माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 6 August 2017

रक्षाबंधनाची उखाणे

            रक्षाबंधनाची उखाणे

🌟सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
    भाऊ आले रक्षाबंधनला भाग्य मला लाभले.

🌟रूसलेल्या बहिणीला भाऊ म्हणतो हास
    रक्षाबंधनला आलो, आजचा दिवस खास

  🌟 वडीलांचा आशीर्वाद मातेची माया
       प्रेमळ भाऊ मिळाले ही ईश्वराची दया

🌟सोन्याचे ताट,चांदीची वाटी
     सात जन्म घेईन मी भावासाठी

🌟कपाळाला कुंकू, गळ्यात मोत्याचा हार
   भावाला राखी बांधवांना आनंद होतो फार

🌟पतीव्रतेच व्रत घेऊन,नम्रतेने वागते
    रक्षाबंधनला भावाकडून आशीर्वाद मागते

🌟जाई जुईच्या वेलीखाली हरिण घेते विसावा
    राखी बांधते भावाला मला आशीर्वाद असावा

🌟राखी पौर्णिमेच्या सणाला पुरणपोळीचा मान
    भावाच्या सहवासात विसरते मी भूक तहान

🌟माहेर सोडून येतांना डोळ्यात येते आसू
    रक्षाबंधनला आले भाऊ ओठांवर आले हासू

🌟राजहंस पक्षी शोभा देतो वनाला
    भाऊ आला रक्षाबंधन सणाला

🌟ओल्याचिंब केसांना, टावेल द्या पुसायला
     भाऊ आले रक्षाबंधनला शालू द्या नेसायला
                      
                शंकर चौरे(प्रा.शि.)
                पिंपळनेर ता.साक्री(धुळे )
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment