माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 26 December 2019

भावनिक बुद्धिमत्ता -- प्रश्नावली

(१) पळण्याच्या शर्यतीत तुम्ही हरलात व तुमचा मित्र शर्यत जिंकला आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल ?
---  मी मित्राचे अभिनंदन करील.
-----------------------------------------------------
(२) तुम्ही नेहमी शाळेत जाणीवपूर्वक उशिर येता, म्हणून सरांनी तुम्हांला शिक्षा केली तर तुम्ही काय कराल  ?
---  पुन्हा उशीर करणार नाही असे पक्के ठरवेल.
-----------------------------------------------------
(३) तुमचा मित्र आजारी आहे, हे तुम्हांला कळल्यावर तुम्ही काय कराल  ?
---  आजारी आहे हे कळल्यावर भेटायला जाणार.
-----------------------------------------------------
(४)वर्गात मुख्याध्यापक आल्यास तुम्ही काय करता ?
---  उभे राहून  'नमस्ते ' करणार.
-----------------------------------------------------
(५) तुमच्याजवळ जेवणाचा डबा आहे. तुमच्या वर्गमित्राला खूप भूक लागली आहे. तुम्ही काय कराल ?
---  जेवणाचा डबा दोघे मिळून खाणार.
-----------------------------------------------------
(६) बसमध्ये तुम्ही बसलेले आहात, तुमच्या बाजूला एखादी अपंग व्यक्ती उभी आहे, तर तूम्ही काय करणार ?
---  मी माझी जागा त्याला बसायला देईन.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
            पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
            ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment