माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 2 October 2020

भौमितिक आकृत्या -- त्रिकोण, चौरस, आयत, चौकोन ( प्रश्नावली )


(१) त्रिकोण म्हणजे काय ?
उत्तर :- तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला त्रिकोण
म्हणतात.

(२) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन

(३) त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- तीन

(४) त्रिकोणाला किती कोन असतात ?
उत्तर -- तीन

(५) शिरोबिंदू म्हणजे काय ?
उत्तर -- आकृतीच्या दोन बाजू जिथे मिळतात, त्या
बिंदूला शिरोबिंदू म्हणतात.

(६) चौरस म्हणजे काय ?
उत्तर :- चार समान लांबीच्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौरस म्हणतात.

(७) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार

(८) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार

(९) चौरसाला किती कोन असतात ?
उत्तर -- चार

(१०) चौरसाच्या चारही बाजू कशा असतात ?
उत्तर -- समान लांबीच्या

(११) चौरसाचे सर्व कोन ( चारही कोन ) कसे असतात ?
उत्तर -- काटकोन

(१२) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार

(१३) आयताला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार

(१४) आयताचे चारही कोन कोणत्या प्रकारचे असतात ?
उत्तर -- काटकोन

(१५) चौकोन म्हणजे काय ?
उत्तर -- चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौकोन म्हणतात.

(१६) चौकोनाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार

(१७) चौकोनाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार

(१८) चौकोनाला किती कोन असतात ?
उत्तर -- चार

(१९) चौकोनाला किती कडा असतात ?
उत्तर -- चार

(२०) चौकोनाचे प्रकार कोणते ?
उत्तर -- चौरस व आयत
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment