(१) सूर्य सकाळी उगवतो.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
-------------------
(२) मी सकाळी अभ्यास करते.
संध्याकाळी आजीबरोबर फिरायला जाते.
-------------
(३) बदक पाण्यात पोहते.
घार आकाशात उंच उडते.
------------------------
(४) उन्हाळ्यात कडक ऊन असते.
हिवाळ्यात थंडी वाजते.
---------------------------------
(५) ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
---------------------------------
(६) चिंचेचे पान छोटे असते.
वडाचे पान मोठे असते.
---------------------------------
(७) कापसापासून कापड बनते.
ऊसापासून साखर बनते.
---------------------------------
(८) मेथी, शेपू, पालक या पालेभाज्या आहेत.
पालेभाज्या नेहमी खाव्यात.
---------------------------------
(९) गावाबाहेर आमचे शेत आहे.
शेतात बाजरी पेरली आहे.
---------------------------------
(१०) सकाळी लवकर उठावे.
दात घासावेत. स्वच्छ अंघोळ करावी.
---------------------------------
(११) वाहने रस्त्यावरून धावतात.
लोक बाजूने चालतात.
---------------------------------
(१२) आपली नखे नियमित कापावीत.
केस स्वच्छ असावेत.
---------------------------------
(१३) सायकलला दोन चाके असतात.
सायकल रस्त्यावरून पळते.
---------------------------------
(१४) आम्ही बसने शाळेला जातो.
आम्ही बसने घरी येतो.
---------------------------------
(१५) आकाशात ढग येतात.
मुसळधार पाऊस पडतो.
सगळीकडे पाणीच पाणी होते.
---------------------------------
(१६) मला दोन हात आहेत.
मी हाताने जेवतो.
मी हाताने लिहितो.
---------------------------------
(१७) शाळेसमोर आंब्याचे झाड आहे.
त्याला आंबे लागतात.
आंबे गोड असतात.
---------------------------------
(१८) बाई फळ्यावर लिहितात.
मी पाटीवर लिहिते.
दादा वहीवर लिहितो.
---------------------------------
(१९) हा रेडिओ आहे.
आम्ही रेडिओवरची गाणी ऐकतो.
छान छान गोष्टी ऐकतो.
---------------------------------
(२०) गावात घरे आहेत.
गावाबाहेर शेते आहेत.
शेतात विहिरी आहेत.
---------------------------------
(२१) आमच्या गावात तलाव आहे.
तलावात मासे आहेत.
कासव आणि बेडूक आहेत.
---------------------------------
(२२) आम्ही पाणी पिण्यासांठी वापरतो.
पाण्याने अंघोळ करतो.
पाण्याने कपडे धुतो, भांडी धुतो.
---------------------------------
(२३) ससा गवत खातो.
ससा भित्रा असतो.
पण तो चपळ असतो.
---------------------------------
(२४) कुत्रा पाळीव प्राणी आहे.
तो घराची राखण करतो.
तो शेताचीही राखण करतो.
---------------------------------
(२५) गाय पाळीव प्राणी आहे.
गाय गवत खाते.
गाय दूध देते.
---------------------------------
(२६) मांजर पाळीव प्राणी आहे.
तिचे अंग मऊ असते.
मांजर दूध पिते.
---------------------------------
(२७) पोपट हा पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवा असतो.
त्याची चोच लाल असते.
---------------------------------
(२८) ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
---------------------------------
(२९) मला दोन पाय आहेत.
पायांनी मी चालतो.
पायांनी मी पळतो,
मी उड्या मारतो.
---------------------------------
(३०) आमच्या गावाचे नाव जामनेपाडा आहे.
आमची शाळा गावातच आहे.
माझे नाव सुप्रिया आहे.
मी पहिलीत शिकते.
---------------------------------
(३२) गावातील रस्ता मोठा आहे.
रस्त्यावर वाहने धावतात.
रस्त्याने लोक जातात.
सगळीकडे गर्दी असते.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment