माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 30 November 2019

विद्यार्थ्यांनो सकारात्मक विचार करा.


● नेहमी सकारात्मक वृत्ती ठेवा

● कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहा.

● नेहमी सकारात्मक विचार करा.

● कुठल्याही गोष्टीची चांगली बाजू पाहा.

 ●आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा.

●नेहमी आशावादी राहा.

● नेहमी उज्ज्वल सकारात्मक भविष्याचा विचार करा.

● नेहमी  आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

● नेहमी जीवनातील चांगल्या गोष्टींकडे पाहा.

 ●आयुष्यात अनंत संधी उपलब्ध आहेत ,याचा
 विचार करा.

● आयुष्याकडे आशावादी, आनंदी व सकारात्मक नजरेतून पाहा.

● नेहमी चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

● नेहमी मानसिकदृष्टय़ा सशक्त राहा.

●जीवनात जे समोर उभे राहते त्याला सामोरे जा.

● नेहमी आनंदी, सकारात्मक राहा व इतरांशी मिसळून वागा.

●जीवनातील चांगल्या गोष्टींबाबत धन्यवाद माना.

● स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.

● लोकांना नेहमी सकारात्मक प्रतिक्रिया द्या.

● आपले नशीब आपल्या हातात आहे,याचा विचार करा.

● जीवनात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत.याचे भान ठेवा.

● प्रत्येकामध्ये काही चांगले गुण असतातच, असा विश्वास ठेवा.

● स्वतः  स्वतःवर विश्वास ठेवा.

● जे काही करीन त्यात यशस्वी होणार याचा विश्वास ठेवा.
=============================
     श्री. शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
     काकरपाडा (चौपाळे) ता. साक्री जि. धुळे
     ९४२२७३६७७५

  

Friday 29 November 2019

शोधा पाहू माझा जोडीदार ! (सामान्यज्ञान )


(१) चिनी माती  =  बरण्या, मुखवटे बनविणे.

(२) शाडू माती  =  पुतळे,  मूर्ती बनविणे.

(३) टेराकोटा माती =  कुंड्या बनविणे.

(४) मुलतानी माती =  सौंदर्य प्रसाधने बनविणे.

(५) सूर्यफूल  =  तेलबिया

(६) मेथी  =  पालेभाजी

(७) अडुळसा   = औषधी वनस्पती.

(८) अंबाडी  = धागे देणारी वनस्पती

(९) उंट   = प्रवासी वाहतूक.

(१०) मुळा  = जमिनीत येणारी भाजी.

(११) इडली  = आंबलेला पदार्थ.

(१२) कंगवा  = केस विंचरणे.

(१३) दंतमंजन  = दात घासणे

(१४) नेलकटर  = नखे कापणे.

(१५) लोकर  = मऊ पदार्थ.

(१६) लोखंड  = कठीण पदार्थ.

(१७) पाणी  = द्रवपदार्थ.

(१८) दगड  =  स्थायू पदार्थ.

(१९) स्वयंपाकाचा गॅस = वायू पदार्थ.

(२०) पेट्रोल  = खनिज तेल.

(२१) दगडी कोळसा = खनिज

(२२) जनावरांचे शेण  = नैसर्गिक खत.

(२३) सुपरफाॅस्फेट/ युरिया = कृत्रिम खत.

(२४) ब्लीचिंग पावडर = पाण्याचे निर्जंतुकीरण.

(२५) लसीकरण = रोगप्रतिबंधक उपाय.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
              ९४२२७३६७७५

Thursday 28 November 2019

विविध ऋतूंचे आपल्या जगण्यावर होणारे परिणाम समजावून घेऊया.


● विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा
   आपल्या जगण्यावर होणारा परिणाम पुढील
   प्रमाणे थोडक्यात सांगाता येईल.

  (१) पावसाळा --

---   सतत पावसामुळे दैनंदिन कामकाजावर 
 परिणाम होतो. पावसामुळे गटारे तुडुंब भरतात.
 मानवाला प्रवास करतांना त्रास होतो. पिण्याचे
 पाणी दूषित, गढूळ असते. त्यामुळे कावीळ,काॅलरा,
 विषमज्वर यासारखे रोग होतात.  पावसाळ्यातील
 कोंदड व दमट वातावरणामुळे अन्नावर लवकरच
 बुरशी येते. ते अन्न खाण्यायोग्य राहात नाही. तसेच
 या ऋतूमध्ये जड आहार घेण्याऐवजी पचायला
 हलका असा आहार घेतो. पाणी उकळून थंड करून
 आपण पितो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू नष्ट 
 होतात.
-----------------------------------------------------
(२) हिवाळा --

---  हिवाळा या ऋतूत हवामान थंड असते. या
 हवामानात वेगवेगळे फळे, भाजीपाला मिळतो.
 त्यामुळे मानवाची प्रकृती चांगली राहते.
 हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण
 लोकरीचे व उबदार कपडे वापरतो. शक्यतोवर
 उन्हात बसतो. शरीरात उष्णता निर्माण करणारे
 अन्नपदार्थ खातो.
-------------------------------------------------------
(३) उन्हाळा --

---  उन्हाळा या ऋतूत उष्ण हवामान असते. सर्वांना
 उन्हाचा त्रास होतो.  या उष्ण हवामानामुळे चक्कर
 येणे,  घाबरल्यासारखे होते. शरीराला घाम येतो.
 त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. या
 ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो. तसेच
 आपल्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करतो.
==============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Wednesday 27 November 2019

दोन - दोन नावे सांगा.(सामान्यज्ञान ) महाराष्ट्र

 
(१) किल्ले
---   रायगड,  जंजिरा,  कंधार.

(२) लेणी
---  अजिंठा,  वेरूळ , घारापुरी.

(३) थंड हवेची ठिकाणे
---  माथेरान,   महाबळेश्वर, पाचगणी.

(४) धार्मिक स्थळे
---  शिर्डी,   पंढरपूर, शेगाव.

(५) राष्ट्रीय उद्याने
---  ताडोबा,   संजय गांधी,  नवेगाव.

(६) समुद्रकिनारे
---  अलिबाग,  श्रीवर्धन,  गणपतीपुळे.

(७) पाण्याचे झरे
---  वज्रेश्वरी,   उपनदेव, उन्हवरे.

(८) कोकणात घेतली जाणारी फळे
---  फणस,   आंबा ,  काजू

(९) प्रमुख बंदरे
---     न्हावा - शेवा,   उरण,   देवगड.

(१०) वनोत्पादने
---   लाकूड,   डिंक,  वनौषधी.

(११) कोकणातील लोकांचे मुख्य व्यवसाय
---    शेती,  मासेमारी

(१२)  प्रमुख पर्वत
---   सह्याद्री,   सातपुडा

(१३) प्रमुख नद्या
---   गोदावरी,   कोयना , तापी.

(१४) सागर संपत्ती
---   शिंपले,   कोळंबी,  मीठ

(१५) खरिपाची पिके
---  ज्वारी,  बाजरी, कापूस

(१६) कोकण किनारपट्टीवर खाड्या
---    धरमतर,   दाभोळ,   जयगड

(१७) प्रमुख घाट
---   थळघाट,   अंबोली घाट,  ताम्हाणी घाट.

(१८) जलविद्युत केंद्र
---   खोपोली,   जायकवाडी,   कोयना.

(१९) प्रमुख लोहमार्ग
---   मनमाड,   भुसावळ,   मुंबई.
=============================

संकलक :- शंकर चौरे (प्रा. शिक्षक)धुळे
            ¤ ९४२२७३६७७५- पिंपळनेर

तीन साथीदार   (समानार्थी शब्द ) 

            
गर्व घमेंड अहंकार
बळ सामर्थ्य जोर
विनाश नाश संहार
अंत शेवट अखेर

काळोख तिमिर अंधार
निर्दय निष्ठूर कठोर
राक्षस दानव असूर
संघर्ष युद्ध समर

धनुष्य कोंदड चाप
पिता वडिल बाप
भूपती नरेंद्र भूप
संतोष क्रोध कोप

अनर्थ अरिष्ट संकट
एकी एकता एकजूट
समुदाय जमाव गट
कथा कहाणी गोष्ट

नायक पुढारी नेता
विवंचना काळजी चिंता
जिव्हाळा माया ममता
प्रज्ञा रयत जनता

चाणाक्ष हुशार चतुर
किमया जादू चमत्कार
कठीण दुर्धर कठोर
सुलभ सोपा सुकर

ज्येष्ठ मोठा वरिष्ठ
मार्ग पथ वाट
नजराणा उपहार भेट
दिमाख रुबाब ऐट
=========================
लेखक /कवी :--
 श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
काकरपाडा(चौपाळे) ता. साक्री जि. *धुळे*
   📞 ९४२२७३६७७५

Tuesday 26 November 2019

सामान्यज्ञान  ( राज्यशास्त्र )


(१)महाराष्ट्र राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण आहे ?

---  राज्यपाल
------------------------------------------------
(२) राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात  ?

---   राष्ट्रपती
------------------------------------------------
(3) राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?

---   मुख्यमंत्री
------------------------------------------------
(४) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते  ?

---  यशवंतराव चव्हाण
------------------------------------------------
(५) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे  ?

---   दिल्ली
------------------------------------------------
(६) राज्यपालाची नेमणूक कोण करतात  ?

---  राष्ट्रपती
------------------------------------------------
(७) पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो  ?

---  प्रांत अधिकारी
------------------------------------------------
(८) विधानपरिषदेचा सदस्यांचा कार्यकाल सामान्यः किती वर्षांचा असतो  ?

---  ६ (सहा )
------------------------------------------------
(९) राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा वापर कोणाच्या सल्ल्यानुसार करतात  ?

---  पंतप्रधान
------------------------------------------------
(१०) राष्ट्रपतीची निवड किती वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात येते  ?

---  ५ (पाच )
------------------------------------------------
(११) महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे  ?

---   मुंबई
------------------------------------------------
(१२) राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात  ?

---   भारताचे सरन्यायाधीश
------------------------------------------------
(१३) मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते  ?

---   राज्यपाल
------------------------------------------------
(१४) विधानसभेच्या सभासदाचा कार्यकाल किती
वर्षांचा असतो  ?

---   ५  (पाच )
------------------------------------------------
(१५) पंतप्रधानाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ?

---    राष्ट्रपती
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          पिंपळनेर ता.  साक्री  जि. धुळे
           ९४२२७३६७७५

Monday 25 November 2019

आपले भारतीय संविधान

     

१) भारतीय सविधान म्हणजे काय  ?

--  आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी तयार
 करण्यात आलेले नियम ज्या पुस्तकात एकत्रित
 आहेत, त्यास  ' भारताचे संविधान ' असे म्हणतात.

------------------------------------------------
(२) ' सविधान सभा ' कशास म्हणतात  ?

---  आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी
   जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या
   समितीला संविधान सभा ' असे म्हणतात.

------------------------------------------------
(३) भारतीय संविधानात नागरिकांसाठी कोणत्या
      गोष्टी नमूद केल्या आहेत  ?

---  भारतीय संविधानात नागरिकांसाठी हक्क व कर्तव्य नमूद केलेले आहेत.

------------------------------------------------
(४) भारतीय संविधान का निर्माण करण्यात आले  ?

---  आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी संविधान निर्माण करण्यात आले आहे.  राज्यकारभार  करताना लोकप्रतिनिधी संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत  नाही.  संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्यही सांगितली असल्याने नागरिकांनाही संविधानाचा  उपयोग होतो.
------------------------------------------------
(५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय
      संविधानाचे शिल्पकार म्हणतात.

---  संविधानातील  नियमांचा मसुदा तयार
   करण्यासाठी एक मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
   होते. त्यांनी संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे
   मोलाचे कार्य केले.  म्हणून डाॅ. बाबासाहेब यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात.

------------------------------------------------
(६)संविधान सभेने संविधानाचा स्वीकार कधी केला ?

---  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हे  संविधान स्वीकारले.

------------------------------------------------
(७) भारतीय संविधानाची अंमलबजावणी  सुरू
     कधी  करण्यात आली  ?

-- आपल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० या दिवसापासून सुरू करण्यात आली.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
          ९४२२७३६७७५
     
     

Sunday 24 November 2019

भारतातील विशेष  (सामान्यज्ञान )


(१) भारताचा राष्ट्रीय प्राणी  = वाघ

(२) भारताचा राष्ट्रीय पक्षी  = मोर

(३) भारताचे राष्ट्रीय फूल  = कमळ

(४) भारताचा राष्ट्रीय खेळ  = हाॅकी

(५)भारताची राष्ट्रीय लिपी = देवनागरी

(६) भारताची राष्ट्रीय भाषा = हिंदी

(७)भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य = सत्यमेव जयते.

(८) भारताचे सर्वोच्च पद = ,राष्ट्रपती.

(९)भारताचे सर्वोच्च शौर्य पुरस्कार = परमवीर चक्र.

(१०)भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार = भारतरत्न

(११ ) भारताचे राष्ट्रगीत  = जनगणमन

( १२) भारताचा राष्ट्रीय वृक्ष  = वड

( १३) भारताचे राष्ट्रीय फळ  = आंबा

(१४) भारताची राजधानी  = दिल्ली

(१५) भारताचे राष्ट्रीय गीत = वंदेमातरम्

(१६) भारताचा राष्ट्रध्वज  =  तिरंगी झेंडा

(१७) भारतातील सर्वात सुंदर इमारत = ताजमहाल.

(१८) भारताचा स्वातंत्र्यदिन = १५ आॅगस्ट

(१९) भारताचा प्रजासत्ताक दिन = २६ जानेवारी

(२०) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी = डाॅल्फिन

(२१)भारताची राजमुद्रा - चार सिंह असलेली मुद्रा

(२२) भारताची राज्यपध्दती = संघराज्य

(२३) भारताची राज्यकारभार पध्दती = लोकशाही.

(२४)भारताचा झेंडागीत=विजयी विश्व  तिरंगा प्यारा.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          पिंपळनेर ता. साक्री जि.  धुळे
           ९४२२७३६७७५

Friday 22 November 2019

VERB  -- ( व्हर्ब )  क्रियापदे

       
(1) Act -- अॅक्ट -- अभिनय करणे.
(2) Answer - अन्सर -- उत्तर देणे
(3) Attack -- अटॅक -- हल्ला करणे
(4) Buy -- बाय --  विकत घेणे.
(5) Care -- केअर  -- काळजी घेणे.
(6) Clean  -- क्लिन -- स्वच्छ करणे.
(7) Cook -- कुक  -- शिजवणे.
(8) Copy -- काॅपी  -- नक्कल
(9) Drink -- ड्रिंक  -- पिणे.
(10) End  --  एंड -- शेवट करणे.
(11) Boil  -- बाॅईल  -- उकळणे.
(12) Fight -- फाईट -- मारामारी करणे.
(13) Fold -- फोल्ड  -- घडी घालणे.
(14) Insult -- इंन्सल्ट -- अपमान करणे.
(15) Jump -- जेम्प -- उडी मारणे.
(16) Kick -- किंक  -- लाथ मारणे.
(17) Knock -- नाॅक -- बुक्का मारणे.
(18) Look -- लूक  -- बघणे.
(19) Mark -- मार्क -- खुणा करणे.
(20) Need -- निड -- गरज भासणे.
(21) Order -- आॅर्डर -- आदेश देणे.
(22) Play --  प्ले -- खेळणे.
(23) Question - क्वेशन - प्रश्न विचारणे.
(24) Race -- रेस  -- भरधाव जाणे.
(25) Call  -- काॅल -- बोलावणे.
(26) Listen -- लिसन -- लक्षपूर्वक ऐकणे.
(27) Find  -- फाइन्ड -- शोधणे.
(28)  Read -- रीड -- वाचणे.
(29) See -- सी  -- पाहणे.
(30) Sleep -- स्लीप -- झोपणे.
(31) Watch -- वाॅच -- निरीक्षण करणे.
(32) Cry -- क्राय -- रडणे.
(33) Wake -- वेक -- जागे होणे.
(34) Bite -- बाईट -- चावणे.
(35) Drink  -- ड्रिंक -- पिणे.
(36) Eat  -- इट -- खाणे.
(37)Say  -- से -- म्हणणे.
(38) Sing  -- सिंग -- गाणे.
(39) Smile - स्माईल - स्मित हास्य करणे.
(40) Talk  -- टाॅक  - बोलणे.
(39) Climb -- क्लाईम -- चढणे.
(40) Catch -- कॅच  -- पकडणे.
(41) Pull  -- पूल  -- ओढणे.
(42) Sweep -- स्वीप  -- झाडणे.
(43) Throw -- थ्रो  -- फेकणे.
(44) Carry -- कॅरी  -- वाहून नेणे.
(45) Close -- क्लोज -- बंद करणे.
(46) Cut -- कट  -- कापणे.
(47) Clap -- क्लॅप -- टाळ्या वाजवणे.
(48)Draw -- ड्रा  -- रेखाटणे.
(48) Laugh -- लाफ -- हसणे .
(49) Fear  -- फिअर  -- घाबरणे.
(50) Get -- गेट  -- मिळवणे.
(51) Give -- गीव्ह  -- देणे.
(52) Make -- मेक  -- बनवणे.
(53) Open -- ओपन -- उघडणे.
(54) Pick -- पिंक -- उचलणे.
(55) Push -- पूश  -- ढकलणे.
(56) Win  -- विन  --  जिंकणे
(57) Laugh  --  लाफ   --  हसणे
(58) Mix  -- मिक्स  -- मिसळणे.
(59) Reach -- रीच -- पोहचणे.
(60) Dance -- डान्स -- नाचणे.
(61) Eat  -- इट  -- खाणे.
(62) Stop  - स्टाॅप  -- थांबणे.      
(63) Dig  -- डिंग  -- खणणे.        
(67) Keep  - किप  -- ठेवणे.       
(68) Tell  -- टेल  -- सांगणे.         
(69) Hit  --हीट  -- टोला मारणे.    
(70) Fall  -फाॅल - खाली पडणे.    
(71) Go  -- गो  -- जाणे.
(72) Speak -- स्पीक -- बोलणे.   
(73)  Swim -- स्वीम  -- पोहणे.   
(74) Sell  -- सेल  -- विकणे.
=========================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
           पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ९४२२७३६७७५

Thursday 21 November 2019

आपले गाव ते देश  ( सामान्यज्ञान )


(१) सरपंच
---  ग्रामपंचायतीचा प्रमुख.

(२) ग्रामसेवक
---  ग्रामपंचायतीचा सचिव.

(३) ग्रामसभा
---   गावकऱ्यांची सभा.

(४) ग्रामपंचायत
---  गावाचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(५) पंचायत समिती
---  तालुक्याचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(६) जिल्हा परिषद
---  जिल्ह्याचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(७) गटविकास अधिकारी
---  पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख .

(८) पंचायत समिती सभापती
--- पंचायत समितीचा कारभार नियंत्रण करणारे पदाधिकारी.

 
(९) जिल्हा परिषद अध्यक्ष
---  जिल्हा परिषदेचा पदाधिकारी

(१०) मुख्य कार्यकारी अधिकारी .
---  जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख.

(११) नगरपंचायत
---   लहान शहरात कारभार पाहणारी शासन संस्था.

(१२) नगराध्यक्ष
---   नगरपरिषदेचे पदाधिकारी / अध्यक्ष.

(१३) मुख्याधिकारी
---   नगरपरिषद प्रशासनयंत्रणेचा प्रमुख.

(१४) महानगरपालिका
---   महानगराचा कारभार पाहणारी शासन संस्था.

(१४) महापौर
---   महानगरपालिकेचा पदाधिकारी.

(१५) महानगरपालिका आयुक्त
---   महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख.

(१६) राज्यशासन
---   घटक राज्य पातळीवरील कारभार पाहते.

(१७) संघशासन
---   संपूर्ण देशाचा कारभार पाहते.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
              पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Wednesday 20 November 2019

सुतारकाम करणाऱ्या माणसाकडील हत्यारे व    त्यांचे उपयोग समजावून घेऊया.


   (   विषय -- कार्यानुभव )

● सुतारकामाचे हत्यार व त्यांचे उपयोग -
 
(१) तासणी
---  लाकूड तासायला

(२) हातोडा
---  खिळे ठोकण्यासाठी

(३) रंधे
---  लाकूड सरळ करण्यासाठी.

(४) गुण्या
---  लाकडाला खुणा करण्यासाठी.

(५) पटाशी
---  लाकूड छिलण्यासाठी.

(६) मोजपट्टी
---  मापे घ्यायला.

(७) करवत
---  लाकूड कापण्यासाठी.

(८) हातोडी
---  खिळे ठोकण्यासाठी.

(९) ड्रील मशिन
---  छिद्रे करण्यासाठी.

(१०) ग्राइंडिग दगड
---    धार काढण्यासाठी.

(११) तासणी
---    लाकूड तासायला.

(१२) अंबूर
---    खिळे काढण्यासाठी.

(१३) पक्कड
---    खिळे धरायला.

(१४) स्क्रू - ड्रायव्हर
---    खिळे,  स्क्रू पक्के करायला.

(१५) लेव्हल बाटली
---    समान अंतर घ्यायला.

(१६) लोखंडी कंपास
---    आकृती काढायला,  मापे घ्यायला.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.  शिक्षक )
          जि. प. प्रा. शाळा  - जामनेपाडा
          केंद्र - रोहोड  ता. साक्री  जि. धुळे
          ९४२२७३६७७५

Tuesday 19 November 2019

दिलेल्या शब्दाशी संबंधीत पाच शब्द सांगा /लिहा.


       ( मराठी भाषिक  -  उपक्रम )

● साहित्य :- शब्द चिठ्ठ्या

● कृती  :- प्रत्येक विद्यार्थ्यांने एक चिठ्ठी उचलून
        त्याच्यावरील शब्द वाचून,  त्या शब्दासंबंधी
        पाच शब्द सांगावी / लिहावी.

   जसे  --  विषय चिठ्ठ्या खालील प्रमाणे.
 (पैसे, झाड, पाणी, प्राणी,वर्ग, संगणक, शाळा
   अभ्यास,  नदी, टीव्ही, आकाश, खेळ, कापड,
   कला,  डोंगर, घर, रंग,  निसर्ग,  दवाखाना )

(१) पैसे
---  रूपये,   नाणी,    बॅक,  धनादेश   पगार
------------------------------------------------

(२) झाड
---  पाने,   फुले,    सावली,   फांदी,   फळ
------------------------------------------------

(३) पाणी
---  पिणे,  नदी,   समुद्र ,   तळे,   पाऊस 
------------------------------------------------

(४) प्राणी
---  पाळीव,   गाय,   गवत,  जंगली,   वाघ
------------------------------------------------

(५) वर्ग
---  विद्यार्थी,    शिक्षक,    फळा,   पुस्तक,   खडू
------------------------------------------------

(६) संगणक
---  की बोर्ड,  स्पिकर,   माऊस,  फाईल  
------------------------------------------------

(७) शाळा
---  इमारत , वर्गाखोल्या,  विद्यार्थी,  शिक्षक, मैदान
------------------------------------------------

(८)  अभ्यास
---  वाचणे    लिहिणे    ऐकणे   पेन  पुस्तक
------------------------------------------------

(९) नदी
---  पाणी,   गोदावरी,   समुद्र,  धरण,  पाऊस
------------------------------------------------

(१०) टीव्ही
---  बातम्या,   सिनेमा,    चित्र,   आवाज,   खेळ
------------------------------------------------

(११) आकाश
---    निळा,   तारे ,  चंद्र,  पाऊस,   इंद्रधनुष्य
------------------------------------------------

(१२) खेळ
---    कबड्डी,   क्रिकेट,  जिंकणे,  पराभव, चेंडू 
------------------------------------------------

(१३) कापड
---   शर्ट,   साडी,   रंग , पॅट,   टाॅय ,  धोतर
------------------------------------------------

(१४) कला
---   चित्र,   रंग,   ब्रश,   नृत्य,   सुंदर,   कलाकार
------------------------------------------------

(१५) धरण
---   पाणी,   मासे,   जायकवाडी,  माती,  खेकडे
------------------------------------------------

(१६) डोंगर
---   उंच,  झाडे,  गवत,   पक्षी,   कळसूबाई
------------------------------------------------

(१७) घर
---   दरवाजा,   खिडकी,  स्वयंपाक, खोली,  कुटुंब
------------------------------------------------

(१८) रंग
---    काळा,   पांढरा,   हिरवा,  सुंदर,   लाल
------------------------------------------------

(१९) निसर्ग
---   हवा,   झाडे,  पाणी,   सूर्य,    चंद्र,   रात्र
------------------------------------------------

(२०) दवाखाना
---   डाॅक्टर,   रोगी,   नर्स ,  आजार, वार्ड
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
          पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
          ९४२२७३६७७५

Monday 18 November 2019

बोलीभाषेचे गणिती रूप(शाब्दिक वर्णन आणि गणिती रूप


  शाब्दिक वर्णन       == गणिती रूप

(१) तीस अधिक वीस  = ३० + २०

(२)  अठरा वजा चार   = १८ -- ४

(३) नऊ गुणिले पाच   =   ९ × ५

(४)  ८ उणे  ३       =  ८ -- ३

(५)  ७ ,  २  ने वाढवले  = ७  +  २

(६) सहा चारदा   =  ६  ×  ४

(७) काही नाही    =   ०

(८) चारच्या पाच पट  =  ४  ×  ५

(९) ५  आणि जास्तीचे ३ =  ५  + ३

(१०) ४ ,  ९  पेक्षा कमी  =  ४ < ९

(११) तीनमध्ये आठ मिळवले  = ३ + ८

(१२) बाराचे तीन - तीनचे गट केले = १२ ÷ ३

(१३) चार लहान दहापेक्षा  = ४ < १०

(१४) तीन आणि सहामधील फरक = ६ - ३

(१५) १२ चे ३ समान भागांत वाटप = १२ ÷ ३

(१६) नऊमधून चार कमी  =   ९ -- ४

(१७) १५ अधिक  ३  =  १५ + ३

(१८) १६  गुणिले  ४   =  १६  ×  ४

(१९) ७ ,   ४  पेक्षा मोठी संख्या = ७ > ४

(२०) ५ ,  ११ पेक्षा लहान संख्या =  ५ < ११

(२१)  ७ च्या  ५ पट    =  ७  ×  ५

(२२)  ९  च्या  ५  पट   =  ९  ×  ५

(२३)  ८,   ५ ने वाढवले  =  ८ + ५
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
         पिंपळनेर  ता. साक्री जि. धुळे
         ९४२२७३६७७५

Saturday 16 November 2019

भारतातील सर्वांत पहिली महिला (सामान्यज्ञान)


(१)भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण  ?

---  इंदिरा गांधी

------------------------------------------------
(२)भारताची पहिली महिला आकाशयात्री (आंतरराळवीर) कोण  ?

---  कल्पना चावला
------------------------------------------------

(३) एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कोण  ?

---  बंचेंद्री पाॅल
------------------------------------------------

(४) आॅलम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली भारतीय महिला कोण  ?

---  कर्णम मल्लेश्वरी
------------------------------------------------

(५) भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण  ?

---  श्रीमती प्रतिभाताई पाटील

------------------------------------------------
(६) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण  ?

---  देविकाराणी
------------------------------------------------

(७) भारतातील पहिली महिला  आय. पी. एस. अधिकारी कोण  ?

---  किरण बेदी
------------------------------------------------

(८) भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण  ?

---  इंदिरा गांधी
------------------------------------------------

(९) भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण  ?

---  सरोजिनी नायडू
------------------------------------------------

(१०) भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेती पहिली महिला कोण  ?

---   आशापूर्णा देवी
------------------------------------------------

(११)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण  ?

---   मदर तेरेसा
==============================
संकलक  :-  शंकर सिताराम चौरे ( प्रा.शिक्षक)
           काकरपाडा  (चौपाळे ) ता. साक्री जि. धुळे
            ९४२२७३६७७५

Friday 15 November 2019

जगातील सर्वात मोठे, लहान, लांब (सामान्यज्ञान )


(१)जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता  ?
---  चीन

(२)जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता  ?
---  रशिया

(३) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता  ?
---  शहामृग

(४) जगातील सर्वात मोठी  (रूंद ) नदी कोणती  ?
---  अमेझाॅन

(५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता  ?
---  पॅसिफिक

(६) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती  ?
---  भारत

(७)जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश कोणता ?
---  भारत

(८) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते  ?
---  सहारा  (आफ्रिका )

(९)  जगातील सर्वात मोठे खंड कोणते  ?
---  आशिया

(१०) जगातील सर्वात लहान खंड कोणते  ?
---  ऑस्ट्रेलिया

(११) जगातील सर्वात लहान महासागर कोणते  ?
---  आॅक्टिक

(१२) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता  ?
---   हमिंग बर्ड

(१३) जगातील सर्वात लांब भिंत कोणती  ?
---   चीनची भिंत

(१४) जगातील सर्वात लांब नदी कोणती  ?
---  नाईल  (इजिप्त )
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
             ९४२२७३६७७५