माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 15 February 2018

कारणे सांगा  ?

(१) चंद्रावर आवाज ऐकू येत नाही.

- आवाजाच्या लहरी प्रसार होण्यास हवेसारख्या
   माध्यमाची गरज असते. या प्रकारचे माध्यम
   चंद्रावर नसल्याने ध्वनी ऐकू येत नाही.

-----------------------------------------------------

(२) हत्ती फार वेगाने धावू शकत नाही  ?

-- हत्ती आकाराने मोठा असतो. त्याचे शरीर
   अवजड असते. पायदेखील जाडजूड
    असतात. म्हणून हत्ती फार वेगाने धावू
     शकत नाही.

-----------------------------------------------------

(३) वाळवंटात राहणारे  लोक उंट कशासाठी
      पाळतात ?

-- वाळवंटातील वाहतुकीसाठी तेथील लोक
  उंट पाळतात. वाळूवर चालण्यासाठी उंटाला
  खास खूर असतात. त्याला उष्णतेचा त्रास
  होत नाही. त्याला पाण्याची गरज भासत नाही.
  म्हणून  ' वाळवंटातील जहाज ' अशी ओळख
  असलेला उंट तेथील लोक पाळतात.

----------------------------------------------------संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि. प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
               ता. साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment