माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 2 January 2022

भारताचे राष्ट्रीय सन्मानचिन्ह --- राष्ट्रध्वज



राष्ट्रध्वज 

●आपल्या देशाचा राष्ट्रध्वज अशोक चक्रांकित तिरंगा आहे. 

● राष्ट्रध्वज हे भारताचे पहिले राष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे.

● केशरी (वरच्या बाजूला) पांढरा (मध्ये) आणि हिरवा (खालच्या बाजूला) असे तीन रंगाचे समान पट्टे असतात.

●राष्ट्रध्वजाची लांबी-रुंदी ३:२ प्रमाणात असते. 

● अशोक चक्र निळ्या रंगाचे असून त्याला २४ आरे असतात.

 ● केशरी रंग :-- त्याग, बलिदान, तपस्या, धैर्य यांचे प्रतीक.

 ● पांढरा रंग :-- सत्य, शांतता, पावित्र्य यांचे प्रतीक.

● हिरवा रंग :-- समृद्धतेचे प्रतीक.

● अशोक चक्र :-- निळ्या रंगाचे धर्मचक्र. सत्य धर्माचे आचरण करणारा संदेश.

● २४ आरे :-- चोवीस तास सतत धर्मानुसार गतिमान.

● राष्ट्रध्वज रचना समिती :-- पंडित नेहरू, सरदार पटेल इत्यादी सात सदस्य.

● घटना समितीने राष्ट्रध्वजास २२ जुलै १९४७ रोजी संमती दिली.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


.

1 comment: