माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 9 November 2017

संकलित मूल्यमापन  (तोंडी/प्रात्यक्षिक)

विषय :- परिसर अभ्यास.  इयत्ता - तिसरी
-------------------------------------------------

  प्रश्न :- एका वाक्यात उत्तरे सांगा.

 १.आपल्या परिसरातील सजीवांची पाच
    नावे सांगा.

 २.आपल्या परिसरातील निर्जीव वस्तूंची
    पाच नावे सांगा.

३. चिमण्या काय खातात  ?

४. तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात.

५. सोंड असलेला प्राणी कोणता  ?

६. घराची राखण करणारा प्राणी कोणता  ?

७. शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी
    कोणता  ?

८. पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा
    प्राणी कोणता ?

९. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता  ?

१०. वाळवंटातील जहाज असे कोणत्या
      प्राण्याला म्हणतात ?

११. मेंढ्या कशासाठी पाळतात  ?

१२. वेगाने पळणा-या प्राण्यांची नावे सांगा.

१३. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते ?

१४.आपल्याला दूध कोणकोणत्या प्राण्यांपासून
      मिळते  ?

१५. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता  ?

१६. ' कोळी ' किड्याला किती पाय असतात ?

१७. बिळात कोणकोणते प्राणी राहतात ?

१८.पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावे सांगा ?

१९. पाण्यात विरघळणा-या पदार्थांची नावे सांगा.

२०. फुगा फुगवतांना फुग्यात तुम्ही काय भरता ?

२१. कोणत्या ऋतूत आमरस केला जातो  ?

२२. मुख्य दिशांची नावे सांगा.

२३. उपदिशांची नावे सांगा.

२४. पूर्व दिशेच्या समोरील दिशा कोणती  ?

२५. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती  ?

२६. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग
      होतो ?

२७. तुमच्या जिल्ह्य़ाचे नाव सांगा.

२८. तुमचे गाव कोणत्या तालुक्यात येते  ?

२९. काळाचे प्रकार सांगा.

३०. काळ मोजण्याची साधने कोणती  ?

३१.शेती व्यवसायास लागणारी अवजारे
     कोणती  ?

३२. गावात कोणकोणत्या वास्तू असतात  ?

३३. गाव कसे तयार होते  ?

३४. रस्त्यावरील वाहतुकीची साधने कोणती ?

३५.लोहमार्गावरील वाहतुकीची साधने कोणती ?

३६. जलमार्गावरील वाहतुकीची साधने कोणती ?

३७. हवाईमार्गावरील वाहतुकीची साधने
      कोणती ?

३८. संदेशवहनांची प्रमुख साधने कोणती  ?

३९. कोणत्याही दोन घाटांची नावे सांगा.

४०. कोणत्याही दोन नद्यांची नावे सांगा.

४१. वनस्पतीच्या मुख्य अवयवांची नावे सांगा.

४२. एका आठवड्याचे दिवस किती  ?

४३. भारतीय सौर वर्षाचे महिने किती  ?

४४. ग्रेगरियन वर्षाचे महिने किती  ?

४५. भूरूपांची नावे सांगा.

४६. पाय नसणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.

४७.कोणकोणत्या वनस्पतींपासून धागे मिळतात

४८. धरण कशाला म्हणतात ?

४९. वनांत कोणकोणते प्राणी आढळतात  ?

५०. वर्षाचे मुख्य ऋतू कोणते  ?

५१. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो  ?

५२. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो  ?

५३. आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?

५४. घरटी बांधण्यासाठी पक्षी कशाकशाचा
      वापर करतात ?

५५. घरटी न बांधणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा.

५६.आपल्या जेवणातील मुख्य अन्नपदार्थ
     कोणते ?

५७. पाण्याचे कोणकोणते उपयोग आहेत ?
--------------------------------------------------
  संकलक :-  शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                  ता. साक्री जि. धुळे
                    ९४२२७३६७७५

Sunday, 22 October 2017

विद्यार्थ्यांनो : खेळा...स्वतःला शोधा !


  सुट्टीचा अतिशय उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या
माझ्या बालमित्रानो आपली बुद्धीमत्ता
ओळखण्यासाठी आणि वाढविण्यासाठी
काही खेळ दिले आहेत. ते खेळा .काही
कृती करून बघा. इतरांची निरीक्षणं करा.
योग्यप्रकारे टी. व्ही.चा वापर करून बघा.

(१)कोणतेही मैदानी खेळ खेळा.

(२)गायन, वादन,नर्तन यांपैकी जे
     आवडेल ते शिका.

(३)जोरात पळणे,संथ चालणे,सायकल
    अशा वेगवेगळ्या शर्यती लावा.

(४)व्यायाम करा.

(५)नाच करा.

(६)कलाकुसरीची कामे,हस्तकलेच्या
    वस्तू तयार करा.

(७)आपल्या गावात/सोसायटीत इतरांच्या
    मदतीने एखादा कार्यक्रम स्वतः आखा.
    उदा. स्वच्छता मोहीम /झाडं लावणं -
    झाडं जगवणं.

(८)आजी -आजोबांचे अनुभव ऐका.
   त्यांच्या लहानपणीविषयी,शाळेविषयी
   माहिती काढा.

(९)घरात बसून टी. व्ही. बघण्यापेक्षा
    बाहेर पडा.

(१०)पुस्तकांमध्ये खूप विविधता असते.
    सगळे प्रकार बघा. चरित्र, जादूच्या
    गोष्टी, विज्ञानविषयक, कविता  इ.

(११)वाचलेल्या पुस्तकांविषयी कोणाशीतरी
      बोला.

(१२)छोट्या मुलांना जमवून गोष्टी सांगा.

(१३)शब्दकोडी,चित्रकोडी सोडवा.
      विविध भाषिक खेळ खेळा.

(१४)शक्य असल्यास नवीन भाषा शिका.

(१५)अंकांशी खेळा. फावल्या वेळात
       गणिती कोडी सोडवा.

(१६)घरातल्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार
      करा. जमाखर्च लिहा.

(१७)लहानांना गणित शिकवा.

(१८)जेवढी झाडं,फळं,फुलं ओळखू
     शकता त्या सर्वांविषयीची माहिती
     देणारी वही तयार करा.

(१९)निसर्गातल्या सर्वच घटकांविषयी
      सादर होणारे कार्यक्रम डिस्कव्हरी
      चॅनलवर बघा.

(२०)बी लावा. तिचं रोप कधी येतं ते बघा.
त्याची वाढ कशी होते,याचं निरीक्षण करा.    
   
(२१)चित्र काढायला आवडत असेल तर
      बघून चित्र काढण्यापेक्षा मनाने
      चित्र काढा.

(२२)वाद्य वाजवायला आवडत असेल
       तर ते शिका.

(२३) आपल्या अभ्यासाचं मूल्यमापन स्वतःच करा.

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
              ता. साक्री जि. धुळे
              📞९४२२७३६७७५

Sunday, 15 October 2017

प्रणाम तुम्हा कलाम चाचा


                   
देशाचे झाले तुम्ही मिसाईल मॅन
नाही विसरणार आम्ही तुमचे बलिदान

रामेश्वरम गावातून जन्मलेले भारतरत्न
सुर्य होऊन जळत राहिले तुमचे कठोर प्रयत्न

आकाशी उड्डाणाचा धरूनी तुम्ही ध्यास
अग्नीबाणाच्या रूपाने बनले तुम्ही व्यास

अग्नीबाणाच्या निर्मितीने जग चकीत झाले
तुमच्या कार्याचा डंका जगभर गेले

पृथ्वी,अग्नी ,नाग अशी क्षेपणास्त्रे तुम्ही निर्मिली
शक्तिशाली देशाची कीर्ती जगभर नेली

स्वप्न क्षेपणास्त्रे तयार करण्याचे पाहत होते
देशाच्या भविष्यासाठी कधी तुम्ही थकले नव्हते

देशाला उंच शिखरावर नेण्यासाठी केली आण
तन-मन अर्पण करूनी देशाची उंचावली मान

दूरदृष्टी अन् कार्य थोर, अलौकिक हे असे
तुमच्या कार्याने आपला देश जगात उठून दिसे

धन्य कलाम चाचा देशप्रेमाची तुमची महती
भारतासाठी आयुष्य वेचले, पावन झाली धरती

आपल्या विचाराने आम्ही देश घडविणार
देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करणार

  कवी :- शंकर सिताराम चौरे( प्रा.शिक्षक)
             पिंपळनेर ता.साक्री(धुळे )
                  ९४२२७३६७७५