माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 30 May 2022

गणितीय प्रश्न आमचे - उत्तर तुमचे



(1) मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?
उत्तर --- 99
------------------------------
(2) लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर --- 100
-------------------------------------
(3) मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती ?
उत्तर --- 9
-------------------------------------
(4) 1 ते 100 पर्यंत 0 (शून्य ) हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर --- 11 वेळा
-------------------------------------
(5) 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक एकूण किती वेळा येतो  ?
उत्तर -- 21 वेळा
-------------------------------------
(6) 1 ते 100 पर्यंत  9  हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर --- 20 वेळा
-------------------------------------
(7) 1 किलोग्रॅम = किती ग्रॅम ?
उत्तर --- 1000 ग्रॅम
-------------------------------------
( 8) 1 मीटर = किती सेंटीमीटर  ?
उत्तर ---  100 सेंटीमीटर
-------------------------------------
(9) 1 लीटर म्हणजे किती मिलीलीटर ?
उत्तर --- 1000 मिलीलीटर
-------------------------------------
(10) 1 डझन = किती वस्तू  ?
उत्तर ---  12 वस्तू
-------------------------------------
(11) 1 तास = किती मिनिटे ?
उत्तर --- 60 मिनिटे
-------------------------------------
(12) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
उत्तर --- 55
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Sunday 29 May 2022

भारतातील प्रसिद्ध - शहरे



(१)मुंबई : 
---- मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. हे सर्वोत्तम नैसर्गिक बंदर आहे. व्यापार, उद्योग या दृष्टीने हे शहर प्रसिद्ध आहे. मुंबई शहराला देशाची आर्थिक राजधानी' म्हणतात. भाभा अणुसंशोधन केंद्र, हाफकिन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, • नेहरू विज्ञान केंद्र व नक्षत्रालय ही मुंबईतील ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
----------------------------------------------
(२) नवी दिल्ली : 
---- नवी दिल्ली हे भारताच्या राजधानीचे शहर आहे. नवी दिल्ली येथून संपूर्ण भारताचा प्रशासकीय कारभार चालवला जातो. येथे राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, अनेक देशांच्या वकिलाती आहेत. तिन्ही संरक्षण दलांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली हे लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि वायुमार्गांचे केंद्र आहे. येथे अनेक महत्त्वाच्या शास्त्रीय आणि शैक्षणिक संस्था त्याचप्रमाणे संशोधन संस्था आणि प्रयोगशाळा आहेत.
----------------------------------------------
(३) पुणे 
----- पुणे हे शहर शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. येथील राष्ट्रीय प्रबोधिनी, सैनिकी अभियांत्रिकी आणि सैनिकी विद्यालय, महाविदयालये विशेष प्रसिद्ध आहेत. अद्ययावत आणि नवीन तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा भारतात उपलब्ध करून देणाऱ्या 'सी-डॅक', 'आयुका' या शिक्षण संस्था येथे आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी या संशोधन संस्था येथे आहेत.
----------------------------------------------
(५) नागपूर : 
----- नागपूर या शहराची स्थापना नाग नदीकाठी झाली म्हणून नागपूर हे नाव प्राप्त झाले. मुंबई आणि कोलकाता यांना जोडणारा लोहमार्ग नागपूर येथून गेला आहे.. त्यामुळे नागपूर हे शहर भरभराटीस आले. भारतातील मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर हे शहर वाहतूक मार्गाचे केंद्र बनले आहे.
----------------------------------------------
(६) चंदीगढ : 
------ चंदीगड या शहराची रचना नियोजनपूर्वक केलेली आहे. विस्तीर्ण जलाशय, गृहसंस्था व उदयाने यांमुळे या शहराचे सौंदर्य वाढलेले आहे. येथे 'रॉक गार्डन' तयार करण्यात आले आहे. पंजाव व हरियाणा या दोन राज्यांची राजधानी येथे आहे. वैशिष्ट्यपूर्ण शहररचनेमुळे हे शहर एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 28 May 2022

का व कसे ? (भूगोल प्रश्नावली)



(१) तारे दिवसा का दिसत नाहीत? ते रात्रीच का दिसतात?

-- आपल्या सूर्यमालेतला तारा म्हणजे सूर्य. 
सूर्यापेक्षाही मोठे व तेजस्वी तारे आपल्या आकाशगंगेत
 आहेत. पण सूर्य हा तारा आपल्याला जवळचा आहे.
 तो विस्तारीत प्रकाश उगमस्थानासारखे काम करतो.
 म्हणून त्याच्यापासून निघणारा प्रकाश सर्व दिशांना 
पसरतो. सूर्य सोडल्यास इतर तारे आपल्यापासून खूप
 दूर आहेत. दिवसा सूर्याच्या तेजस्वितेमुळे इतर ताऱ्यांचे
 तेज कमी होते. सूर्यप्रकाशामुळे हे तारे पूर्णपणे झाकले जातात. त्यामुळे तारे दिवसा दिसत नाहीत. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ते रात्री दिसतात.
================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जिल्हा धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 25 May 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर -- सात
------------------------------------------
(२) पक्ष्यांचा राजा कोणास म्हणतात ?
उत्तर -- गरूड
------------------------------------------
(३) प्राण्यांचा राजा कोणास म्हणतात ?
उत्तर -- सिंह
------------------------------------------
(४) फळांचा राजा कोणास म्हणतात ?
उत्तर -- आंबाm
------------------------------------------
(५) फुलांचा राजा कोणास म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
------------------------------------------
(६) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग 
------------------------------------------
(७) वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ?
उत्तर -- उंट
------------------------------------------
(८)' झुरळाला'  किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
------------------------------------------
(९) 'कोळी'  किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
------------------------------------------
(१०) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?
उत्तर -- चार
------------------------------------------
(११) ' बेडकाला ' किती पाय असतात ?
उत्तर -- चार
------------------------------------------
(१२) ' मुंगी ' या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
------------------------------------------
(१३) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
------------------------------------------
(१४ ) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
------------------------------------------
(१५) सापाला किती पाय असतात ?
उत्तर -- पाय नसतात.
------------------------------------------
(१६) माशाला किती पाय अस्तात ?
उत्तर -- पाय नसतात.
------------------------------------------
(१७) आवळा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 23 May 2022

का व कसे ? ( विज्ञान प्रश्नावली )



(१) सूर्यग्रहण अमावास्येला का होते?

----  पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येऊन पृथ्वी
 आणि सूर्य यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. मात्र प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही. कारण पृथ्वी, चंद्र आणि सूर्य समतलात फिरत नाहीत.
--------------------------------------------------------
(२)  गोबर गॅसमध्ये समाविष्ट असलेल्या वायूचे नाव काय?

-----  गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. शेण व पाणी एकत्र केल्यामुळे कुजण्याची क्रिया होऊन गोबर गॅसच्या टाकीत मिथेन वायू तयार होतो. हा वायू उत्कृष्ट इंधन 
म्हणून वापरला जातो.
--------------------------------------------------------
(३)  रडताना आपल्या नाकातून पाणी का येते?

----- आपल्या डोळ्यांत लेक्रिमल ग्रंथी या नावाची एक
 ग्रंथी असते. या ग्रंथीतून निघालेली एक नलिका आपल्या नाकात उघडते. आपण जेव्हा रडतो तेव्हा डोळ्यांतल्या लेक्रिमल ग्रंथीतून अश्रू वाहू लागतात. या अश्रूपैकी काही अश्रू लेक्रिमल ग्रंथीपासून निघालेल्या नलिकेतून नाकात येऊ लागतात. त्यामुळे आपल्या नाकातून पाणी यायला सुरुवात होते!
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 22 May 2022

भारताचा भूगोल (सामान्यज्ञान प्रश्नावली )


(१) भारताचा मध्यबिंदू झिरो माईल कोठे आहे ?
उत्तर --  नागपूर

(२) गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते ?
उत्तर --  जयपूर

(३) आकारमानाने भारत देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर -- राजस्थान

(४)! भारतात सर्वांत जास्त पाऊस कोठे पडतो ?
उत्तर --  मौसिनराम

(५) माऊंटअबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- राजस्थान

(६) भारतात सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी कोणती ?
उत्तर --- नर्मदा

(७) चेन्नई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
उत्तर -- तामिळनाडू

(८) सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात

(९) ' ताजमहल ' कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तरप्रदेश

(१०) ' मसुरी ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तराखंड

(११) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर -- गंगा

(१२) आकारमानाने भारत देशातील सर्वात लहान राज्य कोणते ?
उत्तर -- गोवा
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जिल्हा. धुळे
9422736775

Wednesday 18 May 2022

भौगोलिक माहिती (सामान्यज्ञान )


सूर्यमालेतील ग्रह

1) बुध --
बुध सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. 
बुध सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह आहे.
बुध या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 
------------------------------------
2) शुक्र --
शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे.
शुक्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
शुक्रला  पहाटेचा ताराही म्हणतात. 
----------------------------------------
3) पृथ्वी --
पृथ्वी हा एक ग्रह आहे.
पृथ्वीवर 29% भूभाग व 71% पाणी आहे.
पृथ्वीला जलग्रह असेही म्हणतात.
पृथ्वीला चंद्र हा एकच उपग्रह आहे.
पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे.
 पृथ्वीचा आकार जिऑईड/ गोल आहे.
पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे - परिवलन
पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे - परिभ्रमण
---------------------------------------------
4) मंगळ --
मंगळाचा रंग लालसर तांबूस आहे.
 मंगळावर प्राणवायू नाही,
मंगळावर जीवसृष्टी असावी यामुळे ग्रहाबाबत 
संशोधन चालू आहे.
--------------------------------------------
5) गुरु --
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.
 गुरूवर पांढरट पट्टे आहेत.
सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह. 
------------------------------------------------
(6) शनि --
शनिचा शोध-गॅलिलिओने लावला,
शनिभोवती कडी आढळतात.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 15 May 2022

गणितीय प्रश्नावली ( व्यावहारिक परिमाणे )



(१)  १  डझन केळी = किती केळी ?
उत्तर --  १२ केळी
--------------------------------
(२) १ रीम कागद = किती कागद ?
उत्तर -- ४८० कागद
-------------------------------
(३) १ वर्ष = किती महिने ?
उत्तर  -- १२ महिने
----------------------------------
(४) १ आठवडा = किती दिवस ?
उत्तर -- ७ दिवस
---------------------------------------------------
(५) १ महिना =  किती दिवस ?
उत्तर --  ३० / ३१ दिवस
---------------------------------------------------
(६) १ वर्ष = किती दिवस ?
उत्तर -- ३६५  / ३६६ दिवस
---------------------------------------------------
(७) १ मनिट = किती सेकंद ?
उत्तर -- ६० सेकंद
---------------------------------------------------
(८) १ तास = किती मिनिटे ?
उत्तर -- ६० मिनिटे
---------------------------------------------------
(९) १ दिवस = किती तास ?
उत्तर -- २४ तास
---------------------------------------------------
(१०) १ तास = किती सेकंद ?
उत्तर -- ३,६०० सेकंद
---------------------------------------------------
(११) १ दिवस = किती सेकंद ?
उत्तर -- ८६,४०० सेकंद
---------------------------------------------------
(१२) १ मीटर = किती सेंटिमीटर ?
उत्तर -- १०० सेंटीमीटर
---------------------------------------------------
(१३) १ लीटर = किती मिलीलीटर ?
उत्तर -- १००० मिलीलीटर
---------------------------------------------------
(१४) १ किलो = किती किलोग्रॅम ?
उत्तर -- १००० किलोग्रॅम
---------------------------------------------------
(१५)  १ क्विंटल = किती किलोग्रॅम ?
उत्तर --  १०० किलोग्रॅम
---------------------------------------------------
(१६) १ टन = किती किलोग्रॅम ?
उत्तर -- १००० किलोग्रॅम
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 12 May 2022

भौमितिक आकृत्या

विज्ञान तंत्रज्ञान -- प्रश्नावली


(१) सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- मॅकमिलन

 (२) टेलिफोनचा ‌‌शोध कोणी लावला ?
उत्तर -- अलेक्झांडर ग्रॅहम बेल

(३)'विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- थाॅमस अल्वा एडिसन

(४) रेडिओचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- मार्कोनी

 (५) अंधांसाठी लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- लुईस ब्रेल

 (६) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जेम्स वॅट

 (७) स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- रेने लैनक

 (८) टेलिव्हिजचा ‌‌शोध कोणी लावला ?
उत्तर -- जाॅन बेअर्ड

 (९) पाणबुडीच्या शोध कोणी लावला ?
उत्तर -- बुशनेल

(१०) तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर --  थर्मामीटर

(११)  भूकंपाची तीव्रता मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- सीस्मोग्राफ

(१२) दूधाची शुध्दता मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- लॅक्टोमीटर

(१३) समुद्राची खोली मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- फॅदोमीटर

(१४)  ह्रदयाची स्पंदने मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- स्टेथेस्कोप
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 11 May 2022

दिशा

भाषिक सामान्यज्ञान (प्रश्नावली )



(१) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर --- राई

(२) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा

(३) पक्ष्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे

(४) 'पाडस' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर --  हरणाच्या

(५)गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर --. शिंगरू

(६) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ

(७) 'खुराडा' कोणाच्या घरास म्हणतात?
उत्तर -- कोंबडीच्या

(८) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे

(९) वाघाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा  / बछडा

(१०) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर --  थवा

(११) जादूचे खेळ करून दाखवणा-याला काय म्हणतात ?
उत्तर --  जादूगार

(१२) चार रस्ते एकत्र येतात त्या जागेस काय म्हणतात ?
उत्तर -- चौक 

(१३) घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु

(१४) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेट

(१५) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर --  पोळे
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 9 May 2022

महाराष्ट्र राज्य -- सामान्यज्ञान



(१) नाशिकजवळ मिग विमानांचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर -- ओझर

(२) महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय कोणता ?
उत्तर -- शेती

(३) जळगावाचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी

(४) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(५) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर

(६) नोटा व पोस्टाची तिकिटे महाराष्ट्रात कोठे छापली जातात ?
उत्तर --. नाशिक

(७) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(८) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपूर

(९) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ

(१०) महालक्ष्मीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर कोठे आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा‌. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 7 May 2022

आपली राष्ट्रीय प्रतीके (भारत देशाची राष्ट्रीय प्रतीके )



(१) राष्ट्रध्वज

----- आपला राष्ट्रध्वज हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. आपल्या राष्ट्रध्वजावर निश्चित संदेश देणारे तीन रंग आहेत. सर्वांत वरच्या बाजूस असणारा केशरी रंग त्याग व शौर्याचा संदेश देतो. मध्यभागी असलेला पांढरा रंग शांतीचा संदेश देतो; तर खालच्या बाजूस असलेला हिरवा रंग समृद्धीचा संदेश देतो. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र आपणांस देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश देते. 

--------------------------------------------------------
(२) राष्ट्रगीत

-----  'जनगणमन' हे आपले राष्ट्रगीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत लिहिले आहे. या गीतात त्यांनी भारतातील विविध प्रदेश, नदया व पर्वत यांचे वर्णन केले आहे. राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. म्हणून राष्ट्रगीत सुरू असताना आपण सावधान स्थितीत उभे राहावे. राष्ट्रगीताचा आदर करणे, हे आपले कर्तव्य आहे.

--------------------------------------------------------
 (३) राजमुद्रा

-----  चार सिंहाकृती असलेली आपली राजमुद्रा हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे. राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली 'सत्यमेव जयते' हे वचन आहे. सर्व नोटा, नाणी, शासकीय पत्रे इत्यादींवर ही राजमुद्रा असते.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 5 May 2022

Abbreviation of Nouns ( ॲब्रीव्हीएशन ऑफ नाऊन्स)नावांची संक्षिप्त रूपे.



AC  ----- एअर कंडिशनर

BP  ----- ब्लड प्रेशर

CM ----- चीफ मिनिस्टर

DD ----- डिमांड ड्राफ्ट

EO ----- एज्युकेशन ऑफिसर

BE ------ बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग

BA ------ बॅचलर ऑफ आर्ट

GK ------  जनरल नॉलेज

HM ------ हेड मास्टर

KM ------ किलोमीटर

MD  ------ डाॅक्टर ऑफ मेडिसिन

MP ------ मेंबर ऑफ पार्लमेंट

NH  ------ नॅशनल हायवे

NP ------- नॅशनल परमिट

OS -----ऑफिस सूपरिटेंडेंट

OK ------ ऑल करेक्ट

PI ------ पोलिस इन्स्पेक्टर

PO  ------ पोस्ट ऑफिस

PM ----- प्राईम मिनिस्टर

pA ------- पर्सनल  ॲसिस्टंट

PF ------ प्रोव्हिडंट फंड

ST ------ स्टेट ट्रान्सपोर्ट

SP -------  सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस

TC ------- ट्रान्स्फर सर्टिफिकेट

TV ------ टेलिव्हिजन

ZP ------- जिल्हा परिषद
=========================
Shankar  Sitaram  Chaure
z.p. school  -- Jamnepada 
tal. Sakri dist. Dhule

Tuesday 3 May 2022

प्रश्न आमचे -- उत्तर तुमचे (महाराष्ट्र सामान्यज्ञान)



(१) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६

(२) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई

(३) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार

(४) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा

(५) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू

(६) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल

(७) महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र

(८)  अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ?
उत्तर -- रायगड

(९) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसुबाई

(१०) आपण महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतो ‌?
उत्तर -- १ मे

(११) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर

(१२) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 2 May 2022

थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा (सामान्यज्ञान)


(1) “आराम हराम है।"

----- पंडित जवाहरलाल नेहरू

(2) "चले जाव।"
----- महात्मा गांधी

(3) "जय जवान ! जय किसान!”
------ लाल बहादूर शास्त्री

(4) “मेरी झाशी नही दूँगी।" 
----- राणी लक्ष्मीबाई

(5) “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा।"
------  सुभाषचंद्र बोस

(6) “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!” 
------ लोकमान्य टिळक

(7) "जय जवान जय किसान ! जय विज्ञान!"
------- अटलबिहारी वाजपेयी
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५