माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 1 February 2026

प्राणी / पक्षी महत्त्वपूर्ण माहिती

(१) शहामृग 

शहामृग हा सर्वांत मोठा पक्षी आहे. तो इतर पक्षांप्रमाणे उडू शकत नाही. त्याचे पाय लांब व मजबूत असतात.  तो वेगाने धावतो व धावतांना दिशा बदलविण्यासाठी पंखांचा वापर करतो. 
-----------------------------------------------
(२) सिंह 

सिंह हा जंगलचा राजा म्हणून ओळखला जातो. तो एक मासभक्षक प्राणी आहे. गुजरातमधील गीर हे सिंहासाठी संरक्षित वनक्षेत्र आहे. चितळ, हरिण, काळवीट,  रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहाचे खाद्य आहे. सिंह दिवसातील २० तास झोपतो. 
----------------------------------------------------
(३) मोर 

मोर हा प्रामुख्याने पानझडी वनात राहणारा पक्षी आहे. मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. मोरांमध्ये नराला पिसारा असतो मादीला नसतो. मोराची पिसे खूप सुंदर असतात. मोरांची गणना ही मोठ्या पक्षांमध्ये होते. निळ्या रंगाचा मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. आकाशात काळे ढग तयार झाले की मोर आपला पिसारा फुलवून नाचतो.
------------------------------------------------------
(४) कांगारू 

कांगारू हा ऑस्ट्रेलिया या देशात आढळणारा एक शाकाहारी प्राणी आहे. तो नेहमी गवताळ प्रदेशात राहतो. तो खाल्लेले गवत रवंथ करू शकतो. कांगारूचे सर्वांत वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कांगारू मादीच्या पोटाला एक पिशवी असते ती त्यामध्ये आपल्या बाळाला ठेवते. कांगारू उडी मारण्यासाठी शेपटीचा आधार घेतो. तो मागे उलट्या दिशेने चालू शकत नाही.
-------------------------------------------------------
(५) घोडा 

घोडा हा एक शक्तिशाली, वेगवान व चपळ प्राणी आहे. तो उभ्यानेच झोपतो. अतिप्राचीन काळापासून घोड्याचा वापर वाहन म्हणून केला जातो. घोडा हा जमिनीवर खाली बसत नाही. तो तीन पायावर उभा राहून एका पायाला आराम देतो.
--------------------------------------------------------
(६) गेंडा 

गेंडा हा प्राणी शाकाहारी आहे, त्याचे अन्न गवत आणि झाड आहे. त्याचा आकार अवाढव्य असून तो भयंकर दिसतो. त्याच्या पाठीवरील चामडी जाड असते. गेंड्याच्या नाकावर दिसणारे शिंग हे केसांपासून तयार झालेले असते. तो जंगली प्राणी आहे. त्याला एकटे राहायला आवडते.
--------------------------------------------------------
(७) शेळी 
शेळी ही पाळीव प्राणी आहे. तिचे पोट चार कप्प्यांचे बनलेले असते. तिच्या डोळ्यातील बाहुल्या आयताकृती असतात. शेळी रात्रीच्या वेळी आंधारात सुध्दा चांगले पाहू शकते. शेळीचे दुध पौष्टिक असते. तिच्याकडे जिज्ञासू प्राणी म्हणून पाहिले जाते.
----------------------------------------------------------
(८) अजगर 

अजगर हा सर्वांत मोठा बिनविषारी साप आहे. त्याचे शरीर लांब व बोजड असते. तो भक्ष पकडतांना शरीराची वेटोळे करून भक्षाला गुंडाळून आवळत राहतो. भक्षाला गिळतो व त्याची हाडे पचवितो. एकदा शिकार केल्यावर तो सहा महिने शिकार न करता राहू शकतो.
-----------------------------------------------------------
(९) माकड 

माकड हा पृष्टवंशीय सस्तन प्राणी आहे. तो शेपटी असणारा एक केसाळ प्राणी जो मानवाचा पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी भाषा असते. माकडांमध्ये मानवाप्रमाणे निर्णयक्षमता असते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये भावना असतात. 
--------------------------------------------------------
(१०) कावळा 

कावळा हा माणसाच्या वसाहतीजवळ राहणारा पण घरात न येणारा प्राणी आहे. तो चालाख, सावध व चपळ स्वभावाचा पक्षी आहे. कावळा हा मेलेल्या प्राण्याचे मांस खातो. नर व मादी दिसायला सारखेच असतात. कावळा हा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी आहे. त्याचा आवाज कर्णकर्कश असतो. 
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
9422736775 /  7721941496

No comments:

Post a Comment