माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 28 February 2018

MY  FAVOURITE  FESTIVAL  : HOLI

   Holi is a very popular festival in India. It is celebrated on falgun  paurnima. It falls in the month  of March. people gather firewood, twigs and dry grass on that day. They stand a silk - cotton tree and arrange the firewood and the dry grass around it. At night they set fire to it. 

   It is a big fir. People worship the fire. women offer flowers and coconuts to Holi and move round in circles. Boys and men shout loudly and women sing devotional songs. There are different legends about Holi festival.  

    The day after the Holi is a day of great joy.  People splash colour and coloured water at one another. They saing songs. This colour splashing is called  ' Dhulwad'. People have a lot of  fun.  Indeed,  it is the festival  of 

Colours.  I like it very much.

---  SHANKAR  SITARAM  CHAURE 
      9422736775   ( DHULE )

Sunday 25 February 2018

Colours Question

(1) What is the colour of a crow  ?
Ans - A crow is black.

(2) What is the colour of the sun  ?
Ans - The sun is yellow.
(3) What is the colour of an orange  ?
Ans - An orange is orange.

(4) What is the colour of an apple  ?
Ans - An apple is red.

(5) What is the colour of a brinjal  ?
Ans - A brinjal is purple.

(6) What is the colour of the sky  ?
Ans - The sky is blue.

(7) What is the colour of an egg  ?
Ans-  An egg is white.

(8) What is the colour of lotus  ?
Ans - A lotus is pink.

(9) What is the colour of a leaf  ?
Ans - A leaf is green.

(10) What is the colour of a parrot  ?
Ans - A parrot is  green.

============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि. प. प्रा.शाळा बांडीकुहेर
               केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळे
               9422736775

Tuesday 20 February 2018

चांगल्या सवयी / अच्छी आदतें  / GOOD HABITS


(१) सकाळी लवकर उठा.
     सुबह जल्दी उठो ।
     Get up early in the morning.

(२) दात साफ करा.
     दाॅत साफ करों ।
     Brush your teeth.

(३) दररोज व्यायाम करा.
      हररोज कसरत करों ।
      Take exercise regularly.

(४) अंघोळ करा.
      स्नान करों ।
      Take a bath.

(५) स्वच्छ कपडे घाला.
      साफ कपडे पहनों ।
      Wear  clean clothes.

(६)  जेवणापूर्वी हात धुवा.
       खाने से पहले हाथ धों ले ।
       Wash your hand's before meal.

(७) ताजे व स्वच्छ अन्न खा.
     ताजा और साफ खाना खाओ ।
     Eat  fresh  and clean food.

(८) स्वच्छ पाणी प्या.
     साफ पाणी पिजिए  ।
     Drink  clean water.

(९) वेळेवर शाळेत जा.
      वक्तपर स्कूल जाओ ।
      Go to school in time. 

(१०) रोजचा अभ्यास रोज करा.
        हररोज की पढाई हररोज करें ।
        Do your homework daily.

(११) सर्व स्पर्धांत भाग घ्या.
       सभी स्पर्धा ओंमे हिस्सा लें ।
       Take part in every  competition. 

(१२) मोकळ्या हवेत खेळा.
        खुली हवा में खेलो ।
        Play in open air .

(१३) इतरांना मदत करा.
        औरोंको मदद् करो ।
        Help the others.

(१४) नेहमी खरे बोला.
        हमेशा सच बोलो ।
        Always speak true.

(१५) पैशांची बचत करा.
        पैसे बचाइएॅ  ।
        Save money.
===========================
संकलन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
             जि. प. प्रा. शाळा -बांडीकुहेर
             केंद्र -रोहोड ता. साक्री जि. धुळे
             ९४२२७३६७७५
   

Monday 19 February 2018

भाषिक उपक्रम :- ऐका व सांगा

       भाषिक उपक्रम - ऐका व सांगा.

 
■उद्देश :-- तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा
               सांगता येणे.

■सूचना :- सांगितलेली माहिती काळजीपूर्वक
               ऐका व परत सांगा.

 ●संच -१
   गाय पाळीव प्राणी आहे.
  वाघ जंगली प्राणी आहे.

 ●संच - २
  सिंह जंगली प्राणी आहे.
  घोडा पाळीव प्राणी आहे.

 ●संच - ३.
  मोर राष्ट्रीय पक्षी आहे.
  कोंबडा पाळीव पक्षी आहे.

 ● संच - ४.
  बदक पाण्यात पाहते.
  घार आकाशात उंच उडते.

● संच - ५.
   ऊस गोड असतो.
   मिरची तिखट असते.

 ●संच - ६.
   चिंचेचे पान छोटे असते.
   वडाचे पान मोठे असते.

 ●संच - ७.
   सूर्य सकाळी उगवतो.
   सूर्य संध्याकाळी मावळतो.

 ●संच - ८
   उन्हाळ्यात कडक ऊन असते.
   हिवाळ्यात थंडी असते.

●संच -९.
   कापसापासून कापड बनते.
   ऊसापासून साखर बनते.

 ●संच - १०.
   बगळ्याचा रंग पांढरा असतो.
   कावळ्याचा रंग काळा असतो.

 ● संच - ११.
   मीठ खारट असते.
   लिंबू आंबट असते.

 ● संच - १२.
   गुलाबाच्या झाडाला काटे असतात.
   गुलाबाचे फूल अत्यंत सुंदर असते.

 ● संच - १३.
   आरसा काचेपासून तयार करतात.
   आरशात आपला चेहरा पाहता येतो.

 ●संच - १४.
   ज्वारीची भाकर करतात.
   गव्हाची चपाती करतात.
   तांदळाचा भात करतात.
   डाळीची आमटी करतात.

 ● संच - १५.
   ससा गवत खातो.
   ससा भित्रा असतो.
   पण तो चपळ असतो.

 ● संच -१६.
   आम्ही सकाळी लवकर उठतो.
   दात स्वच्छ घासून तोंड धुतो.

 ● संच - १७.
   रात्र संपते, सकाळ होते.
   पाखरांची किलबिल सुरू होते.

  संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि. धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

  
  
  

Thursday 15 February 2018

कारणे सांगा  ?

(१) चंद्रावर आवाज ऐकू येत नाही.

- आवाजाच्या लहरी प्रसार होण्यास हवेसारख्या
   माध्यमाची गरज असते. या प्रकारचे माध्यम
   चंद्रावर नसल्याने ध्वनी ऐकू येत नाही.

-----------------------------------------------------

(२) हत्ती फार वेगाने धावू शकत नाही  ?

-- हत्ती आकाराने मोठा असतो. त्याचे शरीर
   अवजड असते. पायदेखील जाडजूड
    असतात. म्हणून हत्ती फार वेगाने धावू
     शकत नाही.

-----------------------------------------------------

(३) वाळवंटात राहणारे  लोक उंट कशासाठी
      पाळतात ?

-- वाळवंटातील वाहतुकीसाठी तेथील लोक
  उंट पाळतात. वाळूवर चालण्यासाठी उंटाला
  खास खूर असतात. त्याला उष्णतेचा त्रास
  होत नाही. त्याला पाण्याची गरज भासत नाही.
  म्हणून  ' वाळवंटातील जहाज ' अशी ओळख
  असलेला उंट तेथील लोक पाळतात.

----------------------------------------------------संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि. प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
               ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Wednesday 14 February 2018

Word  game ( शब्द खेळ )

Add letters before and / or after the given words to make meaningful words.
(दिलेल्या शब्दाच्या पूर्वी किंवा नंतर अक्षरे वाढवून अर्थपूर्ण शब्द बनवा.)
(1)  is   :   fish,  dish,  wish, rish,
                  fist,  wise,  visit,  rise.
(2) are  :  fare,  care,  mare,  bare,
                  area,  carefully, scare.
(3) on  :  one,  only,  onion,  lion
                moon,  pond,  noon.
(4) at  :  bat,  hat,  that,  ate,  date,
               late,  mat cat,  rat .
(5) in  :  ink , income,  inside, pin,
               fine,  nine,  line, tin.
(6) no  : not,  nose,  notebook, now,
               noun,  cannot .
(7) all   : ball,  call,  wall, hall,  shall,
                fall,   balloon,  tall.
(8) her  : mother,  brother, hero,
                 here,  there,  weather.
(9) an  :  and,  pan,  band,  man,
                 can,  ran,  ant,  animal.
(10) our  : hour,  ours, favour, pour,
                   favourite,  ourself
-------------------------------------------------

   SHANKAR  SITARAM  CHAURE

               Pimpalner  (Dhule)
                     9422736775
                  
                

Tuesday 13 February 2018

तीन संख्यांची बेरीज (तोंडी)

        
(१) ५ + ५ + ५ = १५
(२) १० + १० + १० = ३०
(३) १५ + १५ + १५ = ४५
(४) १० + २० + २० = ५०
(५) २० + २० + २० = ६०
(६) २५ + २५ + २५ = ७५
(७) ३० + ३० + २० = ८०
(८) ३० + ३० + ३० = ९०
(९) ४० + ४० + २० = १००
(१०) ४० + ४० + ४० = १२०
(११) ५० +  ५० + ५० = १५०
(१२) ६० + ६० + ६० = १८०
(१३) १०० + ५० + ५० = २००
(१४) ७० + ७० + ७० = २१०
(१५) ८० + ८० + ८० = २४०
(१६) ९० + ९० + ९० = २७०
(१७) ११ + ११ + ११ = ३३
(१८) २२ + २२ + २२ = ६६
(१९) ३३ + ३३ + ३३ = ९९
(२०) ४४ + ४४ + ४४ = १३२
(२२) ५५ + ५५ + ५५ = १६५
(२३) ६६ + ६६ + ६६ = १९८
(२४) ७७ + ७७ + ७७ = २३१
(२५) ८८ + ८८ + ८८ = २६४
(२६) ९९ + ९९ + ९९ =२९७
(२७) १०० + १०० + १०० = ३००
(२८) २०० + २०० +  २०० = ६००
(२९) ३०० + ३०० + ३०० = ९००
(३०) ४०० + ४०० + ४०० = १२००
(३१) ५०० +५०० + ५०० = १५००
(३२) ६०० + ६०० + ६०० = १८००
(३३) ७०० + ७०० + ७०० = २१००
(३४) ८०० + ८०० + ८०० = २४००
(३५) ९०० + ९०० + ९०० = २७००
(३६) १११ + १११  + १११ = ३३३
(३७) २२२  + २२२ + २२२ = ६६६
(३८) ३३३ + ३३३ + ३३३ = ९९९
(३९) ४४४ + ४४४ + ४४४ = १३३२
(४०) ५५५  + ५५५ + ५५५  = १६६५
(४१) ६६६ + ६६६  + ६६६ = १९९८
(४२) ७७७ + ७७७ + ७७७ = २३३१
(४३) ८८८ + ८८८ + ८८८ = २६६४
(४४) ९९९ + ९९९ + ९९९ = २९९७
लेखन  :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि. धुळे
                   ९४२२७३६७७५
 
        

Monday 12 February 2018

फुलपाखरांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती घेऊ या !

  फुलपाखरे सर्वांना खूप आवडतात. विशेषत:
लहान मुलांना तर ती खूपच आवडतात.
भारतात फुलपाखरांच्या सुमारे १५०० प्रजाती
आहेत. प्रत्येक फुलपाखराची वनस्पती ठरलेली
असते. ते त्या वनस्पतींना येणाऱ्या फुलांकडूनच
रंगद्रव्य घेतात. त्यांच्या पंखांमध्ये एक गंमत
असते. उघडलेल्या पंखावर खूप आकर्षक रंग
दिसतात;  परंतु मिटलेल्या पंखांची रंगछटा
फिकट असते, त्यामुळे फुलपाखरे झाडावर
पंख मिटून बसली, की आपल्याला ओळखू
येत नाहीत. अशा प्रकारे फुलपाखरे स्वतःचे
संरक्षण करतात. आणखी एक गमतीची गोष्ट
म्हणजे फुलपाखरांमुळे फळे तयार होतात,
हे  तुम्हाला माहीत आहे का ? फुलपाखरे या
फुलावरून त्या फुलावर जाताना त्यांच्या
पायांना चिकटून एका फुलातील परागकण
दुसर्‍या फुलात जातात. आणि फुलाचे फळात
रूपांतर होते. अशा तर्‍हेने फलधारणेच्या कामात
फुलपाखरे मदत करतात. अशी ही फुलपाखरे
सगळ्यांना का आवडणार नाहीत.
   महाराष्ट्रात नाशिक, रत्नागिरी, मुंबई येथे
फुलपाखरांची स्वतंत्र उद्याने आहेत.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे( प्रा. शिक्षक)
               जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                 ९४२२७३६७७५

Sunday 11 February 2018

दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

(१)  सा,  आ,  र        = आरसा
(२)  ष,   ध,  औ        =  औषध
(३)  व,  ळा,  आ       =  आवळा
(४)  त,  र,  क, व       = करवत
(५)  ग,  घा,  र           = घागर
(६) ले,   म,  झि         = लेझिम
(७) ल,  हि,  य,  मा    = हिमालय
(८) ड,  का,  प         = कापड
(९) स्त,  पु , क         = पुस्तक
(१०) सा, क, य, ल    = सायकल
(११) श,  का,  आ     = आकाश
(१२) गा,  र,  ज        =  गाजर
(१३) क,  शं,  र        =  शंकर
(१४) ही,  वि,  र       =  विहिर
(१५) क,  ग,  लिं, ड   = कलिंगड
(१६) री, क, त,  शे    = शेतकरी
(१७) म, रा, हा,  ष्ट्र    = महाराष्ट्र
(१८) रू, फु, पा, ल, ख   = फुलपाखरू
(१९)  त,  भा,  र      = भारत
(२०) री, प,  क्षा       = परीक्षा
-------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि. प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
               ता.  साक्री  जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Thursday 8 February 2018

उतारा ऐका व सांगा.

 
(१) हा माझा भारत देश .
     छान छान माझा देश.
     देशात गावे आहेत.
     गावात माणसे आहेत.
     गावात नदी आहे.
-----------------------------------
(२) घरातील केर दारात नको.
      दारातील केर रस्त्यात नको.
      सारा केर उचलू या.
      कचराकुंडीत टाकू या.
      गाव स्वच्छ ठेवू या  !
-----------------------------------
(३) थंड हवा सकाळची.
      गरम हवा दुपारची.
     गार हवा रात्रीची.
      ही तर जादू सूर्याची.
      नाही कधीच संपायची  !
----------------------------------
(४) दातांना मंजन लावावे.
     स्वच्छ तोंड धुवावे.
     दररोज अंघोळ करावी.
     वाढलेली नखे काढावीत.
     स्वच्छ कपडे घालावेत.
----------------------------------
(५) ही पाहा माझी शाळा.
     शाळेभोवती बाग आहे.
     बागेत फुलांची झाडे आहेत.
     आम्ही झाडांना पाणी घालतो.
     आम्ही बागेतील गवत काढतो. 
=======================
 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता. साक्री जि.धुळे
                 ९४२२७३६७७५

Tuesday 6 February 2018

माहित आहे का तुम्हांला  ?

     
(१) भारतीय अंतराळवीर -राकेश शर्मा :-
  १९८४ साली अवकाशात जाणारे हे पहिले
भारतीय अंतराळवीर होत. इस्त्रो व सोव्हिएत
इंटरकाॅसमाॅस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमे-
साठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस
वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे
पाहताना त्यांनी भारतीयांना ' सारे जहाॅसे
अच्छा, हिंदोस्ताॅ हमारा !' हा संदेश पाठवला.
===========================
(२) २०११  साली भारत विरूद्ध वेस्ट इंडिज
 क्रिकेट सामन्यामध्ये सुरूवातीच्या एका
 षटकात सचिन तेंडुलकर यांचा झेल वेस्ट
 इंडिजच्या गोलंदाजाने पकडला. गोलंदाजाने
पंचाकडे अपील केले. चेंडूचा स्पर्श बॅटला
झालेला नाही, असे वाटून पंचांनी तेंडुलकर
नाबाद असल्याचा निर्णय दिला; परंतु चेंडूचा
स्पर्श आपल्या बॅटला झाला आहे, हे माहित
असल्याने, नाबाद घोषित असूनही सचिन
तेंडुलकर मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परतले.
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५
 
 

Monday 5 February 2018

वाक्यांचे प्रकार ( मराठी -व्याकरण )


(१) विधानार्थी वाक्य :-
     ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते,
त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.अशा वाक्याची
सुरूवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो.
कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी
असते.
   उदा. (१) बाबा नाशिकला गेले.
          (२) मी इयत्ता दहावीत शिकतो.
     

(२) प्रश्नार्थक वाक्य :-
      ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो
  त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
 (शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच वाक्य प्रश्नार्थक
   समजावे.)
     उदा. (१) तू केव्हा परत येणार आहेस ?
            (२) तुमचे उपकार मी कसे विसरेन ?

(३) उद्गागारार्थी वाक्य :-
     ज्या वाक्यात भावनेचा उद्गागार काढलेला
असतो, त्यास उद्गागारार्थी वाक्य म्हणतात.
अशा वाक्याच्या शेवटी उद्गागारवाचक चिन्ह
असतो.
       उदा. (१)अबब  ! केवढा मोठा साप हा  !
              (२) शी ! काय हे अक्षर तुझे  !

(४) होकारदर्शक वाक्य :-
       ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो,
त्यास होकारदर्शक वाक्य म्हणतात.
        उदा. (१) माझ्याजवळ पैसे आहेत.
               (२) मी आज गावाला जात आहे.

(५) नकारार्थी वाक्य :-
      ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो,
त्यास नकारदर्शक वाक्य म्हणतात.
           उदा.(१) कधीही खोटे बोलू नये.
                 (२) दुसर्‍याची निंदा करू नये.

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                ९४२२७३६७७५

Sunday 4 February 2018

वाक्ये ( पहा, वाचा व लिहा.)


(१)  अजय करवत धर.
(२)  रमण बदक धर.
(३)  शबनम घर बघ.
(४)  अक्षय सरळ चल.
(५)  अमर धरण बघ.
(६)  अभय भजन कर.
(७)  गणपत झटपट चल.
(८)  अकबर दगड जमव.
(९)  अमर भरभर चल.
(१०) कमल सरबत कर.
(११) भरत दगड ढकल.
(१२) रतन करवत पकड.
(१३) नयन वरण कर.
(१४) अजय वजन कर.
(१५) अजय जलद पळ.
(१६) मदन झरझर उतर.
(१७) अहमद लवकर परत चल.
(१८) कमल गवत पटपट उचल.
(१९) गणपत झटपट वजन कर.
(२०) करण पटकन वर चढ.
(२१) अक्षय चटकन बस पकड.
(२२) रतन बटण बदल.
(२३) वरद खडक बघ.
(२४) जगन जग उचल.
(२५) रजत ढग बघ.
(२६) शरद नळ उचल.
(२७) भवन मजजवळ बस.
(२८) धवल जलद पळ.
(२९) शरण हळद बघ.
(३०) छगन हरण बघ.
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                ९४२२७३६७७५

Thursday 1 February 2018

उतारा वाचा / ऐका प्रश्नांचे  उत्तर सांगा.(आकलन)

  वृक्ष सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असतात.
फळे, पाने, फुले, खोड हे वृक्षांचे सारेच
अवयव कामास येतात. अन्न, इमारतींसाठी
लाकूड, औषधे इत्यादी आपणास झाडे
प्रत्यक्षपणे देतात. तर अप्रत्यक्षपणे अनेक
प्रकारचे लाभही आपणास झाडांमुळे होतात 
आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा
प्राणवायू म्हणजे आॅक्सिजन ! तो वृक्षांमुळे
सहजतेने मिळतो. वृक्षांची मुळे जमिनीची धूप
थांबवितात. झाडे थंड हवा देतात. पाऊस
देतात.
        झाडे जितकी जास्त तितका पाऊस
चांगला पडतो. सध्या माणसे लाभापायी अन्
लोभापायी खूप झाडे तोडत आहेत. म्हणून
पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. यातून मग
दुष्काळ तीव्र पाणीटंचाई या सारख्या गंभीर
समस्या निर्माण होत आहे आहेत. त्यामुळे
वृक्षतोड थांबवून जास्तीत जास्त वृक्ष लावले.
पाहिजेत.  लक्षात ठेवा.
    ' झाडे वाढवा, भविष्य घडवा. '
-----------------------------------------------------
प्रश्न :--
(१) वृक्ष कोणासाठी उपयुक्त असतात ?
उत्तर :- वृक्ष सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असतात.

(२) वृक्षांचे कोणते अवयव कामास येतात.
उत्तर :- फळे, पाने, फुले, खोड.

(३) प्राणवायू म्हणजे काय  ?
उत्तर :- आॅक्सिजन

(४) या उता-यात कोणता संदेश दिला आहे.
    ते सांगा.
उत्तर :- ' झाडे वाढवा, भविष्य घडवा. '
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि. प.प्रा. शाळा- बांडीकुहेर 
              ता. साक्री जि.धुळे 
              ९४२२७३६७७५