माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 29 October 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली


(1) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?
उत्तर -- देवनागरी 

(2) फेसबुकचे संस्थापक कोण आहे ?
उत्तर -- मार्क झुकरबर्ग

(3) भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद 

(4) वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी 

(5) महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर -- नाशिक 

(6) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर -- बुध 

(7) 'साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक 

(8) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर -- कर्मवीर भाऊराव पाटील 

(9) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा 

(10) पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे ?
उत्तर -- नाथसागर 

(11) महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती ?
उत्तर -- सहा 

(12) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार 

(13)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
उत्तर -- महू (मध्यप्रदेश)

(14) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर -- यकृत 

(15)  भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा 
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Thursday, 27 October 2022

आदर्शाचा झरा - मालतीबाई पवार

मालतीबाई म्हणजे दयेचा सागर,
मालतीबाई म्हणजे मायेने भरलेली घागर.


मालतीबाई म्हणजे प्रेमळ माता,
मालतीबाई  म्हणजे संस्काराची गाथा.

मालतीबाई  म्हणजे पवार परिवाचे भूषण,
मालतीबाई‌ म्हणजे पवार परिवाची शान

मालतीबाई म्हणजे दया क्षमा, 
मालतीबाई  म्हणजे विश्वासाची तमा.

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा आदर्शाचा झरा,
मालतीबाई म्हणजे पवार  परिवाराचा तारा

मालतीबाई  म्हणजे पवार परिवाराचा आधार, 
.मालतीबाई  म्हणजे पवार परिवाराचा साथीदार.

मालतीबाई म्हणजे आदर्शाचे स्वरुप, 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा हुरुप,

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची करूणा
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा दागिना

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची सावली,
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची माऊली,

मालतीबाई म्हणजे पवार  परिवाराचा शिल्पकार 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा हुंकार,

मालतीबाई म्हणजे सहिष्णुतेच उदाहरण,
मालतीबाई म्हणजे न्यायाचं अनुकरण,

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची माय
मालतीबाई  म्हणजे पवार परिवाराचा हृदय 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची एकता 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची ममता 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा अभिमान
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा सन्मान 

मालतीबाई म्हणजे नाही फक्त नाव
मालतीबाई म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची शक्ती 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची भक्ती 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची धडपड 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा आधारवड
==============================
लेखन :- शंकर चौरे सर (पिंपळनेर )
९४२२७३६७७५

Saturday, 22 October 2022

प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्रश्नावली )


(1) प्राण्यांपासून न मिळणारे खाद्यपदार्थ कोणते?

1) दुध 
2) अंडी
3) मध  ✓
4) मास
-----------------
(2) शरीरात रक्तपुरवठा ...... या अवयवामुळे होतो.

1) जठर
2) मेंदू
3) फुफ्फुसे
4) हृदय ✓
------------------------------------------
(3) शरीरातील बाह्यइंद्रिय कोणते ?
1) फुफ्फुसे
2) हृदय
3) डोळे ✓
4) मेंदू
------------------------------------------
(4) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
1) कार्डिओग्राफ
2) स्टेथोस्कोप ✓
3) थर्मामीटर
4) अल्टिमीटर
------------------------------------------
(5)मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

1 ) जठर
2) यकृत ✓
3) हृदय
4) मोठे आतडे
------------------------------------------
(6) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान .....  सेल्सियस असते ?

1) 27 सेल्सि. 
2) 47 सेल्सि.
3) 37 सेल्सिअस 
4) 43 सेल्सि.
------------------------------------------
(7) रक्त गटाचा शोध कोणी लावला?

1) रॉबर्ट कुक
2) एडीसन
3) कार्ल लँडस्टायनर  ✓
4) फॅरेडे
------------------------------------------
(8)डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे
सांगतात? 

1) कावीळ ✓
2) खोकला
(3) ताप
4) मलेरिया
------------------------------------------
(9) तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार
होतो?

1) सुवर्ण
2) पितळ ✓
3) पारा
4) यापैकी नाही
------------------------------------------
(10)निरोगी माणसाचा रक्तदाब ..... एवढा असतो.

1) 80/120
2) 120/80 ✓
3) 140/60 
4) यापैकी नाही
===========================
उत्तरे :- (1) मध  (2) ह्रदय  ‌(3)  डोळे (4)  स्टेथोस्कोप 
(5) यकृत (6) 37 सेल्सिअस (7)कार्ल लॅडस्टायनर
(8) कावीळ  (9) पितळ (10) 120 / 80
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
9422736775