माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 9 July 2019

गणितीय सामान्यज्ञान

(१) १२० वस्तूंचे किती डझन होतात  ?
----

(२) साडेचारशे रूपये तिघांत वाटले तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील  ?
----

(३) एका वर्गातील  ४० मुलांना प्रत्येकी ४ केळी  द्यायचे झाल्यास किती केळी लागतील ?
----

(४) ९ पेरूंना १५ रूपये तर एक डझन पेरूंची किंमत किती  ?
-----

(५) दीड तास म्हणजे किती मिनिटे  ?
-----

(६)  ५ आठवडे म्हणजे किती दिवस  ?
-----

(७) एका खोक्यात  ५० बाटल्या मावतात तर १००० बाटल्यासाठी किती खोके लागतील  ?
-----

(८)  एका मिनिटामध्ये मनुष्याच्या हृदयाचे ७२ ठोके पडतात तर एका तासात किती ठोके पडतात  ?
-----

(९ ) ३३३ या संख्येतील ३ या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती  ?
-----

(१०) ९८९  मधून १८९  कमी केल्यास किती शिल्लक राहतील  ?
-----
===========================
उत्तरे (१) १० डझन, (२) १५० रूपये,
(३) १६० केळी, (४) २० रूपये, (५)९० मिनिटे,
(६) ३५ दिवस, (७) २० खोके(८) ४३२० ठोके, (९) ३३३, (१०)  ८००
===========================
संकलक - शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
                पिंपळनेर  जि.  धुळे
              📞९४२२७३६७७५  

No comments:

Post a Comment