माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 18 December 2021

ऊर्जा साधनांची थोडक्यात माहिती (भौगोलिक माहिती)



(१) कोळसा.

----(१) प्राचीन काळी भू-हालचालींमुळे वनस्पती व प्राण्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. (२) त्यावर दाब व उष्णता या घटकांचा परिणाम होऊन त्यांमधील घटकांचे विघटन झाले व केवळ काव्ये शिल्लक राहिली. (३) त्यापासून कोळशाची निर्मिती झाली. (४) साधा कोळसा स्वयंपाकघरात किंवा भटारखान्यात वापरला जातो. (५) दगडी कोळसा उद्योगधंद्यांमध्ये व त्याचप्रमाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वापरला जातो.
--------------------------------------------------------------
(२) खनिज तेल व नैसर्गिक वायू,

---- (१) खनिज तेल भूपृष्ठाखाली अथवा सागरतळाखाली जमिनीत सापडते. (२) बहुतेक खनिज तेलांच्या विहिरींमध्ये नैसर्गिक वायूंचे साठेही आढळतात. (३) खनिज तेलाचे साठे मर्यादित स्वरूपात असतात. त्यामानाने त्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे खनिज तेलाची किंमत जास्त असते. (४) खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे त्यास 'काळे सोने' असे म्हणतात. (५) औष्णिक विद्युत निर्मितीसाठी या ऊर्जा साधनांचा वापर होतो.
--------------------------------------------------------------
(३) बायोगॅस

---- (१) प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते.(२) या ऊर्जेचा वापर स्वयंपाकघरातील गॅस म्हणून पाणी गरम करण्यासाठी दिवे प्रकाशित करण्यासाठी करता येतो. (३) ग्रामीण भागांत काही शेतकऱ्यांनी घराच्या आवारात बायोगॅस प्रकल्प उभे केले आहेत.
--------------------------------------------------------------
(४) कचऱ्यापासून ऊर्जा

---- (१) मोठी शहरे व महानगरे येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातील जैविक कचऱ्याचा वापर वायुनिर्मितीसाठी करता येतो. (२) या वायूपासून विद्युत निर्मिती करता येते. (३) कन्चन्यापासून ऊर्जा तयार करून शहरांतील कचऱ्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते व वीजनिर्मितीच्या बाबतीत शहरे स्वयंसिद्ध होऊ शकतात. 
--------------------------------------------------------------
(५) अणुऊर्जा.

----(१) युरेनियम, धोरियम अशा खनिजांच्या अणूचे विभाजन करून ऊर्जा निर्माण करता येते. (२) यासाठी अगदी थोड्या प्रमाणात या खनिजांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करता येते. (३) भारतासह संयुक्त संस्थाने, रशिया, फ्रान्स, जपान इत्यादी काही मोजक्या देशांमध्येच या ऊर्जेचा वापर केला जातो.
--------------------------------------------------------------
(६) जलऊर्जा.

---- (१) वाहत्या पाण्याच्या गतिज ऊर्जेपासून मिळवलेल्या ऊर्जेला 'जलऊर्जा' म्हणतात. (२) या ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्मिती केली जाते. (३) जलऊर्जेमुळे पर्यावरणाची हानी होत नाही. तसेच जलविद्युत निर्माण करताना वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करता येतो.
--------------------------------------------------------------
(७) पवनऊर्जा.

----  (१) वाऱ्याच्या शक्तीचा वापर विद्युतनिर्मितीसाठी अलीकडेच सुरू झाला आहे. (२) पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असावा लागतो. (३) वान्याच्या वेगामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात व गतिज ऊर्जा निर्माण होते. या गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते. (४) शेतीसाठी, बरगुती वापरासाठी व उद्योगांसाठी या ऊर्जेचा वापर केला जातो.
--------------------------------------------------------------
 (८) सौरऊर्जा.

---- (१) सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. (२) भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात सौरऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. (३) सौरऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हिटर वाहने इत्यादी उपकरणे चालवता येतात. (४) सौरऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यांवर अवलंबून असते.
--------------------------------------------------------------
(९) सागरी ऊर्जा.

----- (१) सागरी लाटा व भरती-ओहोटी या सागर जलाच्या हालचाली अविरतपणे चालू असतात. (२) लाटांचा वेग व शक्ती यांचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचे तंत्र आता अवगत झाले आहे. (३) सागरी ऊर्जा या गतिज ऊर्जेचे विदयुत ऊर्जेत रूपांतर करता येते. (४) ही ऊर्जा प्रदूषणमुक्त व अक्षय आहे. (५) भारतासारख्या द्विपकल्पीय देशात या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. 
--------------------------------------------------------------
(१०) भूऔष्णिक ऊर्जा.

---- (१) पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक ३२ मीटरला १° से ने वाढते. (२) या जमिनीखालील तापमानाचा वापर करून आता विदयुतनिर्मिती केली जात आहे. (३) भूऔष्णिक ऊर्जेचा वापर विदयुत निर्मितीसाठी केला जातो. (४) भारतात हिमाचल प्रदेश राज्यात मणिकरण येथे भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे.
==================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


No comments:

Post a Comment