माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 7 July 2019

चंदा आता इंग्रजी शिकू लागली.(गाणे )

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
आईला मदर
आणि वडीलांना फादर म्हणू लागली
बहिणीला सिस्टर    
आणि भावाला ब्रदर म्हणू लागली || १||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
टोपीला हॅट
आणि चटईला मॅट म्हणू लागली
मांजरीला कॅट
आणि उंदराला रॅट म्हणू लागली  ||२||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
पोपटाला पॅरट
आणि गाजरला कॅरट म्हणू लागली
चेंडूला बाॅल
आणि बाहुलीला डाॅल म्हणू लागली  ||३||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
घंट्याला बेल
आणि विहिरीला वेल म्हणू लागली
सूर्याला सन
आणि बंदूकीला गन म्हणू लागली  ||४||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
चंद्राला मून
आणि दुपारला नून म्हणू लागली
कोंबडीला हेन
आणि लेखणीला पेन म्हणू लागली  ||५||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
कोंबड्याला काॅक
आणि कुलूपाला लाॅक म्हणू लागली
नाकाला नोझ
आणि गुलाबाला रोझ म्हणू लागली  ||६ ||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
माशाला फिश
आणि ताटलीला डिश म्हणू लागली
ओठाला लिप
आणि मेंढीला शिप म्हणू लागली  ||७||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
टाचणीला पिन  
आणि डब्याला टिन म्हणू लागली
चहाला टी    
आणि समुद्राला सी  म्हणू लागली ||८||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
कोल्हयाला फाॅक्स   
आणि खोक्याला बाॅक्स म्हणू लागली
हाताला हॅन्ड
आणि  जमिनीला लॅन्ड म्हणू लागली ||९||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
धरणाला डॅम   
आणि मेंढ्याला रॅम म्हणू लागली
आगगाडीला ट्रेन      
आणि पाऊसाला रेन म्हणू लागली ||१०||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
झोपडीला हट      
आणि कापण्याला कट  म्हणू लागली
नळाला  टॅप     
आणि नकाशाला मॅप म्हणू लागली ||११||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
रेषेला लाईन  
आणि नऊला नाईन म्हणू लागली
थंडला कूल     
आणि लोकरला वूल म्हणू लागली ||१२||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
पैशाला मनी      
आणि मधाला हनी म्हणू लागली
थाळीला प्लेट     
आणि पाटीला स्लेट म्हणू लागली ||१३||

चंदा आता इंग्रजी शिकू लागली
भाताला राईस      
आणि बर्फाला आईस म्हणू लागली
भिंतीला वाॅल
आणि उंचला टाॅल म्हणू लागली  ||१४||
===========================
लेखन/कवी - शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
              पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
              📞९४२२७३६७७५

Friday, 5 July 2019

प्रश्न ऐका व एका शब्दात उत्तर द्या.

        भाषिक उपक्रम (तोंडी)

  ●   प्रश्न                   ----          उत्तर

(१) पोपट कसा  ?       --           हिरवा
(२) माती कशी  ?        --           काळी
(३) उन्हाळा कसा  ?    --            कडक
(४) समुद्र कसा  ?        --             निळा
(५) हत्ती कसा  ?         --      बलाढ्य , काळा
(६) नदी कशी  ?          --        लांब,  मोठी
(७) मुंगी कशी  ?          --    लहान, काळी, लाल 
(८) विहिर कशी  ?       --              खोल
(९) जमीन कशी  ?      --        सपाट,  काळी
(१०) बाग कशी  ?       --               सुंदर
(११) जंगल कसे  ?      --                दाट
(१२) मुलगी कशी  ?    --          हुशार , सुंदर
(१३) पर्वत कसा  ?      --               उंच
(१४) कुत्रा कसा  ?      --           इमानदार
(१५) पाणी कसे  ?      --          थंड,  गरम
(१६) झाड कसे  ?       --              हिरवे
(१७) अन्न कसे  ?        --          गरम , शिळे
(१८) कावळा कसा  ?  --              काळा
(१९) ससा कसा  ?      --               भित्रा
(२०) हवा कशी  ?        --                थंड
(२१) साखर कशी   ?   --                गोड
(२२) मोर कसा  ?        --                सुंदर
(२३) चिंच कशी  ?      --               आंबट
(२४) मीठ कसे  ?        --               खारट
(२५) हळद कशी  ?     --              पिवळी
(२६) थवा कुणाचा  ?   --            पक्ष्यांचा
(२७) मोळी कशाची  ?   --         लाकडाची

===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                  पिंपळनेर  ता. साक्री, जि. धुळे
              📞९४२२७३६७७५

Thursday, 4 July 2019

म्हणजे काय ? ( मराठी शब्दांची व्याप्ती  )


(१) अतिवृष्टी
--- खूप पाऊस पडणे.

(२) डोह
--- नदीतील खोलगट भागातील खोल पाणी.

(३) पूरग्रस्त
--- पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक.

(४) जलचर
--- पाण्यात राहणारे प्राणी.

(५) धबधबा
--- उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह.

(६) वावटळ
--- गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.

(७) संगम
--- दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण.

(८) उगम
--- नदीची सुरूवात होते ती जागा.

(९) अवर्षण
--- पाऊस मुळीच न पडणे.

(१०) जलचर
---  पाण्यात राहणारे .

(११) अभूतपूर्व
---  पूर्वी कधी घडले नाही असे.

(१२) पाणबुडी
---  पाण्याखालून चालणारी बोट.

(१३) नावाडी
---  होडी चालवणारा.

(१४) निर्वासित
---  घरदार नष्ट झाले आहे असा .

(१५) दुष्काळग्रस्त
---  दुष्काळात सापडलेले लोक .
   
===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५