माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 15 December 2020

म्हणजे काय ? ( समानार्थी शब्द )


जंगल म्हणजे वन
भूमी म्हणजे जमीन
अरण्य म्हणजे रान
आकाश म्हणजे गगन

बाग म्हणजे उद्यान
ढग म्हणजे घन
दिवस म्हणजे दिन
पर्ण म्हणजे पान

संपत्ती म्हणजे धन
डोळा म्हणजे नयन
महा म्हणजे महान
कर्ण म्हणजे कान

घर म्हणजे सदन
गृह म्हणजे भवन
वस्त्र म्हणजे वसन
सोने म्हणजे कांचन

आहार म्हणजे भोजन
दुष्ट म्हणजे दुर्जन
देहान्त म्हणजे निधन
हत्या म्हणजे खून

वारा म्हणजे पवन
मासा म्हणजे मीन
नेत्र म्हणजे लोचन
नूतन म्हणजे नवीन

लोक म्हणजे जन
उदास म्हणजे खिन्न
दंग म्हणजे मग्न
विद्या म्हणजे ज्ञान
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५



No comments:

Post a Comment