माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 7 October 2022

दोन - दोन नावे सांगा.(सामान्यज्ञान)


(१) दगडाच्या फटीत राहणारे प्राणी.
 ---- विंचू , साप.
---------------------------------
(२) बिळात राहणारे प्राणी.
---- उंदीर, घूस.
---------------------------------
(३) झाडांवर राहणारे प्राणी.
---- माकड, पोपट.
---------------------------------
(४) घरटी बांधणारे पक्षी.
---- सुगरण, चिमणी.
---------------------------------
(५)  सजीवांचे गट.
---- प्राणी , वनस्पती.
---------------------------------
(६) पातळ पदार्थ.
---- दूध, पाणी.
---------------------------------
(७) गोड पदार्थ.
---- साखर, गूळ.
---------------------------------
(८) आंबट पदार्थ.
---- चिंच, ताक.
---------------------------------
(९) खारट पदार्थ.
---- मीठ, समुद्राचे पाणी.
---------------------------------
(१०) पाण्यात चालणारी वाहने.
----- होडी, जहाज.
---------------------------------
(११) सणांची नावे.
----- होळी, दिवाळी.
---------------------------------
(१२) डाळींची नावे.
----- तूरडाळ, मगूडाळ.
---------------------------------
(१३) कंदभाज्यांची नावे.
----- मूळा, सुरण.
---------------------------------
(१४) वेलींची नावे.
----- कारल्याचा वेल, भोपळ्याचा वेल.
---------------------------------
(१५) पाय नसलेले प्राणी.
----- साप, गांडूळ.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday, 5 October 2022

मानवी आरोग्य -- सामान्यज्ञान


१)मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर -- खारट

(२) चवीचे प्रकार किती आहेत ?
उत्तर -- चार

(३) दर मिनिटाला मानवी हृदय किती वेळा धडधडते ?
उत्तर -- ७२ वेळा

(४) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रथी कोणती ?
उत्तर -- यकृत

(५) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
उत्तर -- कानाचे हाड

(६) प्रौढ मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
उत्तर -- २०६

(७) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
उत्तर --  मांडीचे हाड ( फिमर )

(८) मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते ?
उत्तर -- जबड्याचे

(९) मानवाच्या छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात ?
उत्तर -- २४

(१०) मानवी जिभेचा कोणता रंग त्याच्या उत्तम आरोग्याचे लक्षण दर्शवतो ?
उत्तर -- गुलाबी

(११) मानवाला आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर --  ५२

(१२) मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीरभर फिरत असते ?
उत्तर -- रक्तवाहिन्या

(१३) पाठीच्या मणक्यामध्ये किती हाडे असतात ?
उत्तर -- ३३

(१४) मानवाला एकूण किती दूध दात येतात ?
उत्तर --  २०

(१५) जन्मानंतर किती महिन्यांनी बाळाला दात येतात ?
उत्तर -- सहा
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 2 October 2022

' र ' ची करामत ( ' र ' ची साखळी ) /सामान्यज्ञान


(१ )पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर 
(२) लिहिता , वाचता येणारा-- साक्षर 
(३) लिहिता - वाचता न येणारा - निरक्षर 
(४ )बातमी आणून देणारा -- वार्ताहर 
(४) वनात राहणारे प्राणी -- वनचर 
(५) जमिनीवर राहणारे -- भूचर 
(६) धान्य साठवण्याची जागा -- कोठार 
(७) जमिनीखालून गेलेला रस्ता -- भुयार 
(८) कथा(गोष्ट ) लिहिणारा -- कथाकार 
(९) दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार 
(१०) जादूचे खेळ करून दाखवणारा -- जादूगार 
(११) नाटक लिहिणारा -- नाटककार 
(१२) चित्रे काढणारा -- चित्रकार 
(१३) खूप दानधर्म करणारा  -- दानशूर 
(१४) शत्रूला सामील झालेला  -- फितूर 
(१५) शत्रूकडील बातम्या काढणारा -- हेर 
(१६) भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर 
(१७  )एक पाळीव प्राणी -- मांजर 
(१८) पाण्यातील एक प्राणी -- मगर 
(१९) झाडावर सरसर चढणारा प्राणी -- खार 
(२०) सरपटणारा एक  प्राणी  -- अजगर 
(२१) मसाल्याचा एक पदार्थ  -- केशर 
(२२) मोराची मादी  --    लांडोर 
(२३) मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
(२४) लोखंडी वस्तू तयार करणारा -   लोहार 
(२५) सोन्या -चांदीचे दागिने बनवणारा - सोनार 
(२६) मातीची मडकी बनवणारा --  कुंभार 
(२७)आजारी लोकांना औषधे देणारा -  डाॅक्टर 
(२८) लाकडी वस्तू तयार करणारा --  सुतार  
(२९) चामड्याच्या चपला बनवणारा - चांभार 
(३०) केळ्यांचा (घड) समूह -- लोंगर 
(३१) महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर 
(३२) एक कडधान्य -- मसूर 
(३३) एक बी असणारे एक फळ --  बोर 
(३४) एक शेंग भाजी  --  गवार 
(३५) या वनस्पतीपासून कात काढतात -- खैर 
(३६) हातमागावर कापड विणणारा   -- विणकर 
(३७) एक गोड पदार्थ  -- साखर 
(३८) खा-या पाण्याचा मोठा साठा -- महासागर 
(३९) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक - मीटर 
(४०) पाण्याचा एक स्त्रोत  -- विहीर
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
 जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा. 
 केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
  ९४२२७३६७७५