माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 5 November 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली

(१) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू 
-----------------------
(२) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर --  बुलढाणा 
----------------------

(३) अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ?
उत्तर -- रायगड 
-------------------------------------
(४) जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- गोदावरी 
-------------------------------------
(५) - - - - - हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात ?
उत्तर -- राज्यपाल 
-------------------------------------
(६) इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते ?
उत्तर -- कमला नेहरू 
-------------------------------------
(७) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर -- भारतरत्न 
-------------------------------------
(८) महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे ?
उत्तर -- लावणी 
-------------------------------------
(९) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे 
-------------------------------------
(१०) अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद 
-------------------------------------
(११) भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर -- डॉ बाबासाहेब आंबेडकर 
-------------------------------------
(१२) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर -- दादासाहेब फाळके 
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Friday, 4 November 2022

भाषिक सामान्यज्ञान प्रश्नावली


(1) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे 

(2) घोड्याच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला 

(3) कोंबडीच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे 

(4) उंदराच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ 

(5) चिमणीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे 

(6) सिंहाच्या निवा-यास काय म्हणतात ?
उत्तर -- गुहा 

(7) माणसाच्या निवा-यास  काय म्हणतात ?
उत्तर -- घर 

(8) वाघाच्या निवा-याला काय म्हणतात ?
उत्तर -- गुहा 

(9) गाई - गुरांना बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ?
उत्तर -- गोठा 

(10) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा 

(11) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ 

(12) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा 

(13) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेट 

(14) बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर --  हंबरणे 

(15) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- रेकणे 

(16) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू

(17) घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु 

(18) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा ,. बछडा 

(19) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू 

(20) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पाडस,  शावक 

(21) शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू 

(22) कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पिल्लू 

(23) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- छावा 

(24) मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- कोकरू 

(25) गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु 
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Tuesday, 1 November 2022

गणितीय प्रश्नावली ( स्पर्धा परीक्षा प्रश्नावली)


(1) एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील ?
उत्तर -- 576
-------------------
(2) 200  चे 25 % म्हणजे किती ?
उत्तर -- 50
------------------
(3) 80  रुपयांना अडीच डझन चिकू, तर पाच डझन चिकूंची किंमत किती रुपये?
उत्तर ---  160
-------------------------------------
(4) 1 +2 + 3+ 4 + 5  = किती ? (बेरीज करा)
उत्तर -- 15
-------------------------------------
(5) 45, 678  या संख्येतील  4 या अंकांची स्थानिक किंमत किती आहे ?
उत्तर --  40 ,000
-------------------------------------
(6) एकाच प्रकारच्या एक डझन खुर्च्यांची किंमत  2664 रूपये आहे, तर एका खुर्चीची किंमत किती ?
उत्तर -- 222
-------------------------------------
(7) 426  × 8  × 0  = ?
उत्तर -- 0
-------------------------------------
(8)  एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?
उत्तर -- 8
-------------------------------------
(9) 4 + 5 -- 3  + 1 -- 5 = किती ?
उत्तर -- 2
-------------------------------------
(10) एका संख्येच्या 50 % मधून 50 वजा केले असता 50 बाकी उरते, तर ती संख्या कोणती ?
उत्तर -- 200
-------------------------------------
(11) दीड तास = किती सेकंद ?
उत्तर -- 5400 सेकंद 
-------------------------------------
(12) एका चौरसाच्या बाजूची लांबी 8 से.मी. आहे. तर त्याची परिणती किती ?
उत्तर --  32 से. मी.
================÷========
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775