माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 21 August 2022

महाराष्ट्र : प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे



✓✓  महाराष्ट्रातील प्रमुख शहरे :

(१) ‌मुंबई 
 --- मुंबई राजधानीचे शहर, प्रमुख औदयोगिक केंद्र, उत्कृष्ट बंदर, मोठे शैक्षणिक केंद्र, गेटवे ऑफ इंडिया, तारापोर मत्स्यालय, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान केंद्र, नेहरू तारांगण, चौपाट्या ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
-----------------------
(२) पुणे
----- पुणे हे शहर प्रमुख सांस्कृतिक केंद्र, मुळा-मुठा नदयांच्या काठावर वसलेले, पुण्याजवळ शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राजा केळकर वस्तुसंग्रहालय, सर्पोदयान आहे. पुणे शहरात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा व वेधशाळा आहे.
-------------------------------------------------------
(३) नागपूर :
---- ‌नागपूर हे शहर राज्याची उपराजधानी, देशातील संत्र्यांची व कापसाची सर्वांत मोठी बाजारपेठ, सीताबर्डी किल्ला, दीक्षाभूमी, स्तूप, अंबाझरी तलाव ही प्रसिद्ध स्थळे आहेत.
----------------------------------------------------
(४) नाशिक :
---- नाशिक हे शहर गोदावरीच्या काठी वसलेले शहर, नोटा व तिकिटे छपाईसाठी प्रसिद्ध आहे.. येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. येथे दर १२ वर्षांनी नाशिकला कुंभमेळा भरतो.
-----------------------------------------------------
(५) औरंगाबाद
---- औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, बिबी का मकबरा व पाणचक्की ही प्रेक्षणीय स्थळे. औरंगाबादजवळच - अजिंठा व वेरूळ येथे लेणी, घृष्णेश्वराचे मंदिर, दौलताबादचा किल्ला आहे.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment