माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 4 September 2020

शब्द सोबती (समानार्थी शब्द ) भाग -- १०

 
गुरूजी मास्तर शिक्षक 
प्रशंसा स्तुती कौतुक 

माथा शिर मस्तक
सुवर्ण सोने कनक

गौरव अभिनंदन सन्मान
महा मोठा महान
आकाश नभ गगन
वंदन प्रणाम अभिवादन

आपुलकी आस्था आदर
सुरेख रम्य सुंदर
सेवक दास नोकर
शहाणा प्रगल्भ गंभीर

ख्याती प्रसिद्धी कीर्ती
भान शुद्ध जागृती
उत्कर्ष समृद्धी प्रगती
सेनानायक सेनानी सेनापती

कल्याण क्षेम हित
सखा मित्र दोस्त
धन संपत्ती दौलत
जनता प्रजा रयत

हुशार चाणाक्ष चतुर
खजिना कोश भांडार
तन देह शरीर
अंत:करण हृदय अंतर

मेहनत धडपड प्रयत्न
गृह निवास सदन
जल नीर जीवन
आनंद संतोष समाधान

प्रात:काळ सकाळ पहाट
कठीण अवघड बिकट
पथ मार्ग वाट
डौल रूबाब ऐट

माया प्रेम ममता
बंधू भाऊ भ्राता
काळजी आस्था चिंता
सुज्ञ ज्ञानी ज्ञाता
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment