माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 15 June 2020

मराठी व्याकरण -- लिंग ( पुल्लिंग, स्त्रीलिंग )


ज्या नामावरून ते पुरूषजातीचे (नर ) आहे की स्त्रीजातीचे ( मादी ) आहे, हे आपल्याला कळते. त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात.

● ज्या नामावरून पुरूष जातीचा बोध होतो, ते पुल्लिंग असते.
● ज्या नामावरून स्त्रीजातीचा बोध होतो, ते स्त्रीलिंग असते.
---- काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे.

पुल्लिंग = स्त्रीलिंग



बैल -- गाय
मुलगा -- मुलगी
कुत्रा -- कुत्री
राजा -- राणी
वाघ -- वाघीण
चिमणा -- चिमणी
घोडा -- घोडी
उंट -- सांडणी
मोर -- लांडोर
मेंढा -- मेंढी
रेडा -- म्हैस
वाघ -- वाघीण
बोकड -- शेळी
माळी -- माळीण
देव -- देवी
तरूण -- तरूणी
सासरा -- सासू
गायक -- गायिका
बालक -- बालिका
लेखक -- लेखिका
आजोबा -- आजी
पती -- पत्नी
वडील -- आई
नवरा -- बायको
पुत्र -- कन्या
बोका -- मांजर / भाटी
पिता -- माता
वर -- वधू
राजपुत्र -- राजकन्या
धोबी -- धोबीण
पोरगा -- पोरगी
नातू -- नात
नट -- नटी
युवक -- युवती
पुतण्या -- पुतणी
चुलता -- चुलती
बेडूक -- बेडकी
कोंबडा -- कोंबडी
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

1 comment: