माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 31 August 2018

मला शाळेत काय शिकायला मिळेल  ?

👫  एक चांगलं माणूस कसं व्हावं, इतरांशी
    आदराने कसं वागावं हे मला शिकायला
    मिळेल. आपल्या राज्यघटनेत जे समानतेचं
    मूल्य आहे ते आचरणात कसं आणावं हे
    मला शिकायला मिळेल.

👫  वाचणे, लिहिणे आणि गणित या मूलभूत
    विषयांखेरीज मला गाणी म्हणायला,
    नाचायला, रंगकाम करायला मिळेल आणि
    वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घ्यायला मिळेल.

👫  माझ्या शरीराची काळजी घेण्यासाठी काय
    करायला हवं, माझी वाढ कशी होते, माझे
    शरीर कसे सशक्त होते हे मला शिकायला 

    मिळेल.

👫  मला आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी शाळेमध्ये
    असतील ज्यामुळे मला शाळेत जाताना
    आनंद वाटेल. मला शाळेत रोज नवनवीन
    गोष्टी शिकायला मिळतील.

👫  अभ्यासाबरोबरच शाळेत मला हाताने
    करायच्या गोष्टी, हस्तकौशल्य शिकायला
    मिळतील. त्याचा भविष्यात मला चांगला

    उपयोग होऊ शकतो.

👫  मला माझ्या मातृभाषेत बोलायला आणि
    वाचायला आवडते. माझ्या शिक्षकांनी
    जर माझ्या मातृभाषेचा शाळेत उपयोग
   केला तर मला छान वाटेल.

👫  शाळेत शिकत असताना मला खूप कल्पना
    सुचत असतात, डोक्यात खूप विचार येत
    असतात. माझ्या कल्पना, माझे विचार
    वर्गात बोलायचे स्वातंत्र्य मला आहे.

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               धुळे / ९४२२७३६७७५

Thursday 30 August 2018

नातेसंबंधावर आधारित प्रश्नावली

● नातेसंबंधांवरील प्रश्न सोडविण्याआधी सर्वप्रथम स्वतःच्या
     घरातील नाती व त्यामधील संबंध समजावून घ्यावेत.

(१) आईच्या आईला काय म्हणतात  ?
---  आजी

(२) आईच्या बहिणीला काय म्हणतात  ?
--- मावशी

(३) वडलांच्या बहिणीला काय म्हणतात  ?
--- आत्या

(४) वडलांच्या भावाला काय म्हणतात  ?
---  काका

(५) वडलांच्या वडलांना काय म्हणतात  ?
--- आजोबा

(६) आईच्या भावाला काय म्हणतात  ?
--- मामा

(७) आईच्या वडलांना काय म्हणतात  ?
--- आजोबा

(८) आईची मुलगी आपली कोण  ?
--- बहिण

(९) मामाचे बाबा (वडील) आपले कोण  ?
--- आजोबा

(१०) मामाची आई आपली कोण  ?
---  आजी

(११) मावशीची आई आपली कोण  ?
--- आजी

(१२) आईचा मुलगा आपला कोण  ?
----  भाऊ

(१३)आईच्या बहिणीची मुलगी आपली कोण ?
----  मावसबहिण

(१४) काकांचे बाबा (वडील) आपले कोण  ?
---- आजोबा

(१५) आत्याचे बाबा(वडील) आपले कोण  ?
----  आजोबा

(१६)  काकांची आई आपली कोण  ?
---- आजी

(१७) काकांची बायको आपली कोण  ?
----  काकी

(१८) काकांचा मुलगा आपला कोण  ?
---- चुलतभाऊ

(१९) काकांची मुलगी आपली कोण  ?
----  चुलतबहिण

(२०)बाबांची(वडिलांची) बहिण आपली कोण  ?
----- आत्या

(२१) मी माझ्या आई - वडिलांचा कोण  ?
---- मुलगा

(२२) मी माझ्या आजी - आजोबांचा कोण  ?
----  नातू

(२३) मी माझ्या काका - काकींचा कोण  ?
----  पुतण्या

(२४) मी माझ्या मामा -मामीचा कोण  ?
-----  भाचा

=========================     
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            धुळे  /  ९४२२७३६७७५

Wednesday 29 August 2018

MY  FAVOURITE

       
●Tell us about your favourite things.
 (तुझ्या आवडत्या गोष्टींविषयी सांग )

(1) My favourite colours
----  Red ,  Blue.

(2)  My favourite games
---   Kho -Kho ,  Cricket.

(3) My favourite fruits.
----  Mango ,  Apple .

(4) My favourite vegetables.
----  Brinjal,  Cabbage . .

(5) My favourite domestic animals.
----  Cow,   Dog.

(6) My favourite wild animals.
----  Tiger,  Deer.

(7) My favourite birds.
----   Peacock ,  Crow.

(8) My favourite flowers.
----  Rose,  Marigold.

(9) My favourite trees
----  Coconut ,  Mango tree.

(10) My favourite grains
----   Rice ,  Ragi.

(11) My favourite dry  fruits
----   Cashew nut,  Date.

(12) My favourite  foods.
----   Rice,  Daal

(13) My favourite vehicles.
----   Bus ,  Bicycle.

(14) My favourite  subjects
----   Mathematics ,  Art . 

(15) My favourite art
----   Drawing ,  Craft.

(16) My favourite jewels
----   Ring ,  Chain.

(17) My favourite aquatic animals
----    Fish ,  Crab.

(18) My favourite reptile animals.
----    Snail , Tortoise

(19) My favourite seasons
--     Rainy(monsoon),  Winter. 

(20) My favourite cities
----   Nasik,  kolhapur.

(21) My favourite forts
----   Raigad,  Pratapgad.
      
=========================     
लेखन  :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            धुळे - 9422736775
           
        

Tuesday 28 August 2018

भौगोलिक सामान्यज्ञान

(१) ग्रेगरियन वर्षाचे महिने किती  ?
----  १२

(२) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळाला काय म्हणतात  ?
---- दिन

(३) सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात  ?
----  रात्र

(४) मुख्य दिशा किती  ?
----  चार

(५) उपदिशा किती  ?
---- चार

(६) पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती  ?
---- ईशान्य

(७) पूर्व व दक्षिण यांमधील दिशा कोणती  ?
---- आग्नेय

(८) दक्षिण व पश्चिम यांमधील दिशा कोणती  ?
---- नैऋत्य

(९) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती  ?
---- वायव्य

(१०) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?
----  पूर्व

(११) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
---- पश्चिम

(१२) पूर्व दिशेच्या समोरची दिशा कोणती  ?
----  पश्चिम

(१३) दक्षिण दिशेच्या समोरची दिशा कोणती  ?
----  उत्तर

(१४) भारतीय सौर वर्षाचे महिने किती  ?
----  बारा

(१५) एका सप्ताहाचे /आठवड्याचे वार किती ?
----  सात
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            धुळे / ९४२२७३६७७५

 

Monday 27 August 2018

प्राणी व त्यांच्या हालचाली (सामान्यज्ञान)

● खालील प्राणी कोणत्या प्रकारच्या हालचाली
   करतात ते सांगा / लिहा.

(१) बेडूक --
--- बेडूक पायांनी टुणटुण उड्या मारू शकतो आणि पोहतो.

(२)  झुरळ --
--- झुरळ पायांनी चालते, पंखांनी उडते.

(३) फुलपाखरू --
--- फुलपाखरू पंखांनी उडते.

(४) गाय --
--- गाय चार पायांनी चालते. गरज असेल तेव्हा धावते.

(५) शहामृग --
--- शहामृग वेगाने धावते.

(६) कोळी --
--- कोळी आठ पायांनी आपल्या जाळ्यात चालतो.

(७) बदक --
--- बदक पायांनी जमिनीवर चालते. पाण्यात पोहते.

(८) साप --
--- सापाला पाय नसतात. त्यामुळे सरपटत एका
     ठिकाणाहून दुसरीकडे जातात.

(९) मासा --
---  माश्याला पाय नसतात. मासे पाण्यात
     पोहण्यासाठी त्यांच्या परांचा उपयोग करतात.

(१०) ससा --
---  ससा टुणटुण उड्या मारत जमिनीवर चालतो.

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                धुळे / ९४२२७३६७७५

Sunday 26 August 2018

महत्वपूर्ण गणितीय माहिती

                               
(१) १  मिनिट = ६० सेकंद .
(२)  ३ मिनिटे  = १८० सेकंद
(३)  ५ मिनिटे  =  ३०० सेकंद
(४)  १  तास = ६० मिनिटे .
(५)  २४ तास  = १ दिवस .
( ६)  ५ दिवस  = १२० तास
(७)  पाव तास =१५ मिनिटे.
(८)  अर्धा तास =३० मिनिटे.
(९)  पाऊण तास = ४५ मिनिटे .
(१०)  ७ दिवस = १ आठवडा.
(११ ) एका आठवड्याचे तास = १६८ तास
(१२) ३०/३१ दिवस = १ महिना.
(१३)  ३६५ दिवस =१ वर्ष .
(१४)  अर्धा वर्ष = ६ महिने .
(१५)  पाव वर्षे = ३ महिने .
( १६ ) पाऊण वर्ष =  ९ महिने
(१७)  लीप वर्ष = ३६६ दिवस
(१८)  सव्वा वर्ष =  १५ महिने
( १९ ) दीड वर्षे = १८ महिने
( २० ) अडीच वर्षे = ३० महिने
(२१) पावणेतीन वर्षे  = २ वर्षे ९ महिने
(२२)  एकशे = १००
(२३)  अर्धाशे = ५०
(२४)  पावशे = २५
(२५)  पाऊणशे = ७५
(२६)  सव्वाशे = १२५
(२७)  दीडशे = १५०
(२८)  अडीचशे = २५०
(२९) पावणेदोनशे = १७५
(३०)   साडेतीनशे = ३५०
(३१)   १ डझन =  १२ वस्तू
(३२)  अर्धा डझन = ६ वस्तू  .
(३३)  पाव डझन = ३ वस्तू
(३४)  पाऊण डझन = ९ वस्तू
(३५)   २४ कागद = १ दस्ता
(३६)   २० दस्ते =१ रीम
(३७)   ४८० कागद = १  रीम
(३८)  १ हेक्टर = १०० आर
(३९)  १ एकर =  ४००० चौ .मी
(४०)  १ मीटर = १०० सेंटिमीटर
(४१)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
(४२)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(४३)    पाऊण मीटर = ७५ सेंटिमीटर
(४४)  १ लीटर = १००० मिलिलीटर
(४५)  अर्धा  लीटर = ५०० मिलिलीटर
(४६)  पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४७)  पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४८)  १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
(४९)  अर्धा  किलोग्रॅम =५०० ग्रँम
(५०)  पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(५१)  पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
(५२)  १ किलोमीटर = १००० मीटर
(५३)  अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
(५४)  पाव  किलोमीटर =२५० मीटर
(५५)  पाऊण किलोमीटर =७५० मीटर
( ५६ ) अडीच किलोमीटर = २५०० मीटर
(५७)  १ हजार = १०००
(५८)  अर्धा  हजार = ५००
(५९)  पाव हजार =२५०
(६०)  पाऊण हजार  =७५०
(६१)  १२ इंच =१ फूट 
(६२)  ३ फूट =१ यार्ड
(६३)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम
(६४)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
(६५)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(६६)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६७)   १ टन= १० क्विंटल   
 ========================                                 
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            धुळे  / ९४२२७३६७७५

Friday 24 August 2018

FASTER  AND  FASTER -- ( Oral  Work )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

■ Listen to the  teacher. Repeat the words.
Repeat them faster and faster.

 ● sing - song  = ding - dong

● hot - pot  =  dot  - cot

● cut - but  =  hut - fut

● bed - red  =  fed  - sed

● hand - band  =  sand - land

● top  - stop  =  drop  - crop

● old  - cold  = told  - bold

● cake - make = take  - wake

● kite  - bite  = mite  - site

● name - same = game - tame

● man  - fan = van  - pan

● moon - noon = soon - boon

● hill - till  =  bill  - will

● good - food = mood - wood

● ball - call = tall  - hall

● book - look = hook - cook

● best - rest  =  test  - west

● nine - line = fine  - pine

=========================     
शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            धुळे / ९४२२७३६७७५

Thursday 23 August 2018

शब्दांचा अर्थ समजावून घेऊ या  !


(१) पोरका
--- आई वडिल नसलेला.

(२) निराधार
--- कोणाचाही आधार नसलेला.

(३) पाणवठा
--   गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.

(४) पूरग्रस्त
--- पुरांमुळे नुकसान झालेले लोक.

(५) आदिवासी
--- अगदी पूर्वीपासूनचे राहणारे.

(६) उत्क्रांती
---  हळूहळू हळूहळू होणारा बदल.

(७) क्रांती
--   कोणत्याही क्षेत्रात एकाकी होणारा मोठा बदल.

(८) चौक
--- चार रस्ते एकत्र येतात ती जागा.

(९) माहेर
--- लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर.

(१०) वरमाय
---    नव-या मुलाची आई.

(११) गायक
---    गाणे गाणारा

(१२) भुयार
---    जमिनीखालील गुप्त मार्ग.

(१३) जलचर
---    पाण्यात राहणारे.

(१४) वैमानिक
---    विमान चालवणारा

(१५) गस्त
---   हिंडून करावयाचा पहारा.

(१६) अजिंक्य
--      ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा.

(१७) स्वार्थी
---   स्वतःचा फायदा करून घेणारा.

(१८) जिज्ञासा
---   जाणून घेण्याची इच्छा.

(१९) वावटळ
--     गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.

(२०) अतिवृष्टी
---     खूप पाऊस पडणे.

=========================     

संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                धुळे- ९४२२७३६७७५

Wednesday 22 August 2018

दिवस - आठवडे - महिने - दिनदर्शिका (प्रश्नावली)

=============================
(१) एक आठवडा म्हणजे किती दिवस ?
---  ७ दिवस
(२) १ वर्ष म्हणजे किती महिने  ?
--- १२ महिने
(३) २४ महिने म्हणजे किती वर्षे  ?
---  २ वर्षे
(४) ३१ दिवसांचे इंग्रजी महिने किती  ?
---   ७ महिने
(५) ३०  दिवसांचे इंग्रजी महिने किती  ?
---  ४ महिने
(६) २८ किंवा २९ दिवसांचा इंग्रजी महिना कोणता  ?
---   फेब्रुवारी
(७) दोन आठवडे म्हणजे किती दिवस  ?
---  १४ दिवस
(८) ' दीड वर्षे ' म्हणजे किती महिने  ?
---  १८ महिने
(९) ' अडीच वर्षे ' म्हणजे किती महिने  ?
---   ३० महिने
(१०) ' पावणेतीन ' वर्षे म्हणजे किती महिने  ?
---   ३३ महिने
(११) 'तीन आठवडे ' म्हणजे किती दिवस  ?
---   २१ दिवस
(१२) मंगळवार ते रविवार यांदरम्यान किती दिवस येतात  ?
---   ४ दिवस
(१३) ७० दिवस = किती आठवडे  ?
---   १० आठवडे
(१४) १ दिवस म्हणजे किती तास  ?
---   २४ तास
(१५) ज्या इसवी सनाच्या संख्येला ४ ने भाग  जातो, त्याला कोणते
        वर्ष म्हणतात ?
 ---   लीप वर्ष
(१६) लीप वर्षांत फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतात  ?
---   २९  दिवस
(१७)सर्वसामान्यपणे वर्षाचे दिवस किती असतात?  
---   ३६५ दिवस
(१८) लीप वर्ष किती दिवसांचे असते  ?
---   ३६६ दिवस
(१९) नाताळ नंतर किती दिवसांनी नवीन वर्ष सुरू होते ?
---   ६ दिवसांनी
(२०) भारतीय सौर वर्षाचे फाल्गुन महिन्याचे दिवस किती  ?
---   ३०  दिवस.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Tuesday 21 August 2018

निबंध - आपले सण (थोडक्यात माहिती)


==========================
 
(१) रक्षाबंधन

   रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला असतो.
या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ती
त्याला ओवाळते, मिठाई देते. भाऊ आपल्या
बहिणीला भेटवस्तू देतो. राखी बांधून घेऊन
तो बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतो.
   या प्रथेमुळे बहीण - भावांचे प्रेम दृढ होते.
ही प्रथा सर्व भारतभर मोठ्या उत्साहाने
पाळतात. रक्षाबंधन सण आला की दुकानां-
मध्ये सुंदर, लहान - मोठ्या राख्या विक्रीसाठी
मांडून ठेवलेल्या असतात.
  महाराष्ट्रात हाच सण नारळी पौर्णिमा म्हणूनही
साजरा करतात. कोळी लोक समुद्राला देव
मानतात. खवळलेल्या समुद्राला त्या दिवशी
नारळ अर्पण करतात. ते समुद्राची पुजा करतात.
नवे कपडे आणि दागिने घालून नाचतात,गातात.
------------------------------------------------------

(२) ईद

     ईद हा मुसलमानांचा सण आहे. वर्षातून
खास रमजान ईद व बकरी  ईद या दोन ईद
ते साजऱ्या करतात.
  रमजान ईदमध्ये आकाशात चंद्राचे दर्शन
झाल्यावर मुसलमान रोजे  (उपवास)
पाळतात, आणि नमाज पढतात. हे रोजे एक
महिन्यानंतर परत चंद्राचे दर्शन झाल्यावरच
सोडतात व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर
उठून आंघोळ करून मशिदीत जातात व
नमाज पडतात.
   बकरी ईद हजरत इस्माईलच्या बलिदानाची
आठवण म्हणून साजरी करतात. दोन्ही ईदच्या
वेळी मुसलमान लोक नवे कपडे घालून
मशिदीत  जातात. व नमाज पडतात. त्यानंतर
एकमेकांना आलिंगन देऊन गाठीभेटी घेतात.
' ईद मुबारक ' म्हणून एकमेकांना शुभेच्छा
देतात. प्रत्येकाच्या घरी शीरकुरमा करतात
वे घरी आलेल्या प्रत्येक माणसाचे शीर- कुरमा
देऊन स्वागत करतात. बकरी ईदच्या दिवशी
मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात.
   थोडक्यात ईदच्या सणांमुळे प्रेम, एकात्मता
व बंधुभाव वाढीस लागतो.
----------------------------------------------------

(३) पोळा

        पोळा हा बैलपूजेचा सण आहे. बैल
शेतकऱ्याला मदत करतो. पोळा हा सण
बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण  
आहे. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला
जातो. भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या
कामात बैलांचा खूप उपयोग होतो. बैल
वर्षभर शेतात कष्ट करतो. त्याच्यामुळे
आपल्याला अन्न मिळते. बैल आपला पोशिंदा
आहे. त्याचा मान राखण्यासाठी हा सण
साजरा केला जातो. म्हणून या सणाला
' बैलपोळा ' असेही म्हणतात.
      पोळा हा सण श्रावणातल्या अमावस्येला
साजरा केला जातो. या दिवशी बैलांना
कोणत्याही प्रकारचे काम लावत नाही.
त्यांना या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी
माळरानावर सोडले जाते. आंघोळ घालून
सजवले जाते. त्याला ओवाळून त्याची पूजा
केली जाते. त्याला पुरणपोळीचे जेवण जेवू
घातले जाते. नंतर संध्याकाळी त्यांची
मिरवणूक काढली जाते.
        अशा तर्‍हेने शेतकरी पोळा हा सण
उत्साहाने साजरा करतात.
========================   
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
               मो. ९४२२७३६७७५

Monday 20 August 2018

चित्रे पहा, पाच वाक्यात माहिती लिहा

          भाषिक उपक्रम

(१) झाडाच्या फांदीवर बसलेला पोपट.

   हा पोपट आहे. पोपट झाडाच्या फांदीवर
बसला आहे. पोपटाचा रंग हिरवा आहे.
त्याची शेपटी लांब आहे. पोपटाची चोच
बाकदार आहे. चोचीचा रंग लाल आहे.
पोपटाच्या गळ्याभोवती लाल रंगाचा पट्टा
आहे. पोपट सुंदर आहे.
-----------------------------------------------

(२) जंगलात फिरणारा हत्ती.

   हा हत्ती आहे. हत्ती रानात हिंडतो आहे.
त्याचे शरीर अवाढव्य आहे. हत्तीला सोंड
आहे. तोंडाजवळ दोन बाकदार सुळे आहेत.
हत्तीचे कान सुपासारखे आहेत. त्याचे डोळे
इवलेसे आहेत. हत्तीची शेपूट आखूड आहे.
हत्तीचे पाय खांबासारखे आहेत.
-------------------------------------------------

(३) मांजर

    ही मांजर आहे. मांजर ही पाळीव प्राणी
आहे. तिच्या अंगावर मऊ केस आहेत.
तिचे डोळे घारे आहेत. मांजराला मिशाही
आहेत. मांजर काळ्या रंगाचे आहे.
-------------------------------------------------

(४) झाडाच्या फांदीवर बसलेला कावळा.

   हा कावळा आहे. कावळा झाडाच्या
फांदीवर बसला आहे. कावळ्याचा रंग
काळा आहे. मानेजवळचा भाग मात्र करडा
आहे. त्याची चोच खूप मोठीआहे. कावळा
सुंदर पक्षी आहे.
-------------------------------------------------

(५) कुत्रा.

   हा कुत्रा आहे. कूत्रा हा पाळीव प्राणी आहे.
कुत्रा शेपटी हलवत शेतात उभा आहे. त्याच्या
गळ्यात पट्टा आहे. कुत्र्याला दोन कान आहेत.
कुत्रा हा इमानी प्राणी आहे. तो घराची व
शेताची राखण करतो.

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

Sunday 19 August 2018

तर्कसंगती व अनुमान काढून उत्तर द्या.

  
(१) सुमितला चार काका आहेत, तर नाशिकला
      राहणाऱ्या त्याच्या काकांना भाऊ किती ?
--------------------------------------------------

(२) आदित्यचे वय आर्यनच्या वयाच्या दुप्पट
      आहे. आर्यनचे वय ८ वर्षे असल्यास
      आदित्यचे वय किती  ?
--------------------------------------------------

(३) सुप्रियाचे वय सृष्टीच्या वयाच्या निम्मे आहे.
      सृष्टीचे वय २६ वर्षे असल्यास सुप्रियाचे
      वय किती ?
--------------------------------------------------

(४) सुनिता अनिता पेक्षा उंच आहे. अनिता
      सोनाली पेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण ?
--------------------------------------------------

(५) शेव पेक्षा वडा तिखट, वड्यापेक्षा चिवडा तिखट
      आहे, तर सर्वात तिखट काय  ?
--------------------------------------------------

(६) कैरी चिंचेपेक्षा आंबट आहे, चिंच बोरापेक्षा
      आंबट आहे, बोर आवळ्यापेक्षा आंबट आहे
      तर सर्वात कमी आंबट काय आहे ?
--------------------------------------------------

(७) एका रांगेत सानियाच्या पुढे सहा व मागे आठ
      मुली आहेत तर रांगेत एकूण मुली किती  ?
--------------------------------------------------

(८) दर्शनाच्या वाढदिवसासाठी आणलेल्या
      आयताकृती केकचे समान सहा भाग
      करण्यासाठी त्याला किती ठिकाणी कापावे
      लागेल ?
--------------------------------------------------

(९) एक दोर सात ठिकाणी कापला तर त्याचे
     किती तुकडे होतील ?
--------------------------------------------------

(१०) २ मीटर अंतर या प्रमाणे एक झाड
       लावल्यास २० मीटर अंतरावर किती
       झाडे लावावी लागतील  ?
============================
उत्तरे :- (१) ४ ,  (२) १६ ,   (३) १३ ,   (४) सुनिता
          (५) चिवडा ,  (६) आवळा ,  (७) १५ ,
          (८) ३ ,  (९) ८ ,  (१०) ११ .        
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 [ धुळे ] ९४२२७३६७७५
 

Wednesday 15 August 2018

वेगळे काहीतरी वाचूया. /म्हणूया.


          मराठी भाषिक - उपक्रम
             
● वेगळे काहीतरी वाचता/ म्हणता येत
  असल्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा,
  त्या आनंदातून त्यांना वाचनाची गोडी
  लागावी आणि त्यांचा वाचनविकास व्हावा.
  यासाठी हे वाचन पाठ उपयुक्त ठरतील.

● वर्गामध्ये श्रुतलेखनाचा आणि अनुलेखनाचा
   सराव देण्यासाठीसुध्दा या वाचनपाठांचा
   उपयोग करता येईल.
 
 १.  कावळा

 काव काव काव
 बघा बघा कावळा
 पळा पळा पळा
 बघा बघा कावळा
 काळा काळा कावळा.
--------------------------------------

  २.  ससा

 बघा बघा ससा
 असा कसा ससा
 पांढरा पांढरा ससा
 बघा तर ससा.
---------------------------------------

   ३. पाऊस - पाणी

 काळा काळा ढग
 झरझर पाऊस
 सरसर सरी
 खळखळ पाणी
 बघा बघा पाऊस
 बघा बघा पाणी
 आपण भरू पाणी.
--------------------------------------

   ४.  पतंग बघा

 लाल लाल पतंग
 निळा निळा पतंग
 हिरवा हिरवा पतंग
 पिवळा पिवळा पतंग
 बघा बघा पतंग
 रंगीत पतंग
 पतंग आकाशात उडवतात.
 पतंग वरवर जातात.
---------------------------------------

   ५.  गुणी मनी

  म्याव म्याव मनी
  दिसते शहाणी
 वाटते तितकी नाही गुणी
 दुधाचे पातेले फस्त करूनी
 झटकन पळून जाते अंगणी.

=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

          

BRIDS -- (पक्षी )

     Birds have wings. So they can
fly. They  have strong  beaks but
no  teeth. They lay eggs. They
build nests to live in.

       (1) SPARROW

     A sparrow is a small bird. We     
see It  everywhere in India. It builds
its nest in our houses. It eats food
grains and small insects.
---------------------------------------------------

      (2)  CROW

    A  crow is black. It is a common
bird.  It  builds its  nest in  trees.
------------------------------------------------------

      (3)  HEN

       A  hen  is a common bird. It is
a  domestic bird.  It lays eggs.
some People eat its eggs.
-----------------------------------------------------

       (4)  PIGEON

       A  pigeon  is  a very  familiar
bird. It builds its  nest in the outer
parts of buildings  as well as in our
houses. It is a quiet, harmless bird.
----------------------------------------------------

      (5)   DUCK

       A  duck is a water bird. we find
it  near  ponds. It has a flat beak
and  webbed  feet.  It  quacks.
---------------------------------------------------

      (6)  PEACOCK

         A  peacock is a beautiful and
graceful  bird. It has a long train of
greenish feathers marked with bold
spots.  
        It  looks  very attractive when
It  opens out its features like a fan.
It is our national bird.
=========================== 

     SHANKAR  CHAURE (Teacher)
         DHULE  -- 9422736775

=========================== 

Friday 10 August 2018

मयूर ( मोर) प्रश्नावली

● सांगा सांगा उत्तर सांगा  ?

(१) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता  ?
उत्तर - मोर

(२) मोराला  'राष्ट्रीय पक्षी ' म्हणून बहुमान
      कोणत्या वर्षी मिळाला  ?
उत्तर - १९६२

(३) मोराच्या डोक्यावर काय असते  ?
उत्तर - तुरा

(४) मोर नाचायला कधी सुरूवात करतो  ?
उत्तर - आकाशात ढग गोळा झाल्यावर.

(५) मोर कोठे राहतो  ?
उत्तर - मोर नदीकाठी, सखल भागात किंवा
         गर्द झाडाझुडपांत राहतो.

(६) मोराचे घरटे कशाचे बनलेले असते  ?
उत्तर -- गवताचे.

(७) कोणत्या महिन्यात लांडोर अंडी घालतो ?
उत्तर -- ज्येष्ठ ते कार्तिक महिन्यात .

(८) मोराच्या नाचण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- मयूरनृत्य

(९) कोणत्या राज्यात पुष्कळ मोर आढळतात ?
उत्तर -- राजस्थान.

(१०) महाराष्ट्रात मयूर अभयारण्य कोठे आहे  ?
उत्तर -- बीड जिल्हात नायगाव येथे.

(११)मोराचा पिसारा कोणत्या रंगाचा आहे  ?
उत्तर -- सप्तरंगी.

(१२) मोराच्या मादीला काय म्हणतात  ?
उत्तर --  लांडोर.
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक) धुळे
               ¤ ९४२२७३६७७५ ¤

Thursday 9 August 2018

मराठी जोडाक्षरी शब्द जोड्या वाचूया./ लिहूया.

(१)धक्का  -- पक्का     (४१) वन्य - धान्य

(२)नक्कल -- अक्कल  (४२) पान्हा - तान्हा

(३)डाॅक्टर  -- ट्रॅक्टर     (४३) पन्हाळा - उन्हाळा

(४) रक्त     -- पक्त        (४४) सुप्त -- गुप्त

(५)शक्ती   -- भक्ती      (४५) गप्पा - पप्पा

(६) शक्य   -- वाक्य     (४६) प्रहार - प्रकार

(७)चक्र    -- वक्र        (४७) गब्बर - बब्बर

(८)लख्ख  -- मख्ख    (४८) तांब्या - ओंब्या

(९)सख्य   -- मुख्य     (४९) झिम्मा - अम्मा

(१०)लग्न   -- मग्न     (५०) साम्य -- रम्य

(११)भाग्य  -- योग्य    (५१) भैय्या - ठिय्या

(१२)उग्र    -- एकाग्र    (५२) तर्क -- अर्क

(१३)कृतघ्न   - शत्रुघ्न  (५३) वर्ग -- मार्ग

(१४)कच्चा  -- बच्चा    (५४) खर्च -- मार्च

(१५)गुच्छ  -- तुच्छ      (५५) निर्जन - दुर्जन

(१६)ताज्या  -- भाज्या  (५६) शर्ट -- मार्ट

(१७)माझ्या  -- तुझ्या   (५७) कार्ड - वाॅर्ड

(१८)पट्टा   -- चट्टा       (५८) कर्ण  - वर्ण

(१९)पाट्या  -- वाट्या   (५९) वर्तन - कीर्तन

(२०)लठ्ठ   -- मठ्ठ        (६०) सार्थ  -- पार्थ

(२१)गठ्ठा   -- पुठ्ठा       (६१) अर्थ -- शर्थ

(२२)काठ्या  -- मोठ्या  (६२) मर्द  -- गर्द

(२३)गड्डी   -- चड्डी        (६३) सर्दी -- वर्दी

(२४)साड्या -- काड्या   (६४) सर्प  - दर्प

(२५)लढ्यात  -- पुढ्यात  (६५) कर्म - धर्म

(२६)पुण्य  -- अरण्य      (६६) कार्य - सूर्य

(२७)पत्ता   -- सत्ता        (६७) गर्व - पूर्व

(२८)उत्तर   -- सत्तर       (६८) वर्ष -- हर्ष

(२९)आत्या  -- तात्या     (६९) नर्स - कोर्स

(३०)जत्रा  -- पत्रा         (७०) चकल्या - बादल्या

(३१)कुत्रा  -- यात्रा        (७१) दिल्ली - किल्ली

(३२)सत्व  -- तत्व          (७२) किल्ला - बिल्ला

(३३)काथ्था  -- पोथ्या    (७३)जिल्हा - कोल्हा

(३४)मुद्दा  -- हुद्दा          (७४) काव्य - दिव्य

(३५)शुध्द  -- युध्द         (७५) केव्हा - तेव्हा
 
(३६)खाद्य  -- वाद्य         (७६) अश्व - विश्व

(३७)विद्या  -- गाद्या        (७७) नष्ट -- कष्ट

(३८)छिद्र  -- भद्र          (७८) अस्त - मस्त

(३९)साध्य  -- मध्य       (७९) जास्त - रास्त

 (४०) घ्यावे - द्यावे        (८०) सह्या - वह्या .

   -----------------------   ८१ ) कळ्या - नळ्या
 | S. S. CHAURE   |
   -----------------------  (८२) गोळ्या - मोळ्या

लेखन  :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक) धुळे
                ¤ ९४२२७३६७७५ ¤