माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 15 September 2021

खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर ४ ते ५ वाक्यात माहिती लिहा.



१.  आरसा

आरसा काचेपासून तयार करतात. काचेला एका बाजूला पारा लावतात. मग आरसा तयार होतो. आरशात आपला चेहरा पाहता येतो. म्हणून प्रत्येक घरात आरसा असतोच. आरसा खूप उपयुक्त वस्तू आहे.
--------------------------------------------------------------------
२.  समई

समई देवापुढे लावतात. तिच्यात कापसाची वात पेटवतात. समईत पाच किंवा सहासुद्धा वाती लावता येतात.
समईचा प्रकाश मंद असतो.
--------------------------------------------------------------------
 ३.  पणती

पणती मातीची बनवतात. तिच्यात तेल घालतात. त्यात कापसाची वात पेटवतात. पणतीचा प्रकाश मिणमिणता असतो. दिवाळीत पणत्यांची आरास करतात.
-----------------------------------------------------------------
४.  सिंह

सिंह अत्यंत देखणा आणि शक्तिमान प्राणी आहे. त्याच्या मानेवर आयाळ असते. त्याची नखे धारदार व सुळे बळकट असतात. तो गुहेत राहतो. तो जंगलाचा राजा आहे.
--------------------------------------------------------------------
५.  मगर 

मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी सरपटणारा मांसभक्षक प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो. तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात. कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही.
--------------------------------------------------------------------
६.   खेकडा 

खेकडा हा उभयचर प्राणी आहे. या प्राण्याला कणा नसतो, त्याला मान आणि डोकेही नसते. त्याला 8 पाय व संरक्षणासाठी दोन नांग्या असतात. खेकड्याच्या नांग्या तुटल्या तरी त्या काही काळाने पुन्हा उगवतात. त्याच्या पाठीवर कठीण आवरण असते.
--------------------------------------------------------------------
 ७.  शहामृग

शहामृग हा सर्वांत मोठा पक्षी आहे. तो इतर पक्षांप्रमाणे उडू शकत नाही. त्याचे पाय लांब व मजबूत असतात.  तो वेगाने धावतो व धावतांना दिशा बदलविण्यासाठी पंखांचा वापर करतो.
--------------------------------------------------------------------
८.   गुलाब ‌ ( गुलाब फूल )

गुलाब हे अत्यंत सुंदर फूल आहे. त्याचा रंग लाल, गुलाबी, पिवळा किंवा पांढराही असतो. त्याला अनेक सुंदर सुंदर आकार आहेत. त्याचा सुगंध मनाला आनंद देतो. म्हणून गुलाबाचे हारतुरे करतात. गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पण गुलाबाचे फायदेही आहेत. त्याच्यापासून अत्तर बनवतात. गुलकंद बनवतात. गुलाब हा फुलांचा राजाच आहे. 
================================
संकलक :--. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
         केंद्र -. रोहोड. ता.‌साक्री  जि.‌ धुळे
        ९४२२७३६७७

1 comment: