माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 20 January 2021

काही संख्यांच्या वाचनाची रीत / पध्दत.


व्यवहारात काही संख्यांचे वाचन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उदा. २५० ही संख्या दोनशे पन्नास अशी न
वाचता ती अडीचशे अशी वाचतात.
१२५ = सव्वाशे
२२५ = सव्वा दोनशे
३२५ = सव्वा तीनशे
४२५ = सव्वा चारशे
५२५ = सव्वा पाचशे
६२५ = सव्वा सहाशे
७२५ = सव्वा सातशे
८२५ = सव्वा आठशे
९२५ = सव्वा नऊशे
---------------------------------
१५० = दीडशे
२५० = अडीचशे
३५० = साडे तीनशे
४५० = साडे चारशे
५५० = साडे पाचशे
६५० = साडे सहाशे
७५० = साडे सातशे
८५० = साडे आठशे
९५० = साडे नऊशे
------------------------------------------------------
१७५ = पावणे दोनशे
२७५ = पावणे तीनशे
३७५ = पावणे चारशे
४७५ = पावणे पाचशे
५७५ = पावणे सहाशे
६७५ = पावणे सातशे
७७५ = पावणे आठशे
८७५ = पावणे नऊशे
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment