माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 4 June 2017

मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे

     मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे

शाळेतील माध्यम, घरातील माध्यम,परिसराचे
माध्यम हे एकच असेल;तर मुलाचे शिक्षण
सहज -सोपे,आकलन नीट होणारे आणि
आनंददायी होते.
  विचार,वृत्ती,भावना,कल्पना यांच्या आड
येणाऱ्या अवरोधांना दूर करण्याची शक्ती
मातृभाषेच्या आधाराने मिळते.

(१)अभिव्यक्तीची रंध्रे मोकळी करण्याचे
   काम मातृभाषा करते.

(२)कुठलेही मूल नव्या संकल्पना शिकताना
  आपल्या सरावाच्या भाषेत त्या सहजासहजी
  आत्मसात करते.

(३)मातृभाषेतून शिकल्याने मुलांच्या जाणिवा
  समृद्ध होतात,आकलनशक्ती विकसित होते.

(४)एखाद्या विषयाकडे बघण्याचा समज
    वृध्दिंगत होते.

(५)आपल्या मातृभाषेमध्ये आपले विचार व
    भावना व्यक्त करणे, हे मुलांसाठी जास्त
    नैसर्गिक व सहज असते.

(६)मातृभाषेतून शिकल्याने मुलांमधील उपजत
   गुणांची चांगली जोपासना होते.

(७)बोलण्याची/विचार करण्याची आणि
    शिक्षणाची भाषा एकच असल्याने शिक्षण
   आनंददायी होते.

(८)घरात ज्या भाषेत संवाद होतात,तीच भाषा,
   तेच वातावरण शाळेत मिळाले; तर मुलांना
   शाळा आपली वाटते,परकेपणा वाटत नाही.
   शाळा हे मजेचे स्थान आहे,असे मुलांना वाटते.

(९)मातृभाषेत शिकले तर अनेक गोष्टी -छंद,
  खेळ करायला संधी आणि वेळ मिळतो.

(१०)मातृभाषेतून शिकल्याने मुले आपापला
    अभ्यास करायला लवकर शिकतात.

(११)मातृभाषेतील शिक्षणामुळे विषयातील
     वेगवेगळ्या संकल्पना सहज कळतात.

(१२)व्यक्तीला विचार करण्याची शक्ती
      मातृभाषा देते.

   संकलन :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment