माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 2 July 2017

झाडांसंबंधी घोषवाक्ये

   
       झाडांसंबंधी घोषवाक्ये

(१)वनश्री हीच धनश्री  !

(२)झाडे लावा, झाडे जगवा  !

(३) वृक्ष जगवा, जीवन फुलवा  !

(४) झाड तेथे पाखरू, धरतीचे लेकरू !

(५)झाडांना जगवाल,
     तरच सुखाने जगाल !

(६) झाडे लावू घरोघरी,      
     पर्यावरण राखू गावोगावी  !

(७) झाडे लावू कशासाठी ? -
     सर्वांच्या सुखासाठी  !

(८) झाडे लावा खूप खूप ,
     जमिनीची थांबेल धूप  !

(९) हिरवी हिरवी गार गार,
     झाडे लावू चार चार  !     

(१०) वनीकरणास द्या साथ,
       गावाचा करा विकास  !     

(११) वनीकरणास साथ देऊ,
        गावाचा विकास करू  !
-------------s.s.chaure ----------------

(१२) वृक्ष लावू घरोघरी,
       औषधे मिळतील गुणकारी  !    

(१३)झाडे लावू कशासाठी ?
      - पक्ष्यांच्या घरट्यासाठी

(१४) माकडा माकडा हूप हूप,
        झाडे लावा खूप खूप  !

(१५)झाडे लावू कशासाठी ?
      - माणसांच्या अन्नासाठी  !

(१६) झाडे  लावू कशासाठी ?
      - भरपूर पाऊस पडण्यासाठी  !

(१७) वृक्ष तोड रोखा, पर्यावरण राखा  !

(१८) वृक्ष तोड टाळा, पर्यावरण सांभाळा !

(१९) झाडांचे रक्षण, आपले संरक्षण  !

(२०) वृक्षांचे रक्षण, हेच मूल्यशिक्षण  !

(२१) करू रक्षण झाडाचे,
        साधेल कल्याण मानवाचे

  संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री  जि.धुळे 
                 📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment