माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 21 April 2024

मराठी भाषा व्याकरण प्रश्नावली


(१) विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे ..... होय.
उत्तर --- भाषा
-----------
(२) आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला ...... असे म्हणतात.
उत्तर --- लिपी 
----------------------------------
(३) आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला ..... असे म्हणतात.
उत्तर --- मातृभाषा 
----------------------------------
(४) तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना ..... असे म्हणतात.
उत्तर --- वर्ण 
----------------------------------
(५) आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला .... असे म्हणतात ?
उत्तर --- अक्षर
----------------------------------
(६) ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास ..... असे म्हणतात.
उत्तर --- शब्द
----------------------------------
(७) पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण ' शब्दसमूहाला ......
असे म्हणतात.
उत्तर -- वाक्य
----------------------------------
(८) ' भाषेचे स्पष्टीकरण करणा-या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणा-या शास्त्राला ...... असे म्हणतात.
उत्तर --- व्याकरण 
----------------------------------
(९) ' इ ' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?
उत्तर ---  --हस्व
----------------------------------
(१०)  मराठी भाषेतील  'ळ् ' या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते ‌?
उत्तर ---  स्वतंत्र वर्ण
----------------------------------
(११) लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ?
उत्तर --- लेखन
----------------------------------
(१२) विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ?
उत्तर --- भाषा
----------------------------------
(१३) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ?
उत्तर --- मराठी, हिंदी, संस्कृत.
----------------------------------
(१४) मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात ?
उत्तर -- देवनागरी
----------------------------------
(१५) अक्षरांना ..... म्हणतात.
उत्तर --- ध्वनीचिन्हे
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाड
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  /  ७७२१९४१४९६

Friday 19 April 2024

स्पर्धा परीक्षा प्रश्नावली ( गणित )


(1) 17 बदक, 17 मासे, 17 मिनिटात खातात तर 1 बदक, 1 मासा किती मिनिटात खाईल ?

उत्तर --- 17 मिनिटात
----------------------------------
(2) 6 मजूर एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 3 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

उत्तर --- 24 दिवस
----------------------------------
(3) 12 गायी 12 पेंढ्या, 3 मिनीटात खातात तर 3 गायी, 6 पेंढ्या किती मिनिटांत खातील ?

उत्तर --- 6 मिनिटात 
----------------------------------
(4) एक पाण्याचा हौद नळाने 12 तासात भरतो जर नळ 3 तास चालला तर हौदचा किती टक्के भाग भरेल ?

उत्तर ---  25 %
----------------------------------
(5) 3 तासात एक बस 120 किलोमीटर अंतर जाते, तर ती बस  60 मिनिटात किती किलोमीटर अंतर जाईल ?

उत्तर ---  40 किलोमीटर 
----------------------------------
(6) 9 मीटर लांबीची दोरी 9 ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

उत्तर ---   90 सेंटीमीटर 
----------------------------------
(7) एका पेटीत दोन डझन आंबे आहेत,  अशा 24  पेटयातील
एकूण आंबे किती होतील ?

उत्तर --- 576 आंबे 
----------------------------------
(8) 5 बगळे , 5 मासे, 5 मिनिटात खातात. तर 1 बगळा, 1 मासा किती मिनिटांत खाईल ?

उत्तर --- 5 मिनिट
----------------------------------
(9)  एक दोरी 9 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील  ?

उत्तर --- 10 तुकडे
----------------------------------
(10)  एका शाळेत 75 % विद्यार्थी हजर आहेत आणि 50  विद्यार्थी गैरहजर आहेत, तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती ?

उत्तर --- 200  विद्यार्थी 
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  /  7721941496

Thursday 18 April 2024

गणितीय प्रश्नावली ( शेकडावारी ) -- Percentage


(1) एका संख्येचे 25 %  म्हणजे 75 तर ती संख्या शोधा.

उत्तर --- 300
------------------------
(2) एका संख्येचे 50 % म्हणजे 40 तर ती संख्या शोधा.

उत्तर --- 80
----------------------------------
(3) एका संख्येच्या 50 % मधून 50 वजा केले असता, 50 उरतात. तर ती संख्या कोणती ?

उत्तर --- 200
----------------------------------
(4) फळबागेतील 160 झाडांपैकी 25 % झाडे आंब्यांची आहेत. तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत ?

उत्तर ---  120
----------------------------------
(5) एक संख्या 50 % नी वाढवली तेव्हा तीची किंमत 100 होते तर ती संख्या कोणती ?

उत्तर --- 50
----------------------------------
(6) एका शाळेतील मुलांची संख्या यावर्षी शेकडा 20 % ने कमी झाली. तर यावर्षी शाळेत 80 मुले असतील तर गेल्यावर्षी किती मुले होती ?

उत्तर --- 100
----------------------------------
(7)  A चा पगार हा B च्या पगारापेक्षा 50 % नी जास्त आहे.
 तर B चा पगार 4000 हजार आहे. तर A चा पगार किती ?

उत्तर --- 8000
----------------------------------
(8) जर एका संख्येतून त्या संख्येचे 75 % वजा केले तर उत्तर 50 मिळते. तर ती संख्या कोणती ?

उत्तर --- 200
----------------------------------
(9) सुप्रिया चौरे एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होती. तिची वर्षातील उपस्थिती 90 % असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ?

उत्तर --- 220
----------------------------------
(10)  2000 चे 25 % किती ?

उत्तर ---  500
----------------------------------
(11) 20 लीटर दुधामध्ये 25 % पाणी आहे, तर त्यामध्ये दुधाचे प्रमाण किती ?

उत्तर ---  15 लीटर दूध 
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  /  7721941496

Wednesday 17 April 2024

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१)भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय आहे ?
उत्तर --- संसद

(२) भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे ?
उत्तर --- राष्ट्रपती

(३) भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतात ?
उत्तर --- राष्ट्रपती 

(४) भारताच्या राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात ?
उत्तर -- भारताचे सरन्यायाधीश 

(५) भारत देशाला कधी स्वातंत्र्य मिळाले ?
उत्तर --- १५ आॅगस्ट १९४७ 

(६) राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
उत्तर -- राष्ट्रपती

(७) राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?
उत्तर -- उपराष्ट्रपती 

(८)  भारताने कोणत्या शासनपध्दतीचा स्विकार केला आहे ?
उत्तर -- लोकशाही 

(९) भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू

(१०) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर --- डॉ. राजेंद्र प्रसाद 

(११) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर -- यशवंतराव चव्हाण 

(१२) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

(१३) डॉ. आंबेडकरांचे पूर्ण नाव सांगा.
उत्तर -- भिमराव रामजी आंबेडकर 

(१४) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा

(१५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हाॅकी

(१६) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
उत्तर -- दर्पण

(१७) प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
उत्तर --- राष्ट्रपती

(१८) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर --- दिल्ली

(१९) महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर --- मुंबई

(२०) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती  ?
उत्तर --- गंगा

(२१) ५० रूपयांच्या नोटेवर कोणाची सही असते ?
उत्तर --- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

(२२) भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?
उत्तर --- महात्मा गांधी

(२३) भारतातील पहिल्या आधार कार्ड धारक महिलेचे नाव सांगा ?
उत्तर --- रंजना सोनवणे

(२४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
उत्तर --- रविंद्रनाथ टागोर

(२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
उत्तर --- तोरणा

(२६) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर --- कल्पना चावला

(२७) दरवर्षी ख्रिसमस (नाताळ)सण किती तारखेला साजरा केला जातो ?
उत्तर --- २५ डिसेंबर.

(२८) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर --- शेकरू

(२९) गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतो ‌?
उत्तर --- राज्य शासन

(३०) शीख धर्माचे संस्थापक कोण आहे ?
उत्तर --- गुरु नानक

(३१) भारताचा पहिला उपग्रह कोणता ?
उत्तर --- आर्यभट्ट

(३२) कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर --- १ मे 

(३३) मानवी शरीरात किती हाडे असतात ?
उत्तर ---- २०६

(३४) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
उत्तर --- अहमदनगर

(३५) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
उत्तर --- १ मे १९६०

(३६) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?
उत्तर --- ७२० किलोमीटर

(३७) भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे ?
उत्तर --- केरळ

(३८) ख्रिश्चन धर्मग्रंथाचे नाव काय आहे ?
उत्तर --- बायबल

(३९) राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान कोठे आहे ?
उत्तर --- सिंदखेडराजा,जि.बुलढाणा (महाराष्ट्र)

(४०) राष्ट्रपती भवन कोठे आहे ?
उत्तर --- दिल्ली

(४१) महाराष्ट्रामध्ये पोलीस अकॅडमी कोठे आहे ?
उत्तर --- नाशिक

(४२) महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?
उत्तर --- पोलीस महासंचालक

(४३) बीबी का मकबरा कोठे आहे ?
उत्तर --- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

(४४) महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध शहर कोणते ?
उत्तर --- पुणे

(४५) इस्लाम धर्म ग्रंथाचे नाव काय आहे ?
उत्तर --- कुराण

(४६) महाराष्ट्रात कुस्ती केंद्र कोठे आहे ?
उत्तर --- कोल्हापूर

(४७) सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे ?
उत्तर --- आफ्रिका खंड

(४८) सुखकर्ता-दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली ?
उत्तर --- रामदास स्वामी

(४९) भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?
उत्तर --- मुंबई

(५०) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
उत्तर --- नाईल

(५१) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
उत्तर --- पॅसिफिक महासागर.

(५२) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे ?
उत्तर ---  हमिंग बर्ड

(५३) काळे खंड कोणत्या खंडास म्हटले जाते ?
उत्तर --- आफ्रिका

(५४) छत्रपती शाहू महाराजांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?
उत्तर --- राजर्षी

(५५) "ग्रामगीता" या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
उत्तर --- राष्ट्रसंत तुकडोडी महाराज

(५६) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?
उत्तर --- सत्यमेव जयते

(५७) भारताचा पहिला अवकाश वीर कोण आहे ?
उत्तर --- राकेश शर्मा

(५८) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर --- सहारा.(आफ्रिका)

(५९) जगातील सर्वात लांब भिंत कोणती?
उत्तर --- चीनची भिंत

(६०) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?
उत्तर --- चार्ल्स बॅबेज

(६१) प्रसिद्ध दिक्षाभूमी कोणत्या शहरात आहे ?
उत्तर --- नागपूर

(६२) जगातील सर्वात मोठा देश कोणता?
उत्तर --- रशिया

(६३) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते?
उत्तर --- महाभारत

(६४) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर --- शहामृग

(६५) जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे ?
उत्तर --- व्हॅटिकन सिटी

(६६) उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
उत्तर --- जपान

(६७) गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर --- त्र्यंबकेश्वर,नाशिक

(६८) चादरीकरिता प्रसिद्ध महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे ?
उत्तर --- सोलापूर

(६९) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?
उत्तर --- नेवासे

(७०) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे ?
उत्तर --- परमवीर चक्र

(७१) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?
उत्तर --- आरती शहा

(७२) "मिसाईल मॅन" या नावाने कोणाला ओळखले जाते ?
उत्तर --  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.

(७३) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ?
उत्तर --- ज्ञानपीठ.

(७४) "शिक्षक दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर --- ५ सप्टेंबर

(७५) "अग्निपंख" या मूळ पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर --- डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम

(७६) रयत शिक्षण संस्था ची स्थापना कोणी केली ?
उत्तर --- कर्मवीर भाऊराव पाटील

(७७) भारत देश कोणत्या खंडात आहे ?
उत्तर --- आशिया खंड

(७८) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?
उत्तर --- शांततेचा

(७९) राष्ट्रध्वजातील केसरी रंग कशाचे प्रतीक आहे ?
उत्तर -- त्याग व शौर्य

(८०) तांबे व जस्त यापासून कोणते संमीश्रण बनवतात?
उत्तर --- पितळ 

(८१) स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते ?
उत्तर --- मौलाना अबुल कलाम आझाद

(८२) परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते ?
उत्तर -- राष्ट्रपती

(८३) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर --- अजिंठा

(८४) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे ?
उत्तर --- नेपाळ

(८५) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर --- दादासाहेब फाळके

(८६) भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षी प्राप्त होतो ?
उत्तर --- १८ वर्ष पूर्ण

(८७) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती  ?
उत्तर --- गंगा

(८८) महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर --- पोरबंदर (गुजरात)

(८९) भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तर --- राष्ट्रपती

(९०) महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकांना 'लोकहितवादी' म्हटले जाते ?
उत्तर --- गोपाळ हरी देशमुख

(९१) 'धन्वंतरी' पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर --- वैद्यकीय क्षेत्र

(९२)भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे ?
उत्तर ---  मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

(९३) ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
उत्तर --- बीड

(९४) चंदन वृक्षाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
उत्तर --- कर्नाटक 

(९५) भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर --- श्रीमती प्रतिभाताई पाटील.

(९६) भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर --- श्रीमती इंदिरा गांधी

(९७) अंधासाठीच्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ? 
उत्तर --- ब्रेल लुईस

(९८) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते आहे ?
उत्तर --- ताजमहल (मुंबई)

(९९) संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे ?
उत्तर --- ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.

(१००) महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर --- अमरावती

(१०१) वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण आहे ?
उत्तर --- जगदीशचंद्र बोस

(१०२) आपल्या भारताचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणण्यास अंदाज़े किती वेळ लागतो ?
उत्तर --- ५२ सेकंद

(१०३) नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
उत्तर --- कोलकाता

(१०४) सुप्रसिद्ध सालारजंग म्युझिअम कोठे आहे ?
उत्तर --- हैद्राबाद

(१०५) रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
उत्तर --- गुरूदेव
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌ शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Saturday 13 April 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर )


   डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी एका गरीब कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे
मूळ गाव. त्यांचे सुरूवातीचे प्राथमिक‌ शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईत आले.
उत्तम  तऱ्हेने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळवून एल्फिन्स्टन कॉलेजात गेले. तिथून पदवी
संपादन केल्यावर बडोदे सरकारच्या मदतीने भीमराव अमेरिकेस गेले. अर्थशास्त्रात एम. ए.; पी. एच. डी. पदवी प्राप्त करून ते परत भारतात आले. मुंबईत सिड्नहॅम
कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले. नोकरी करीत असतानाच आपल्या अस्पृश्य समजण्यात येणाऱ्या बांधवांना त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण
केली.
       पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले आणि अर्थशास्त्रातील डी. एस. सी. ही सर्वोच्च पदवी व बॅरिस्टर ही पदवी संपादन करून ते मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात आधी प्राध्यापकाची व मग प्राचार्य म्हणून नोकरी करू लागले. 
  महाडचे चवदार तळे व नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले. बाबासाहेबांना दलित समाजाविषयी खूप कळकळ होती. दलितांची सुधारणा व्हावी. म्हणून ते झटले. जातीभेद नाहीसा व्हावा, असे त्यांना वाटे. यासाठी लोकांनी खूप शिकले पाहिजे, असे त्यांना वाटे. यासाठी त्यांनी शाळा व महाविद्यालये काढली. शिक्षणाचा प्रसार केला. त्यांना वाचनाचे खूप वेड होते. त्यांनी स्वतः खूप ग्रंथ लिहिले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कायदेपंडित म्हणून ओळखले जात. ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार होते.
      ६ डिसेंबर १९५६ मध्ये त्यांचे निधन झाले. अशा या भारताच्या थोर सुपुत्राला सरकारने ' भारतरत्न ' ही पदवी बहाल केली.
---------------------------------------------------------
 संकलन:- शंकर चौरे सर (पिंपळनेर) धुळे
   📞 ९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Thursday 11 April 2024

कै. पिताबाई रूस्तम कोकणी (भोये ) -- "पिताई " यांच्या तृतीय पुण्यतिथी /पुण्यस्मरण दिनानिमित्त )' विशेष सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) आपले राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर -- जनगणमन
---------------------------------------------
(२) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर
------------------------------------------------
(३) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ
------------------------------------------------------
(४) आपले राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ
------------------------------------------------------
(५)  आपले राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर -- आंबा
------------------------------------------------------
(६) आपला राष्ट्रध्वज कोणता ?
उत्तर -- तिरंगा
------------------------------------------------------
(७) आपला राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हाॅकी
------------------------------------------------------
(८) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी काय असते ?
उत्तर -- अशोकचक्र
------------------------------------------------------
(९) प्राण्यांचा राजा कोणला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
------------------------------------------------------
(१०) फुलांचा राजा कोणला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
------------------------------------------------------
(११) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड
------------------------------------------------------
(१२) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ
------------------------------------------------------
(१३) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
------------------------------------------------------
(१४) भारत देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- दिल्ली
------------------------------------------------------
(१५) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर -- वंदे मातरम्
------------------------------------------------------
(१६) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?
उत्तर -- सत्यमेव जयते.
------------------------------------------------------
(१७) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६
------------------------------------------------------
(१८) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर -- सात
------------------------------------------------------
(१९) आपण कोणत्या देशात राहतो ?
उत्तर -- भारत
------------------------------------------------------
(२०) जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
------------------------------------------------------
(२१) भारताच्या शेजारी किती देश आहेत ?
उत्तर -- ७ ( सात )
------------------------------------------------------
(२२) भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
------------------------------------------------------
(२३) एक दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- २४ तास
------------------------------------------------------
(२४) एका वर्षात किती महिने असतात ?
उत्तर -- १२ (बारा )
------------------------------------------------------
(२५) महाराष्ट्र हे भारतातील काय आहे ?
उत्तर -- राज्य
------------------------------------------------------
(२६) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
उत्तर -- नागपूर
------------------------------------------------------
(२७) गोदावरी नदी कोठे उगम पावते ‌?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर
------------------------------------------------------
(२८) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा
------------------------------------------------------
(२९) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
------------------------------------------------------
(३०) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल
------------------------------------------------------
(३१) महाराष्ट्रातील सर्वांत ‌उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई
------------------------------------------------------
(३२) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ‌?
उत्तर -- गोदावरी
------------------------------------------------------
(३३) साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर --- ‌नाशिक
------------------------------------------------------
(३४) झुरळाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
------------------------------------------------------
(३५ ) कोळी किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
------------------------------------------------------
(३६) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
------------------------------------------------------
(३७) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
------------------------------------------------------
(३८) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
------------------------------------------------------
(३९) सापाला किती पाय असतात ?
उत्तर -- पाय नसतात.
------------------------------------------------------
(४०) माशाला किती पाय अस्तात ?
उत्तर -- पाय नसतात.
------------------------------------------------------
(४१)आंबा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी

(४२) पेरू या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- अनेक बिया
--------------------------------------------------
४३)  जांभूळ या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी
--------------------------------------------------
(४४) सिताफळात किती बिया असतात ?
उत्तर -- अनेक बिया
--------------------------------------------------
(४५) आवळा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी
--------------------------------------------------
(४६) कोणत्या प्राण्याला कान  नसतात ?
उत्तर -- गांडूळ
--------------------------------------------------
(४७) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर -- पूर्व
--------------------------------------------------
(४८) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
उत्तर -- पश्चिम
--------------------------------------------------
(४९) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?
उत्तर -- पाच
-------------------------------------------------------
(५०) मुख्य दिशा किती ?
उत्तर -- चार
-------------------------------------------------------
(५१) उपदिशा किती ?
उत्तर -- चार
-------------------------------------------------------
(५२) आठवड्याचे वार किती ?
उत्तर -- सात
-------------------------------------------------------
(५३) आकाशाचा रंग कोणता आहे ?
उत्तर -- निळा
-------------------------------------------------------
(५४) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर -- सोंड
-------------------------------------------------------
(५५) आईच्या आईला काय म्हणतात ?
उत्तर -- आजी
-------------------------------------------------------
(५६) महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता ?
उत्तर -- जारूळ
-------------------------------------------------------
(५७) महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी
-------------------------------------------------------
(५८) कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ?
उत्तर -- नारळ ( माड )
-------------------------------------------------------
(५९) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
-------------------------------------------------------
(६०) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
-------------------------------------------------------
(६१) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?
उत्तर -- हिरवा
-------------------------------------------------------
(६२) महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी
-------------------------------------------------------
(६३) भारताचे राष्ट्रीय वॄक्ष कोणते ?
उत्तर -- वड
-------------------------------------------------------
(६४) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते ?
उत्तर -- रूपया
-------------------------------------------------------
(६५) मोराच्या डोक्यावर काय असते ?
उत्तर -- तुरा
------------------------------------------------------
(६६) पृथ्वीचा आकार कसा आहे ?
उत्तर -- गोल
-------------------------------------------------------
(६७) चंद्राच्या प्रकाशाला काय म्हणतात ?
उत्तर -- चांदणे
-------------------------------------------------------
(६८) ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- पौर्णिमेची रात्र
-------------------------------------------------------
(६९) भारतीय सौर वर्षाचे महिने किती ?
उत्तर -- बारा महिने
-------------------------------------------------------
(७०) ग्रेगरियन वर्षाचे महिने किती ?
उत्तर -- बारा महिने
-------------------------------------------------------
(७१) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
उत्तर -- पृथ्वी
--------------------------------------------------------
(७२) पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो ?
उत्तर -- सूर्यापासून
--------------------------------------------------------
(७३) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता ?
उत्तर -- पृथ्वी
--------------------------------------------------------
(७४) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर -- पश्चिम
-------------------------------------------------------
(७५) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर -- उत्तर
-------------------------------------------------------
(७६) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?
उत्तर -- पूर्व
-------------------------------------------------------
(७७) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
उत्तर -- पश्चिम
-------------------------------------------------------
(७८) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तच्या काळाला काय म्हणतात ?
उत्तर -- दिन
-------------------------------------------------------
(७९) सूर्योस्तापासून सूर्यादयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?
उत्तर -- रात्र
-------------------------------------------------------
(८०) दिन व रात्र मिळून एक पूर्ण काय होतो ?
उत्तर -- पूर्ण दिवस
----------------------------------------------------------
(८१) मराठी वर्षांची सुरूवात कोणत्या महिन्याने होते ?
उत्तर -- चैत्र
-------------------------------------------------------
(८२) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय
-----------------------------------------------
(८३) फणसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- आठळी
------------------------------------------------
(८४) कापसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- सरकी
-------------------------------------------------------
(८५) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- चिंचोका
-------------------------------------------------------
(८६) कोणत्या फळापासून आमरस तयार होतो ?
उत्तर -- आंबा
-------------------------------------------------------
(८७) कोंबड्याच्या डोक्यावर काय असते ?
उत्तर -- तुरा
-------------------------------------------------------
(८८) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट
-------------------------------------------------------
(८९) आवळ्याची चव कशी असते ?
उत्तर -- तुरट
-------------------------------------------------------
(९०) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर -- कडू
-------------------------------------------------------
(९१) मीठाची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
-------------------------------------------------------
(९२) साखरेची चव कशी असते ?
उत्तर -- गोड
-------------------------------------------------------
(९३) पारंब्या कोणत्या झाडाला असतात ?
उत्तर -- वड
-------------------------------------------------------
(९४) पोळा सणाला कोणत्या प्राण्याची पूजा करतात ?
उत्तर -- बैल
-------------------------------------------------------
(९५) जिभेचा कोणता रंग चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे ?
उत्तर -- गुलाबी
--------------------------------------------------
(९६)श्वसन करताना सजीव कोणता वायू शरीरात घेतात?
उत्तर -- आॅक्सिजन वायू
-----------------------------------------------------
(९७) जिल्हयाचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?
उत्तर -- जिल्हा अधिकारी (कलेक्टर )
-------------------------------------------------------
(९८) पन्हाळा गड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
-------------------------------------------------------
(९९) रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
-------------------------------------------------------
(१००)बालक्रांतीकारक शिरीषकुमार यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
---------------------------------------------------------
(१०१) शुन्याचा शोध कोणत्या देशात लागला ?
उत्तर -- भारत
------------------------------------------------------------
(१०२) २६ जानेवारी हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?
उत्तर -- प्रजासत्ताक दिन
------------------------------------------------------------
(१०३) १५ आॅगस्ट हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?
उत्तर -- स्वातंत्र्य दिन
--------------------------------------------------------------
(१०४)समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
---------------------------------------------------------------
(१०५) ' लाल किल्ला ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- दिल्ली
--------------------------------------------------------
(१०६) ' ताजमहल ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- आग्रा
--------------------------------------------------------
(१०७) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत
--------------------------------------------------
(१०८) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डाॅ. राजेंद्रप्रसाद
----------------------------------------------------
(१०९) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर -- जवाहरलाल नेहरू
-------------------------------------------------------
(११०) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
--------------------------------------------------------
(१११) सर्वात जास्त बुध्दिमान प्राणी कोणता ?
उत्तर -- मनुष्य
-----------------------------------------------------------
(११२) दगडावर कोरलेल्या लेखास काय म्हणतात ?
उत्तर -- शिलालेख
--------------------------------------------------
(११३) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
उत्तर -- १ मे १९६०
-------------------------------------------------------
(११४) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी
-------------------------------------------------------
(११५) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
-------------------------------------------------------
(११६) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर -- गंगापूर ( नाशिक )
-------------------------------------------------------
(११७) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-------------------------------------------------------
(११८) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?
उत्तर -- ७२० किलोमीटर
-----------------------------------------------------
(११९) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
-------------------------------------------------------
(१२०) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- अमावास्येची रात्र
-------------------------------------------------------
(१२१) एक डझनमध्ये किती वस्तू असतात ?
उत्तर -- १२
============================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
==========================
कै. पिताबाई कोकणी (भोये ) यांना भावपूर्ण आदरांजली

Wednesday 10 April 2024

व्यावहारिक परिमाणे (गणितातील काही महत्वाची एकके)


✓ १ मिनिट = ६० सेकंद 
✓ १  तास = ६० मिनिटे 
✓  २४ तास  = १ दिवस 
✓ पाव तास =१५ मिनिटे 
✓ अर्धा तास =३० मिनिटे 
✓ पाऊण तास= ४५ मिनिटे 
✓ ७ दिवस = १ आठवडा
✓ ३० दिवस = १ महिना
✓ ३६५ दिवस =१ वर्ष 
✓ १० वर्ष = १ दशक 
✓ अर्धवर्ष = ६ महिने 
✓ पाव वर्ष = ३ महिने 
✓ १ वाजून ३० मिनिटे = दीड वा.
✓ २ वाजून ३० मिनिटे = अडीच वा. 
✓ एकशे =१००
✓ अर्धाशे =५०
✓ पावशे =२५
✓ पाऊणशे =७५
✓  सव्वाशे =१२५ 
✓ दीडशे = १५०
✓ अडीचशे =२५०
✓ साडेतीनशे = ३५०
✓ १ डझन = १२ वस्तू 
✓ अर्धा डझन = ६ वस्तू  
✓ पाव डझन = ३ वस्तू
✓ पाऊण डझन =९ वस्तू 
✓ २४ कागद = १ दस्ता
✓ २० दस्ते=१ रीम
✓ ४८० कागद = १ रीम
✓ १ एकर= ४००० चौ. मी. 
✓ १ मीटर= १०० सेमी 
✓ अर्धा मीटर= ५० सेमी 
✓ पाव मीटर = २५ सेमी 
✓  पाऊण मीटर = ७५ सेमी 
✓ १ लीटर = १००० मिली
✓ अर्धा लीटर= ५०० मिली
✓ पाव लीटर = २५० मिली
✓ पाऊण लीटर = ७५० मिली
✓ १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
✓ अर्धा किलोग्रॅम = ५०० ग्रॅम 
✓ पाव किलोग्रॅम = २५० ग्रॅम
✓ पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रॅम
✓ १ किलोमीटर = १००० मी
✓ अर्धा  किमी  = ५०० मीटर 
✓ पाव  किमी = २५० मीटर
✓ पाऊण किमी = ७५० मीटर 
✓ १ हजार = १०००
✓ अर्धा हजार = ५००
✓ पाव हजार =२५०
✓ पाऊण हजार  = ७५०
✓ १२ इंच =१ फूट  
✓ १ क्विंटल =१०० किलोग्रॅम 
✓ अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम 
✓ पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम 
✓ पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम 
✓ १ टन= १० क्विंटल 
✓ १  टन= १००० किलोग्रॅम
=====================
लेखन :- शंकर चौरे सर
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
9422736775 / 7721941496