माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 28 July 2025

निबंध लेखन ( पावसाळा / मोर )

(१) माझा आवडता ऋतू -- पावसाळा 

      पावसाळा ऋतू मला आवडतो. पावसामुळे सर्व 
सृष्टी हिरवीगार होते. पाऊस पडला की नदी, नाले, 
ओढे वाहू लागतात. झाडे पाण्याने आंघोळ करतात. पशुपक्ष्यांना आनंद होतो. पाऊस पडला की शेतकऱ्यांना आनंद होतो. पावसामुळे शेतात धान्य पिकते.

      पशुपक्ष्यांना, माणसांना व सर्व निसर्गाला पाण्याची खूप गरज असते. पावसामुळे पृथ्वीवरील जीवन सुरू आहे. पाऊस नसेल, तर सर्व सृष्टी उजाड व भकास होईल. म्हणूनच पाण्याला 'जीवन' म्हटले आहे. मला पावसात भिजायला खूप आवडते. 
=============================

(२) माझा आवडता पक्षी -- मोर 

    ‌ मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. सर्व पक्ष्यांमध्ये मला मोर खूप आवडतो. मोराचा पिसारा डौलदार असतो. मोराच्या पिसाऱ्यातील हिरवा व निळा रंग खुलून दिसतो. मोराच्या डोक्यावर ऐटबाज तुरा असतो.

     ‌ आकाशात काळे पावसाळी ढग दाटून आले की 
मोर रानामध्ये थुई थुई नाचू लागतो. त्यावेळी तो त्याचा पिसारा फुलवून नाचतो. नाचताना मोर खूप सुंदर दिसतो. पावसाळी ढगांकडे पाहून मोर आनंदाने ओरडतो, त्याला केकारव म्हणतात. असा हा दिमाखदार, सुंदर पक्षी माझा आवडता पक्षी आहे.
=========================
शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment