माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 4 September 2017

सामान्यज्ञान

               सामान्यज्ञान

● इतिहासातील कालगणना :-
--- भूतकाळात घडलेल्या घटनांचा परस्पर-
संबंध असतो. या घटनांचा कालक्रम
ठरवण्यासाठी काळ मोजण्याच्या पद्धतीला
'कालगणना ' असे म्हणतात.
------------------------------------------------

●इसवी सन ' हा शब्द कसा तयार झाला ?

--- येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी
सनाची कालगणना सुरू झाली. येशू ख्रिस्तांना
अरबी भाषेत ' ईसा ' असे म्हणतात. ईसावरून
' इसवी ' असा शब्द तयार झाला. ' सन 'म्हणजे
'वर्ष ' किंवा  'साल '. या तऱ्हेने इसवी सन हा
शब्द तयार झाला.
--------------------------------------------------

●इसवी सन व झसवी सन पूर्व म्हणजे काय?

--- (१) येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी
सनाची कालगणना करतात.(२)येशू ख्रिस्तांच्या
जन्मानंतर घडलेल्या घटनांची कालगणना
म्हणजे ' इसवी सन ' होय, तर  (२) येशू
ख्रिस्तांच्या जन्माआधी घडलेल्या घटनांची
कालगणना म्हणजे ' इसवी सन पूर्व ' होय.
--------------------------------------------------

●इसवी सन ही कालगणना का आज जगभर का वारतात ?

---    आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांना
कालगणना करण्यासाठी सोईचे व्हावे, म्हणून
इसवी सन कालगणना आज जगभर वापरली
जाते.
--------------------------------------------------

● सन व शतक यात फरक कोणता ?

--- सनाच्या उल्लेखाने नेमक्या वर्षाचा बोध
होतो, तर शतकाच्या उल्लेखाने ढोबळमानाने
त्या शतकाच्या  (१०० वर्षांच्या) कालखंडाचा
बोध होतो.
--------------------------------------------------

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक )
                जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि. धुळे
                📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment