माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 4 October 2017

उपक्रम :-- घरातली भांडी

           
🔹आपल्या घरात कोणकोणती भांडी असतात,
त्याची यादी करा. त्या भांड्याचा वापर आपण
कशासाठी करतो ते लिहा.

भांड्यांचा प्रकार    -  उपयोग

१.पातेली       - भात,भाजी, आमटी शिजवणे.

२.तवा     -  चपात्या,पोळ्या शकणे.

३.कढई   - तळणीचे पदार्थ तयार करणे.

४.कुकर  - डाळ,तांदूळ एकाच वेळी कमी उर्जा
               वापरून शिजवणे,बटाटे उकडणे.

५.परात - पीठ शिजवणे,कणीक मळणे,धान्य     
              वाळवणे.
६.वेळणी - भांड्यावर झाकण म्हणून वापरणे.

७.कप - चहा,कॉफी, दूध अशी गरम पेये पिणे.

८.बशी-   गरम पेय गार करण्यासाठी वापरणे,
             कपाला आधार असणे.
९.भगोणे - साय साठवून ठेवणे.

१०. फळी - फोडणी देणे.

११.ताटे - जेवण वाढण्यासाठी व खाण्यासाठी
               वापरणे.
१२.वाट्या - आमटी व इतर रसदार पदार्थ      
                 खाण्यासाठी.
१३.पेला - पाणी व इतर पेये पिणे.

१४.हंडा - पाणी भरून ठेवण्यासाठी वापरणे.

१५.कळशी - पाणी आणण्यासाठी व भरून
                  ठेवण्यासाठी वापरणे.
१६. तपेली - पाणी तापवण्यासाठी वापरणे.

१७. गाळणी - चहा,  सरबत गाळणे.

१८.चाळणी - पीठ व तृणधान्य चाळणे.

         संकलक :-
                    शंकर चौरे(प्रा.शि.)
                   जि.प.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री(धुळे )
                 📞९४२२७३६७७५
       

No comments:

Post a Comment