माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 3 May 2020

मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती प्रश्नावली )


● शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर आधारित प्रश्नोत्तरे वाचा व लिहा.


● खालील दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा.

(१) सुमित हुशार आहे.
उत्तर -- सुमित


(२) हिमालय सर्वात उंच पर्वत आहे.
उत्तर -- हिमालय

(३) केवढा मोठा हत्ती होता तो !
उत्तर -- हत्ती

(४) उथळ पाणी फार खळखळाट करते.
उत्तर -- पाणी

(५) हळद पिवळ्या रंगाची असते.
उत्तर -- हळद 


==============================

● खालील दिलेल्या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

(१) आदित्य खूप व्यायाम करतो. तो सुदृढ आहे.
उत्तर -- तो

(२) सानिया नेहमी शाळेत जाते. ती हुशार आहे.
उत्तर -- ती

(३) मुले सहलीला गेली. ती आनंदात परत आली.
उत्तर -- ती

(४) अभ्यास झाल्यावर त्याने दप्तर भरले.
उत्तर -- त्याने

(५) तोडलेले झाड बघून ते खूप दुःखी झाले.
उत्तर -- ते 

==============================

● खालील दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा.

(१) चंदना ही हुशार मुलगी आहे.
उत्तर -- हुशार

(२) उन्हाळ्यात कडक ऊन पडते.
उत्तर -- कडक

(३) सुप्रियाच्या आईने तिला लाल फ्राॅक आणला.
उत्तर -- लाल

(४) हत्तीला मोठे कान असतात.
उत्तर -- मोठे

(५) बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती.
उत्तर -- रंगीबेरंगी
==============================

● खालील दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा.

(१) आर्यन रोज शाळेत जातो.
उत्तर -- जातो

(२) एक होता शेतकरी.
उत्तर -- होता.

(३) एडिसन मोठा खटपट्या होता.
उत्तर -- होता.

(४) उद्या गावाहून आजोबा येतील.
उत्तर -- येतील

(५) रामजी हे भीमरावचे वडील होते.
उत्तर -- होते
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

1 comment: