माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 10 November 2024

रक्ताचे नाते ( नातेसंबंध )

(१) आईचा मुलगा --- भाऊ 
(२) वडिलांचा मुलगा --भाऊ
(३) आईची मुलगी -- बहीण 
(४) वडिलांची मुलगी -- बहीण 
(५) आईचा भाऊ -- मामा 
(६) वडिलांचा भाऊ -- चुलता, काका 
(७) आईची बहीण -- मावशी 
(८) वडिलांची बहीण -- आत्या 
(९) आईचे वडील -- आजोबा 
(१०) वडिलांचे वडील -- आजोबा 
(११) मुलाची बायको -- सून 
(१२) मुलीचे पती -- जावई
(१३) पतीची बहीण -- नणंद 
(१४) पत्नीची बहीण -- मेहूणी 
(१५) पतीचे भाऊ -- दीर 
(१६) पत्नीचा भाऊ -- मेहुणा 
(१७) भावाचा मुलगा -- पुतण्या 
(१८) भावाची मुलगी -- पुतणी 
(१९) चुलत्याचा (काकाचा) मुलगा -- चुलतभाऊ 
(२०) मावशीचा मुलगा -- मावसभाऊ 
(२१) चुलत्याची (काकाची) मुलगी -- चुलतबहीण 
(२२) मावशीची मुलगी -- मावसबहीण 
(२३) आईच्या बहिणीची मुलगी -- मावसबहीण 
(२४) बहिणीचे पती -- मेहुणा 
(२५) आईच्या बहिणीचा मुलगा -- मावसभाऊ 
(२६) भावाची बायको -- वहिनी 
(२७) नातूची मुलगी -- पणती 
(२८) नातूचा मुलगा -- पणतू 
(२९) नातीची मुलगी -- पणती 
(३०) नातीचा मुलगा -- पणतू 
(३१) आईचे आजोबा -- पणजोबा 
(३२) वडिलांचे आजोबा -- पणजोबा 
(३३) आईच्या आईची आई -- पणजी 
(३४) आईच्या आईचे वडील -- पणजोबा 
(३५) आईच्या वडिलांची आई -- पणजी 
(३६) वडिलांच्या वडिलांची आई -- पणजी 
(३७) वडिलांच्या आईचे वडील -- पणजोबा 
(३८) वडिलांच्या वडिलांचे वडील -- पणजोबा 
(३९) आईच्या वडिलांचे वडील -- पणजोबा 
(४०) वडिलांच्या वडिलांचे चिरंजीव -- वडील 
(४१) बहिणीच्या भावाचे वडील -- वडील 
(४२) भावाच्या बहिणीचे वडील -- वडील 
(४३) बहिणीच्या भावाची आई -- आई 
(४४) भावाच्या बहिणीची आई -- आई
(४५) आईच्या बहिणीचे पती -- मावस ( काका )
(४६) आईच्या भावाची पत्नी -- मामी 
(४७) वडिलांच्या भावाची पत्नी -- काकू ( काकी )
(४८) नणंदेचा मुलगा -- भाचा 
(४९) नणंदेची मुलगी -- भाची 
(५०) नणंदेची आई -- सासू 
(५१) नणंदेचे वडील -- सासरा 
(५२) दीरांचा मुलगा -- पुतण्या 
(५३) दीरांची पत्नी -- जाऊ 
(५४) दीराची मुलगी -- पुतणी 
(५५) जावेचा मुलगा -- पुतण्या 
(५६) जावेची मुलगी -- पुतणी 
(५७) आईच्या भावाचा मुलगा -- मामेभाऊ 
(५८) आईच्या भावजईचा मुलगा -- मामेभाऊ 
(५९) आईच्या भावाच्या पत्नीची मुलगी - मामेबहीण 
(६०) आईच्या भावाच्या पत्नीचा मुलगा - मामेभाऊ 
(६१) नवऱ्याच्या भावाची बायको -- जाऊ 
(६२) वडिलांच्या आईची मुलगी -- आत्या 
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे 
9422736775  /  7721941496

No comments:

Post a Comment