माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 31 March 2020

' हात ' या अवयवांशी संबंधित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) हात चालणे
--- पटापट काम करणे

(२) हात आवरणे.
--- मदत थांबवणे.

(३) हात ओला करणे.
--- लाच देणे.

(४) हातघाईवर येणे.
--- मारामारी करणे.

(५) हात दाखवणे.
--- सामर्थ दाखवणे.

(६) हात धुऊन घेणे.
--- स्वार्थ साधणे.

(७) हात पसरणे.
--- भीक मागणे.

(८) हातापाय पडणे.
--- गयावया करणे.

(९) हातपाय मोकळे करणे.
--- फिरायला जाणे.

(१०) हातावर तुरी देणे.
--- फसवून पळून जाणे.

(११) हातावर पोट भरणे.
--- अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणे.

(१२) हात उगारणे.
--- मारायला प्रवृत्त होणे.

(१३) हात गगनाला पोहोचणे.
--- मोठे कार्य करणे.

(१४) हातखंडा असणे.
--- कौशल्य असणे.

(१५) हात देणे
--- मदत करणे.

(१६) हात दगडात सापडणे.
--- अडचणीत असणे.

(१७) हातपाय गळणे.
--- निराश होणे.

(१८) हात धुऊन पाठीस लागणे.
--- त्रास देणे, छळणे.

(१९) हातावर हात मारणे.
--- संमती देणे.

(२०) हातपाय हलवणे.
--- उद्योग करणे.

(२१) हातावर शीर घेणे.
--- मरणास तयार असणे.

(२२) हात आखडणे.
--- देण्यासाची क्षमता असतानाही कमी देणे.

(२३) हाताचा मळ असणे.
--- एखादी गोष्ट सहज करता येणे.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५

1 comment: