माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 6 January 2021

समूहदर्शक, पिल्लूदर्शक, घरदर्शक , ध्वनीदर्शक शब्द प्रश्नावली.


(१) ' गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरू

(२) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई

(३) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे

(४) ' पाडस ' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर -- हरणाच्या

(५) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा

(६) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे

(७) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा

(८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ

(९) मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- वारूळ

(१०) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ

(११) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे

(१२) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू

(१३) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा

(१४) कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- कुईकुई ( कोल्हेकुई )

(१५) हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- चित्कार

(१६) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू

(१७) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला / पागा

(१८) पायी चाललेल्या वारक-यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- दिंडी

(१९) माणसाच्या पिलास काय म्हणतात ?
उत्तर -- लेकरू / बाळ

(२०) पोपट पिंज-याशिवाय आणखी कुठे राहतो ?
उत्तर -- ढोलीत
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment