माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 27 September 2023

सामान्य विज्ञान ( सामान्यज्ञान )


(1) मानवी हृदयाला किती कप्पे असतात ?
उत्तर -- चार 
-----------------------
(2) धुम्रपानामुळे .... या अवयवांचा कॅन्सर होवू शकतो ?
उत्तर -- फुफ्फुस 
------------------------
(3) जिभेच्या शेंड्यावर कोणती चव समजते ?
उत्तर -- गोड
-----------------------------------
(4) डोक्यात एकूण किती हाडे असतात ?
उत्तर -- आठ
-----------------------------------
(5) ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?
उत्तर -- डेसिबल
-----------------------------------
(6) छातीचा पिंजरा किती हाडांनी बनतो ?
उत्तर -- पंचवीस 
-----------------------------------
(7) जिभेच्या पाठीमागील भागात कोणती चव समजते ?
उत्तर -- कडू 
-----------------------------------
(8) मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर -- खारट 
-----------------------------------
(9) काविळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर -- यकृत 
-----------------------------------
(10) शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते ?
उत्तर -- 8 %
-----------------------------------
(11) सर्व योग्य दाता कोणत्या रक्त गटास म्हटले जाते ?
उत्तर -- " O " रक्त गट
-----------------------------------
(12) जगात सर्वात कमी असलेला रक्तगट कोणता ?
उत्तर -- AB 
-----------------------------------
(13) सर्व ग्राही दाता म्हणून कोणता रक्त गट ओळखला जातो ?
उत्तर -- AB +
-----------------------------------
(14) रक्तदान केल्यानंतर किती महिन्यानंतर परत रक्तदान करता येते ?
उत्तर -- तीन महिन्या नंतर 
-----------------------------------
(15) पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात ?
उत्तर -- 5 व्या वर्षापर्यंत 
-----------------------------------
(16) रक्तदान करतांना किती रक्त घेतले जाते ?
उत्तर -- 300 मि. ली 
-----------------------------------
(17) मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर -- खारट 
-----------------------------------
(18) शरीरात रक्तपुरवठा कोणत्या अवयवामुळे होतो ?
उत्तर -- हृदय
-----------------------------------
(19) मानवी शरीराचे तापमान सर्वसामान्य किती सेल्सिअस असते ?
उत्तर -- 37 सेल्सिअस 
-----------------------------------
(20) लहान बाळाला दूधाचे दात कधी पासून येतात ?
उत्तर -- ६ महिने
-----------------------------------
(21) कोणत्या रक्तगटास जागतिक देणगीदार म्हणतात ?
उत्तर --  ओ  (O )
-----------------------------------
(22) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर -- यकृत 
-----------------------------------
(23) डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मूत्रपिंडाचे विकार
-----------------------------------
(24)पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात इजा होते ?
उत्तर -- मज्जासंस्था
-----------------------------------
(25) रक्त गटाचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- कार्ल लॅडस्टईनर
======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड , ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496

सामान्यज्ञान ( राष्ट्रवंदना )

Saturday 23 September 2023

भाषा ज्ञान ( इंग्रजी -- मराठी भाषाज्ञान )


(१)  ' कोर्ट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- न्यायालय 
------------------------
(२) ' ऑपरेशन ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- शस्त्रक्रिया 
---------------------
(३) ' न्यूजपेपर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- वर्तमानपत्र 
-----------------------------------
(४)  ' वेबसाइट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संकेतस्थळ 
-----------------------------------
(५)' ग्राऊंड ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- मैदान 
-----------------------------------
(६) ' गेम्स ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- खेळ 
-----------------------------------
(७) 'हाॅस्पिटल ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- रूग्णालय
-----------------------------------
(८) ' पेमेंट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- पगार , वेतन 
-----------------------------------
(९) ' नॅशनल ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- राष्ट्रीय 
-----------------------------------
(१०) ' प्लेअर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- खेळाडू 
-----------------------------------
(११) ' ट्रान्सलेशन ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता  ?
उत्तर -- भाषांतर 
-----------------------------------
(१२) ' कम्युनिकेशन ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संवाद 
-----------------------------------
(१३)  ' मुझिक ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संगीत
-----------------------------------
(१४) ' कंप्युटर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संगणक
-----------------------------------
(१५)  ' नर्स ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- परिचारिका
-----------------------------------
(१६) " डाॅक्टर ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- वैद्य
-----------------------------------
(१७) ' मोबाईल ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- भ्रमणध्वनी
-----------------------------------
(१८) ' मेसेज ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संदेश
-----------------------------------
(१९) ' वेबसाइट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- संकेतस्थळ
-----------------------------------
(२०) ' टेक्नॉलॉजी ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- तंत्रज्ञान
-----------------------------------
(२१) ' पेशंट ' या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता ?
उत्तर -- रूग्ण
======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Friday 22 September 2023

रोग / रोगांचे प्रकार ( सामान्यज्ञान )


(1) 'साथीचे रोग' कशास म्हणतात ?

---  (1) हवामान अचानक बदलले किंवा पिण्याचे पाणी दूषित झाले की, एकाच वेळी अनेकांना एकच रोग होतो. अशा रोगांना साथीचे रोग म्हणतात. (2) कॉलरा, विषमज्वर, इन्फ्ल्यूएंझा हगवण, डोळे येणे हे साथीचे रोग आहेत. 
=================

 (2) 'संसर्गजन्य रोग' कशास म्हणतात?

--- (1) रोग्याच्या सतत सहवासामुळे त्याच्या शरीरातले रोगजंतू हवेवाटे दुसऱ्या निरोगी माणसाच्या शरीरात शिरतात. अशा वेळी ज्या रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यांना संसर्गजन्य रोग म्हणतात. (2) सर्दी, खोकला, इन्फ्ल्यूएंझा हे संसर्गजन्य रोग आहेत.
=================

(3) क्षयरोग्याने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे का टाळावे ?

--- (1) क्षय हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. (2) भारतात दर दोन मिनिटांनी एक क्षय रोगपिडीत रुग्ण मरतो असा अंदाज आहे. (3) रोग्याच्या थुंकीतून क्षयकारक जीवाणू वातावरणात मिसळतात. (4) इतर लोकांना त्यामुळे क्षयाची बाधा होऊ शकते, म्हणून क्षयरोग्याने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.
=================

(4) कांजिण्या या रोगाचा प्रसार कसा होतो? त्याची लक्षणे कोणती? 
--- (1) कांजिण्यांचा प्रसार : कांजिण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. श्वासावाटे रोगाचा विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातो. त्यामुळे कांजिण्यांचा प्रसार होतो. तसेच रोग्याच्या संपर्कामुळे, त्याची भांडी किंवा कपडे वापरल्यामुळेही कांजिण्यांचा प्रसार होतो.
(2) कांजिण्यांची लक्षणे : (1) कांजिण्यांच्या विषाणूंची लागण झाल्यावर खूप ताप येतो. (2) डोके दुखते. (3) त्वचेवर लहान लहान फोड दिसू लागतात. हे फोड पाण्याच्या फोडासारखे दिसतात. (4) थोड्या दिवसांनी त्या फोडांवर खपल्या येतात.
=================

(5) संपर्कजन्य रोग' कशास म्हणतात ?

--- (1) रोग्याच्या सतत संपर्कामुळे आणि स्पर्शावाटे त्याच्या अंगातील रोगजंतू निरोगी व्यक्तींच्या शरीरात शिरतात. अशा व्यक्तींमध्ये या रोगजंतूंचा प्रादुर्भाव होऊन त्यांना जे रोग होतात, त्यांना संपर्कजन्य रोग म्हणतात. (2) खरूज, इसब, गजकर्ण, कुष्ठरोग हे संपर्कजन्य रोग आहेत.
=================

(6) रेबीज हा रोग कशामुळे होतो? रेबीजची प्रमुख लक्षणे कोणती? 
--- पिसाळलेला कुत्रा चावल्याने रेबीज हा रोग होतो. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या लाळेतून रेबीजचे विषाणू निरोगी माणसाच्या शरीरात गेल्यास रेबीज हा रोग होतो. कुत्र्याप्रमाणेच माकड, मांजर, उंदीर व ससे हे इतर प्राणी चावल्यामुळेही रेबीजच्या विषाणूंचा प्रसार होतो.

रेबीजची लक्षणे : (1) रेबीजची लागण झाल्यावर ताप येतो व तीव्र डोकेदुखी होते. (2) रोग्याच्या घशाचे स्नायू आकुंचित होऊन ताठरतात. त्यामुळे वेदना होतात. (3) घशातील वेदनांमुळे रोगी पाणी किंवा इतरही पातळ पदार्थ गिळू शकत नाहीत. (4) पाण्याची भीती वाटून रोगी बेभानावस्थेत जातो. (5) रोग्याचे हातपाय लुळे पडून आकडी येऊ शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास रोगी दगावण्याची शक्यता असते.
======================
संकलन :- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496

Tuesday 19 September 2023

ऐका आणि सांगा. ( भाषिक उपक्रम )


✓ तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा सांगता येणे.
( शिक्षकांनी ३ ते ५ वाक्यांचा मजकूर ऐकवावा. ऐकलेला मजकूर विद्यार्थ्यांनी परत सांगावा.)

ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
चिंच आंबट असते.
कारले कडू असते.
आवळा तुरट असतो.
-------------------------

ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
साबुदाण्याची खिचडी करतात.
-------------------------

गायी गोठ्यात बांधतात.
पक्षी घरट्यात राहतात.
उंदीर बिळात राहतो.
वाघ गुहेत राहतो.
कोंबडी खुराड्यात राहते.
-------------------------

पोपट हा पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवा आहे. 
त्याची चोच लाल आहे.
तो विठू विठू बोलतो.
पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात.
-------------------------

आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो. 
आम्ही पाण्याने अंघोळ करतो.
आम्ही पाण्याने कपडे धुतो.
आम्ही पाणी शेतासाठी वापरतो.
पाणी हे जीवन आहे. 
-------------------------

शाळेसमोर बाग आहे.
फुलांवर फुलपाखरे उडतात.
बागेमध्ये फुले आहेत.
 मधमाशी मध गोळा करते. 
पोळ्यामध्ये साठवून ठेवते.
===================
संकलक :- श्री. शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Monday 18 September 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?

उत्तर -- शहामृग
-------------------------
(२) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
-------------------------
(३) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा 
-------------------------
(४) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ‌?
उत्तर -- शेंगदाणा 
-------------------------
(५) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय
-------------------------
(६) फणसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- आठळी
-------------------------
(७) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- चिंचोका
-------------------------
(८) कापसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- सरकी 
-------------------------
(९) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट
-------------------------
(१०) गूळाची चव कशी असते ?
उत्तर -- गोड
-------------------------
(११) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर -- कडू
-------------------------
(१२) मीठाची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
-------------------------
(१३) आवळा या फळाची चव कशी असते ?
उत्तर -- तुरट 
-------------------------
(१४) मुख्य ऋतू किती आहेत ?
उत्तर -- तीन 
-------------------------
(१५) पृथ्वी कशी आहे ?
उत्तर -- गोल
-------------------------
(१६) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर -- सात 
-------------------------
(१७) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे
-------------------------
(१८) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा
-------------------------
(१९) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू
-------------------------
(२०) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे 
-------------------------
(२१) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
-------------------------
(२२) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड 
=======================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Sunday 17 September 2023

नातेसंबंध प्रश्नावली ( बुद्धिमत्ता चाचणी‌ )


(१) माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते. तर तुझी आई माझी कोण ?

------ (1) आत्या
------ (2) मावशी
------ (3) मामी ✓✓
------ (4) काकी
==================
(२) सुनिलची आई सुमितची आत्या लागते, तर सुमितची आई ही सुनिलचीच्या आईची कोण ?

------ (1) आत्या
------ (2) बहीण
------ (3) नणंद
------ (4) वहिणी ( भावजय) ✓✓
====================
(३) सुप्रियाची काकू ही जयेशची मामी आहे, तर जयेश सुप्रियाचा कोण ?

------ (1) मामे भाऊ
------ (2) चुलते भाऊ
------ (3) आते भाऊ  ✓✓
------ (4) मावस भाऊ 
====================
(४) सानियाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावाचे नाव सुमित आहे, तर सुमितला बहिणी किती ?

------ (1) दोन
------ (2) एक
------ (3) चार
------ (4) तीन ✓✓
===================
(५) सुमितचे वडिल हे अनिकेतच्या आईचे दीर लागतात; तर अनिकेतच्या वडीलांची बहिण ही सुमितची कोण ?

------ (1) मामी
------ (2) आत्या ✓✓
------ (3) काकी
------ (4) आजी
=======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496

Saturday 16 September 2023

भूगोल -- सामान्यज्ञान


(१) भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे ?
उत्तर -- हिमालय
-----------------
(२) खैबर खिंड कोठे आहे ?
उत्तर -- पाकिस्तान
------------------
(३) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
उत्तर -- गंगा नदी
-------------------------
(४) सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधला आहे ?
उत्तर -- नर्मदा
-------------------------
(५) भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे ?
उत्तर -- तारापूर
-------------------------
(६) कृष्णा नदी कोठून उगम पावते ?
उत्तर -- महाबळेश्वर 
-------------------------
(७) उकाई धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- तापी 
-------------------------
(८) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- खोपोली
-------------------------
(९) जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश कोणता ?
उत्तर -- भारत
-------------------------
(१०) भारताची सर्वात लांब भू - सीमा कोणत्या देशाबरोबर आहे ?
उत्तर -- बांग्लादेश
-------------------------
(११) भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे ?
उत्तर -- टिहरी धरण
-------------------------
(१२) भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ?
उत्तर -- हिराकुड धरण 
-------------------------
(१३) हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- महानदी (ओडिशा)
-------------------------
(१४) भारतात सर्वात जास्त चहा कोणत्या राज्यात उत्पादन केला जातो ?
उत्तर -- आसाम 
-------------------------
(१५) भारतात सर्वोत्तम चहा कोठे उत्पादन केला जातो ?
उत्तर -- दार्जिलिंग
-------------------------
(१६) भारतात सर्वांत जास्त ऊस उत्पादन करणारे राज्य कोणते ?
उत्तर -- उत्तरप्रदेश 
-------------------------
(१७) भारतात नैसर्गिक रबराचे सर्वांत जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
उत्तर -- केरळ 
-------------------------
(१८) जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता ?
उत्तर -- भारत
-------------------------
(१९) काश्मीरची सर्वात महत्त्वपूर्ण नदी कोणती आहे ?
उत्तर -- झेलम
-------------------------
(२०) नर्मदा आणि तापी नद्यांच्या मध्ये कोणता पर्वत आहे ?
उत्तर -- सातपुडा 
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Thursday 14 September 2023

नातेसंबंधांवर आधारित सामान्यज्ञान


(१) माझ्या आईचे बाबा माझे -- आजोबा
(२) माझा मावशीचे बाबा माझे -- आजोबा
(३) माझ्या मामाचे बाबा माझे -- आजोबा 
(४) माझ्या आईची आई माझी -- आजी
(५) माझ्या मावशीची आई माझी -- आजी
(६) माझ्या मामाची आई माझी -- आजी .
(७) माझ्या आईची सासू माझी -- आजी 
(८) माझ्या आईचे सासरे माझे -- आजोबा 
(९) माझ्या आईची नणंद माझी -- आत्या 
(१०) माझ्या आईची वहिणी माझी -- मामी
(११) माझ्या आईची मुलगी माझी - बहीण 
(१२) माझ्या मावशीची मुलगी माझी - बहीण 
(१३) माझ्या आईचा मुलगा माझा -- भाऊ
(१४) माझ्या आईची बहिण माझी - मावशी
(१५) माझ्या मामाची बहिण माझी - मावशी
(१६) माझ्या मावशीची बहिण माझी - मावशी 
(१७) माझ्या आईचा भाऊ माझा -- मामा
(१८) माझ्या मावशीचा भाऊ माझा - मामा 
(१९) माझ्या मावशीचा मुलगा माझा - मावसभाऊ 
(२०) माझ्या बहिणीचा मुलगा माझा - भाचा 
(२१) माझ्या आईचे दीर माझा - काका 
=========================
(२२) माझ्या वडिलांचे बाबा माझे -- आजोबा
(२३) माझ्या काकांचे वडिल माझे -- आजोबा
(२४) माझ्या आत्याचे बाबा माझे -- आजोबा 
(२५) माझ्या बाबांची आई माझी -- आजी 
(२६) माझ्या काकांची आई माझी - आजी
(२७) माझ्या आत्याची आई माझी - आजी 
(२८) माझ्या काकांचा मुलगा माझा - चुलतभाऊ 
(२९) माझ्या काकांची मुलगी माझी -- चुलतबहिण 
(३०) माझ्या आत्याचा मुलगा माझा - आतेभाऊ
(३१) माझ्या आत्याची मुलगी माझी - आतेबहिण 
(३२) माझ्या बाबांचा भाऊ माझा -- काका 
(३३) माझ्या आत्याचा भाऊ माझा -- काका 
(३४) माझ्या बाबांची बहिण माझी -- आत्या 
========================
लेखन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ /७७२१९४१४९६

Sunday 10 September 2023

" सोनीआई चौरे " यांच्या आठवणी निमित्त सामान्यज्ञान प्रश्नावली.


(१) महाराष्ट्र हे भारत देशातील .... आहे.
उत्तर -- राज्य .
---------------------------------
(२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६
---------------------------------
(३) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती  ?
उत्तर -- मुंबई
---------------------------------
(४) आपण कोणत्या राज्यात राहतो ?
उत्तर -- महाराष्ट्र
---------------------------------
(५) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?
उत्तर -- नागपूर
---------------------------------
(६) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
उत्तर -- १ मे , १९६०
---------------------------------
(७) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र 
---------------------------------
(८) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि. मी. आहे ?
उत्तर -- ७२० कि. मी.
---------------------------------
(९) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर -- रत्नागिरी 
---------------------------------
(१०) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे ?
उत्तर -- रायगड 
---------------------------------
(११) अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर 
---------------------------------
(१२) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर ( नाशिक)
---------------------------------
(१३) भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर -- भीमाशंकर
---------------------------------
(१४) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नागपूर 
---------------------------------
(१५) अजिंठा, वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ‌?
उत्तर -- औरंगाबाद 
---------------------------------
(१६) रायगड जिल्ह्यांचे पूर्वीचे नाव काय होते ?
उत्तर -- कुलाबा 
---------------------------------
(१७) सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- लाकडी खेळणी.
---------------------------------
(१८) जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी
---------------------------------
(१९) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार 
---------------------------------
(२०) नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- द्राक्षे
---------------------------------
(२१) न्हावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड 
---------------------------------
(२२) आंबोली हे पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
---------------------------------
(२३) तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय ?
उत्तर -- यशवंत तलाव 
---------------------------------
(२४) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?
उत्तर -- सातपुडा 
---------------------------------
(२५) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
---------------------------------
(२६) मूरूड - जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
---------------------------------
(२७) जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे ?
उत्तर -- जलदुर्ग
---------------------------------
(२८) दौलताबाद किल्ल्याचे पुर्वीचे नाव काय ?
उत्तर -- देवगिरी
---------------------------------
(२९) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर -- राहाता 
---------------------------------
(३०) गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रत्नागिरी
---------------------------------
(३१) महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?
उत्तर -- साल्हेर
---------------------------------
(३२) भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- गडचिरोली 
---------------------------------
(३३) जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
---------------------------------
(३४) कोणत्या किल्ल्यावर मेंढातोफ व दुर्गातोफ आहे ?
उत्तर -- दौलताबाद
---------------------------------
(३५) गिरणा व गोदावरी या दोन्ही प्रमुख नद्या - - - -  वाहतात.
उत्तर -- पश्चिमेकडून पूर्वेकडे 
---------------------------------
(३६) महाराष्ट्रात चलनी नोटा छापण्याचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर -- नाशिक 
---------------------------------
(३७) धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर -- पांझरा 
---------------------------------
(३८) रंकाळा तलाव कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर 
---------------------------------
(३९) नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- गोदावरी
---------------------------------
(४०) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई 
---------------------------------
(४१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर
---------------------------------
(४२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई शहर 
---------------------------------
(४३) महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर कोणते ?
उत्तर -- छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )
---------------------------------
(४४) औरंगाबाद शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- हिमरू शाली
---------------------------------
(४५) सोलापूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- चादरीसाठी 
---------------------------------
(४६) महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- कोल्हापूर 
---------------------------------
(४७) पन्हाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
---------------------------------
(.४८) ' गेट वे ऑफ इंडिया '  (भारताचे प्रवेशद्वार ) ही वास्तू कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई 
---------------------------------
(४९) छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई
---------------------------------
(५०) ' चिखलदरा ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अमरावती 
---------------------------------
(५१) ' आनंदवन प्रकल्प ' कोठे आहे ?
उत्तर -- वरोरा (चंद्रपूर )
---------------------------------
(५२) बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथे कोणाचा राजवाडा आहे ?
उत्तर -- श्री. लखुजी जाधव 
---------------------------------
(५३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांचे जन्मस्थान कोणते ?
उत्तर -- सिंदखेडराजा 
---------------------------------
(५४) पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते ?
उत्तर -- दादरा - नगर - हवेली 
-------------------------------
(५५) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी 
---------------------------------
(५६) पंढरपूर हे शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे ?
उत्तर -- चंद्रभागा ( भीमा)
-------------------------------
(५७) साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- नाशिक 
-------------------------------
(५८) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले 
-------------------------------
(५९) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
उत्तर -- मुंबई 
----------------------------------
(६०) छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
उत्तर -- शिवनेरी
---------------------------------
(६१) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल
---------------------------------
(६२ ) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा
------------------------------
(६३) महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता ?
उत्तर -- जारूळ
--------------------------------
(६४) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू ( मोठी खार )
--------------------------------------
(६५) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
------------------------------------
(६६) महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी
---------------------------------
(६७) नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तर -- साल्हेर
-----------------------------------
(६८) पन्हाळागड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
--------------------------------
(६९) रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
-------------------------------
(७०)बालक्रांतीकारक शिरीषकुमार यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
-----------------------------
(७१) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ?
उत्तर -- मुंबई 
-----------------------------
(७२) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर -- गंगापूर ( नाशिक )
---------------------------------
(७३) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?
उत्तर -- नाशिक 
---------------------------------
(७४) अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे ?
उत्तर -- वेरूळ 
---------------------------------
(७५)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर -- गोदावरी 
---------------------------------
(७६) ' ऊसतोड' कामगारांचा जिल्हा ' म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
उत्तर -- बीड
---------------------------------
(७७) लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- पुणे 
---------------------------------
(७८) नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे ?
उत्तर -- निफाड
---------------------------------
(७९) ' महाबळेश्वर ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
---------------------------------
(८०) ' माथेरान ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
---------------------------------
(८१) केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर -- जळगाव
---------------------------------
(८२)  ' हळद ' उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ?
उत्तर -- सांगली
---------------------------------
(८३) काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
---------------------------------
(८४) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
---------------------------------
(८५) घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
---------------------------------
(८६) तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- उस्मानाबाद
---------------------------------
(८७) ' भंडारदरा ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अहमदनगर
---------------------------------
(८८)  'लळिंग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
---------------------------------
(८९) 'शिवनेरी ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
----------‐-----‐---------------
(९०) 'तोरणा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
----------‐-----‐-------------
(९१) 'मुल्हेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक
----------‐-----‐----------
(९२) 'कंधार ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नांदेड
----------‐-----‐-------------
(९३) 'करमाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सोलापूर
----------‐-----‐------------
(९४) 'वसई ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर
----------‐-----‐---------
(९५) 'हरिचंद्रगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अहमदनगर
----------‐-----‐----------
(९६)' थाळनेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
----------‐-----‐----------
(९७) ' सिंहगड ' (कोंढाणा) किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
---------------------------------
(९८) कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर -- १ मे
---------------------------------
(९९) कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?
उत्तर -- महाबळेश्वर
---------------------------------
(१००) कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास मिळतात ?
उत्तर -- अरबी समुद्र 
=========================
लेखन / संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ /७७२१९४१४९६

Tuesday 5 September 2023

माझ्या जीवनातील गुरू " सोनीआई चौरे " यांच्या आठवणी निमित्त ' शिक्षकदिनी विशेष सामान्यज्ञान प्रश्नावली

(१) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर -- सात 
--------------------------------------
(२) आकाशाचा रंग कोणता ?
उत्तर -- निळा
---------------------------------
(३) तीळगुळ कोणत्या सणाला वाटतात ?
उत्तर -- मकरसंक्रांत 
----------------------------
(४) बैलांची पूजा कोणत्या सणाला करतात ?
उत्तर -- पोळा 
----------------------------
(५) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड 
---------------------------
(६) भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?
उत्तर -- तिरंगा
-----------------------------
(७) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर  -- कमळ
-----------------------------
(८) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर  -- मोर
-----------------------------
(९)भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ
-----------------------------
(१०) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हाॅकी
-----------------------------
(११) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर -- जनगणमन
-----------------------------
(१२) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर -- वंदे मातरम् 
-----------------------------
(१३) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
-----------------------------
(१४) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा
-----------------------------
(१५) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
-----------------------------
(१६) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- शेंगदाणा
----------------------------------------------
(१७) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत ?
उत्तर -- ३६
-----------------------------
(१८) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
-----------------------------
(१९) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा
-----------------------------
(२०) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
-----------------------------
(२१) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल
-----------------------------
(२२) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर --- कळसुबाई
--------------------------------
(२३) आपला राष्ट्रध्वज कोणता ?
उत्तर -- तिरंगा
----------------------------------
(२४) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर -- सोंड
--------------------------------
(२५) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
--- शहामृग
----------------------------------
(२६) एका दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर -- २४ तास 
--------------------------------------------------
(२७) नाताळचा सण कोणत्या महिन्यात असतो ?
उत्तर -- डिसेंबर 
----------------------------
(२८) पक्ष्यांना किती पाय असतात ?
उत्तर -- दोन 
----------------------------
(२९)कोणता पक्षी पिसारा फुलवून नाचतो ?
उत्तर -- मोर 
----------------------------
(३०) लांब मानेचा प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ 
----------------------------
(३१) सर्वांत मोठ्या कानांचा प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती 
----------------------------
(३२) वाळवंटात राहणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- उंट 
----------------------------
(३३) झाडावर तुरूतुरू चढणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- खार 
----------------------------
(३४) लांब पिसे असलेला प्राणी कोणता ?
उत्तर -- मोर 
----------------------------
(३५) गूळ कशापासून तयार होते ?
उत्तर -- ऊस 
----------------------------
(३६) साखर कशापासून तयार होते ?
उत्तर -- ऊस 
----------------------------
(३७) हरभ-याच्या पिठाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेसन 
----------------------------
(३८) पोपटाचा रंग कसा असतो ?
उत्तर -- हिरवा 
----------------------------
(३९) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे 
-----------------------------
(४०) कोंबडीच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे 
-----------------------------
(४१) चिमणीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे 
-----------------------------
(४२) सिंहाच्या निवा-यास काय म्हणतात ?
उत्तर -- गुहा 
-----------------------------
(४३) माणसाच्या निवा-यास  काय म्हणतात ?
उत्तर -- घर 
-----------------------------
(४४) वाघाच्या निवा-याला काय म्हणतात ?
उत्तर -- गुहा 
-----------------------------
(४५) गाई - गुरांना बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ?
उत्तर -- गोठा 
-----------------------------
(४६) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा 
-----------------------------
(४७) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ 
-----------------------------
(४८) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा 
-----------------------------
(४९) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेट 
-----------------------------
(५०) बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर --  हंबरणे 
-----------------------------
(५१) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- रेकणे 
-----------------------------
(५२) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू
-----------------------------
(५३) घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु 
-----------------------------
(५४) वाघिणीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा , बछडा 
-----------------------------
(५५) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू 
-----------------------------
(५६) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पाडस,  शावक 
-----------------------------
(५७) शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू 
-----------------------------
(५८) कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पिल्लू 
-----------------------------
(५९) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- छावा 
-----------------------------
(६०) मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- कोकरू 
-----------------------------
(६१) गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु 
----------------------------
(६२) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते  ?
उत्तर -- आंबा 
-----------------------------
(६३) कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ?
उत्तर -- काळा
------------------------------
(६४) सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे  .... होते ?
उत्तर --- बाष्पीभवन
-------------------------------
(६५) ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ?
उत्तर --- सूर्य
-------------------------------
(६६)  शुद्ध सोने किती कॅरटचे असते ?
उत्तर -- 24 कॅरेट 
-------------------------------
(६७) विमानांचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- राईट बंधू 
-------------------------------
(६८) कोळी या किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
-----------------------------
(६९) ' खजूर ''  या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक
-----------------------------
(७०) फांद्या नसलेल्या एका वनस्पतीचे नाव सांगा ?
उत्तर -- नारळ
-----------------------------
(७१) घरटी न बांधणा-या एका पक्ष्याचे‌ नाव सांगा ‌?
उत्तर --  कोंबडी
-----------------------------
(७२) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?
उत्तर --- कोळी
-----------------------------
(७३) सोंड असलेला प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती
-----------------------------
(७४) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- कुत्रा
-----------------------------
(७५) शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- बैल
-----------------------------
(७६) पाय नसणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- साप
-----------------------------
(७७) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- वटवाघूळ
-----------------------------
(७८) सहा पाय असणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- झुरळ
-----------------------------
(७९) सजीवांचे दोन गट कोणते ?
उत्तर -- प्राणी व वनस्पती 
----------------------------
(८०) आकाशात चांदण्या केव्हा दिसतात ?
उत्तर -- रात्री 
---------------------------------
(८१) बैलाच्या मादीला काय म्हणतात ?
उत्तर -- गाय
---------------------------------
(८२) कोकिळेने केलेला आवाज कोणता ?
उत्तर --  कुहूकुहू
---------------------------------
(८३) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो ?
उत्तर -- पिवळा
---------------------------------
(८४) आवळ्याची चव कशी असते ?
उत्तर -- तुरट
---------------------------------
(८५)  लिंबाची चव कशी असते ?
उत्तर -- आंबाट
------------------------------------------------------
(८६) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ
------------------------------------------------------
(८७) मिठाची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
-----------------------------------------
(८८) गुळाची चव कशी असते ?
उत्तर -- गोड
-----------------------------------------
(८९) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट
-----------------------------------------
(९०) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर -- कडू
-----------------------------------------
(९१) कावळ्याचा रंग कसा असतो ?
उत्तर -- काळा
-----------------------------------------
(९२) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
------------------------------------------------------
(९३) भारत देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- दिल्ली
------------------------------------------------------
(९४) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?
उत्तर -- सत्यमेव जयते.
------------------------------------------------------
(९५) आपण कोणत्या देशात राहतो ?
उत्तर -- भारत
------------------------------------------------------
(९६) जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
------------------------------------------------------
(९७) भारताच्या शेजारी किती देश आहेत ?
उत्तर -- ७ ( सात )
------------------------------------------------------
(९८) एक दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- २४ तास
------------------------------------------------------
(९९) एका वर्षात किती महिने असतात ?
उत्तर -- १२ (बारा )
------------------------------------------------------
(१००) महाराष्ट्र हे भारतातील काय आहे ?
उत्तर -- राज्य
-----------------------------------------------
(१०१) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ‌?
उत्तर -- गोदावरी
------------------------------------------------------
(१०२) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
--------------------------------------------------
(१०३) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर -- पूर्व
--------------------------------------------------
(१०४) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
उत्तर -- पश्चिम
--------------------------------------------------
(१०५) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?
उत्तर -- पाच
-------------------------------------------------------
(१०६) मुख्य दिशा किती ?
उत्तर -- चार
-------------------------------------------------------
(१०७) उपदिशा किती ?
उत्तर -- चार
-------------------------------------------------------
(१०८) आठवड्याचे वार किती ?
उत्तर -- सात
-------------------------------------------------------
(१०९) आकाशाचा रंग कोणता आहे ?
उत्तर -- निळा
-------------------------------------------------------
(११०) बी फळाच्या बाहेर असणारे कोणते फळ आहे ?
उत्तर -- काजू
-------------------------------------------------------
(१११) आईच्या आईला काय म्हणतात ?
उत्तर -- आजी
-------------------------------------------------------
(११२) महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता ?
उत्तर -- जारूळ
-------------------------------------------------------
(११३) महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी
-------------------------------------------------------
(११४) कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ?
उत्तर -- नारळ ( माड )
-------------------------------------------------------
(११५) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
-----------------------------------------
(११६) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?
उत्तर -- हिरवा
-------------------------------------------------------
(११७) महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी
-------------------------------------------------------
(११८) भारताचे राष्ट्रीय वॄक्ष कोणते ?
उत्तर -- वड
-------------------------------------------------------
(११९) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते ?
उत्तर -- रूपया
-------------------------------------------------------
(१२०) पृथ्वीचा आकार कसा आहे ?
उत्तर -- गोल
------------------------------------------------------
(१२१) ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- पौर्णिमेची रात्र
-------------------------------------------------------
(१२२) भारतीय सौर वर्षाचे महिने किती ?
उत्तर -- बारा महिने
-------------------------------------------------------
(१२३) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
उत्तर -- पृथ्वी
--------------------------------------------------------
(१२४) पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो ?
उत्तर -- सूर्यापासून
--------------------------------------------------------
(१२५) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता ?
उत्तर -- पृथ्वी
--------------------------------------------------------
(१२६) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर -- पश्चिम
-------------------------------------------------------
(१२७) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर -- उत्तर
-------------------------------------------------------
(१२८) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?
उत्तर -- पूर्व
-------------------------------------------------------
(१२९) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
उत्तर -- पश्चिम
-------------------------------------------------------
(१३०) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तच्या काळाला काय म्हणतात ?
उत्तर -- दिन
-------------------------------------------------------
(१३१) सूर्योस्तापासून सूर्यादयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?
उत्तर -- रात्र
-------------------------------------------------------
(१३२) दिन व रात्र मिळून एक पूर्ण काय होतो ?
उत्तर -- पूर्ण दिवस
----------------------------------------------------------
(१३३) मराठी वर्षांची सुरूवात कोणत्या महिन्याने होते ?
उत्तर -- चैत्र
-------------------------------------------------------
(१३४) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय
-----------------------------------------------
(१३५) फणसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- आठळी
----------------------------------------------
(१३६) कापसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- सरकी
-------------------------------------------------------
(१३७) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- चिंचोका
-------------------------------------------------------
(१३८) कोणत्या फळापासून आमरस तयार होतो ?
उत्तर -- आंबा
------------------------------------
(१३९) पारंब्या कोणत्या झाडाला असतात ?
उत्तर -- वड
-------------------------------------------------------
(१४०) जिभेचा कोणता रंग चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे ?
उत्तर -- गुलाबी
--------------------------------------------------
(१४१)श्वसन करताना सजीव कोणता वायू शरीरात घेतात?
उत्तर --ऑक्सिजन वायू
-----------------------------------------------------
(१४२)समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
---------------------------------------------------------------
(१४३) ' लाल किल्ला ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- दिल्ली
--------------------------------------------------------
(१४४) ' ताजमहल ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- आग्रा
--------------------------------------------------------
(१४५) सर्वात जास्त बुध्दिमान प्राणी कोणता ?
उत्तर -- मनुष्य
-----------------------------------------------------------
(१४६) दगडावर कोरलेल्या लेखास काय म्हणतात ?
उत्तर -- शिलालेख
--------------------------------------------------
(१४७) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-------------------------------------------------------
(१४८) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
-------------------------------------------------------
(१४९) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- अमावास्येची रात्र
-------------------------------------------------------
(१५०) एक डझनमध्ये किती वस्तू असतात ?
उत्तर -- १२

(१५१) आपण कोणत्या देशात राहतो ?
उत्तर -- भारत 
----------------------------
(१५२) आपण कोणत्या राज्यात राहतो ?
उत्तर -- महाराष्ट्र 
----------------------------
(१५३) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर -- सोंड 
----------------------------
(१५४) मुख्य ऋतू किती ?
उत्तर -- तीन 
----------------------------
(१५५) ' मुंगी ' या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
----------------------------
(१५६) एका वर्षात किती महिने असतात ?
उत्तर -- बारा 
----------------------------
(१५७) एका वर्षात एकूण किती दिवस असतात ?
उत्तर -- ३६५
----------------------------
(१५८) एक दिवसाचे किती तास असतात ‌?
उत्तर -- २४ तास 
----------------------------
(१५९) मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
----------------------------
(१६०) दर मिनिटाला मानवी हृदय किती वेळा धडधडते ?
उत्तर -- ७२ वेळा
----------------------------
(१६१) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
उत्तर -- कानाचे हाड
----------------------------
(१६२) प्रौढ मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
उत्तर -- २०६
----------------------------
(१६३) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
उत्तर --  मांडीचे हाड ( फिमर )
----------------------------
(१६४) मानवाच्या छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात ?
उत्तर -- २४
----------------------------
(१६५) मानवाला आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर --  ३२
--------------------------------
(१६६) चवीचे प्रकार किती ?
उत्तर -- चार 
----------------------------
(१६७) झुरळाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
----------------------------
(१६८) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?
उत्तर -- पाच 
----------------------------
(१६९) नारळाच्या झाडाला काय म्हणतात ?
उत्तर -- माड
----------------------------
(१७०) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
----------------------------
(१७१) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय 
----------------------------
(१७२) पिकलेल्या केळ्याचा रंग कोणता ?
उत्तर -- पिवळा 
---------------------------------
(१७३) आठवड्याचे वार किती ?
उत्तर -- सात 
----------------------------     
(१७४) १  मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- ६० सेकंद
-----------------------------
(१७५)  १ तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ६० मिनिटे
-----------------------------
(१७६) १ महिना म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- ३० / ३१ दिवस 
-----------------------------
(१७७) डिसेंबर महिन्याचे किती दिवस असतात ?
उत्तर -- ३१ दिवस 
-----------------------------
(१७८) १  डझन केळी म्हणजे किती केळी  ?
उत्तर  -- १२ केळी 
-----------------------------
(१७९) एक अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- १
------------------------------
(१८०) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- ९
-----------------------------------
(१८१) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- १०
---------------------------------
(१८२) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- ९९
---------------------------
(१८३) १ तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- १०  ग्रॅम
----------------------
(१८४) १ रीम कागद म्हणजे किती कागद ?
उत्तर -- ४८० कागद
----------------------
(१८५) १ फूट म्हणजे किती इंच ?
उत्तर -- १२  इंच
----------------------
(१८६) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन
----------------------
(१८७) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
--------------------------
(१८८) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
------------------------
(१८९) चौकोनाला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
-----------------------------
(१९०) आयताला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
-----------------------------
(१९१) चौरसाला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
-----------------------------
(१९२) त्रिकोणाला बाजू किती असतात ?
उत्तर -- तीन
-----------------------------
(१९३) वर्तूळाचा आकार कसा असतो ?
उत्तर -- गोल
-----------------------------
(१९४)भुईमुगाच्या बियाणाला कोणत्या नावाने ओळखतात ?
उत्तर -- शेंगदाणा
-----------------------------
(१९५) सूर्य केव्हा उगवतो ?
उत्तर -- सकाळी
-----------------------------
(१९६) सूर्य उगवण्याअगोदरची वेळ कोणती  ‌?
उत्तर -- ‌पहाट
-----------------------------
(१९७) सूर्य आकाशात मध्यावर आल्याची वेळ ‌कोणती ?
उत्तर -- दुपार

(१९८) सूर्य मावळण्याची वेळ कोणती ?
उत्तर -- संध्याकाळ
-----------------------------
(१९९) उन्हाळ्यात हवा अशी असते ‌?
उत्तर --  गरम
-----------------------------
(२००) हिवाळ्यात हवा कशी असते. ?
उत्तर. -- थंड
-----------------------------
(२०१) पावसाळ्यात हवा कशी असते. ?
उत्तर. --  दमट
------------------------------------------
(२०२) चवीचे प्रकार कोणते ?
उत्तर -- गोड, कडू, आंबट, खारट.
------------------------------------------
(२०३) ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?
उत्तर -- ज्ञान देणारे अवयव.
------------------------------------------
(२०४) आपल्याला किती ज्ञानेंद्रिये आहेत ?
उत्तर -- पाच
------------------------------------------
(२०५) ज्ञानेंद्रियांची नावे सांगा ?
उत्तर -- डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा.
------------------------------------------
(२०६) डोळ्यांचा उपयोग कशासाठी होतो ?
उत्तर -- पाहण्यासाठी.
------------------------------------------
(२०७) कानाचा उपयोग कशासाठी होतो ?
उत्तर -- ऐकण्यासाठी
------------------------------------------
(२०८) नाकाने आपल्याला कोणते ज्ञान होते ?
उत्तर -- वास घेणे.
------------------------------------------
(२०९) शरीरावरील कातडीला काय म्हणतात ?
उत्तर -- त्वचा
------------------------------------------
(२१०) त्वचेमुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे ज्ञान होते ?
उत्तर -- स्पर्शज्ञान
------------------------------------------
(२११) दातांचा उपयोग कोणता ?
उत्तर -- अन्न चावून खाण्यासाठी.
==========================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६
==========================
कै. सोनी आईंना भावपूर्ण  श्रद्धांजली