माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 21 September 2020

शब्दांच्या जाती ( मराठी व्याकरण )

     
१) नाम --
माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत, त्यांना नाम म्हणतात.

--- फूल, जमीन, झाड, माती, मोर, बैल, पेन, टेबल, खुर्ची, पेन्सिल, कपाट, शाळा, कमळ, हिमालय, गंगा, आंबा, कावळा, वाघ, गाय, दिवा, घड्याळ, सुमित, सुप्रिया, भारत, गहू , सुर्य, चंद्र, सांग, माशी, फुलपाखरू, महाराष्ट्र, धुळे , जून.
---------------------------------------------------------------
२) सर्वनाम --
नामाबद्दल येणा-या शब्दाला सर्वनाम म्हणतात.

--- मी, ही, जी, ती, तो, ते, तू, हे, ह्या, त्या, जो, जी, जे, ज्या, आम्ही, तुम्ही, आमचा, त्यांचे, त्याला, त्यांचा, त्यात, जिला, तिला, ज्याला, जिचे, तिचे, हिला, कोण, कोणाला, हिचे, माझा, तिचा, त्याचा, काय, आपण, स्वतः

---------------------------------------------------------------
३) विशेषण --
नामाबद्दल विशेष माहिती सांगणा-या शब्दाला विशेषण म्हणतात.

--- गोड, कडू, तिखट, खारट, उंच, बुटका, खोल, उथळ, भव्य, सुंदर, मोठा, लहान, मऊ, हिरवागार, पांढरा, काळा, नवा, हलकी, गडदं, अथांग, तेजस्वी, दहा, खूप, गोलाकार, चिमूरडा, छान, तांबडा, धीट, लांबसर, सर्व, सुरेख, हिरवा, सोनेरी, उदास, गोरी, शहाणा.
---------------------------------------------------------------
४) क्रियापद --
वाक्याचा अर्थ पूर्ण करणा-या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.

--- बसतो , उठतो, खातो, पितो, पळतो, सांगतो, देतो, घेतो, वाढतो, विचारतो, करतो, झाला, सापडले, उरले, ठेवतो, झिरपते, टळले, टाळतो, फिरतो, भरतो, खणतो, समजतो, बोलतो, चढतो, 
उतरतो, ओवाळते, हरवतो, सापडला, होता, येईन, जाईन, काढतो, दिसतो, विचारले, गातात, खेळतो, नाही, 
---------------------------------------------------------------
५) क्रियाविशेषण अव्यय --
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणा-या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

--- आता, हल्ली, नंतर, उद्या, परवा, लगेच, मागे, पूर्वी, रात्री, दिवसा, सदा, नित्य, नेहमी, सतत, वारंवार, सदैव, अद्यापि, आजकाल, दिवसभर, पुन्हा, सारखे, येथे, तेथे, खाली, वर, कोठे, सर्वत्र, इकडून, तिकडून, चटकन, भरभर, मुळूमुळू, सटसट, समोर, जवळ, तुरुतुरु, सतत, दूर, पूर्वी,

---------------------------------------------------------------
६) शब्दयोगी अव्यय --
एखाद्या विशिष्ट शब्द नामाला जोडून येतो; त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात.

--- आता, पूर्वी, पुढे, मागे, आधी, नंतर, पर्यंत, आतून, खालून, मधून, पासून, आता, बाहेर, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, कडून, साठी, कारणे, कडे, करिता, निमित्त, वास्तव, शिवाय, यासाठी, साठी.
---------------------------------------------------------------
७) उभयान्वयी अव्यय --
दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे कार्य करणा-या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात.

--- आणि, अन् , आणखी, व, वा, किंवा, की, पण, परंतु, परि, बाकी, म्हणून, सबब, म्हणजे, जे, जर, तर, जरी, तरी, कारण, नि,
---------------------------------------------------------------
८) केवलप्रयोगी अव्यय ---
मनातील आनंद, आश्चर्य , दुःख किंवा अन्य भावना दर्शवणा-या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.

--- वा, वाहवा, आहा, आहो, अहाहा, अबब, ओ, बापरे, अरेरे, ग, शाब्बास, भले, छान, बरंय, अच्छा, इश्श, अगंबाई, अरे वा. ठीक, छे, छी: , अच्छा ,
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७५


No comments:

Post a Comment