) राष्ट्रीय पोलिस अकादमी कोठे आहे ?
उत्तर -- हैद्राबाद

(१०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी 'मोझरी '
कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अमरावती

(११) जागतिक बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर -- वाॅशिंग्टन

(१२) मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- परभणी
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५