माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 29 May 2022

भारतातील प्रसिद्ध - शहरे



(१)मुंबई : 
---- मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. हे सर्वोत्तम नैसर्गिक बंदर आहे. व्यापार, उद्योग या दृष्टीने हे शहर प्रसिद्ध आहे. मुंबई शहराला देशाची आर्थिक राजधानी' म्हणतात. भाभा अणुसंशोधन केंद्र, हाफकिन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, • नेहरू विज्ञान केंद्र व नक्षत्रालय ही मुंबईतील ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
----------------------------------------------
(२) नवी दिल्ली : 
---- नवी दिल्ली हे भारताच्या राजधानीचे शहर आहे. नवी दिल्ली येथून संपूर्ण भारताचा प्रशासकीय कारभार चालवला जातो. येथे राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, अनेक देशांच्या वकिलाती आहेत. तिन्ही संरक्षण दलांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली हे लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि वायुमार्गांचे केंद्र आहे. येथे अनेक महत्त्वाच्या शास्त्रीय आणि शैक्षणिक संस्था त्याचप्रमाणे संशोधन संस्था आणि प्रयोगशाळा आहेत.
----------------------------------------------
(३) पुणे 
----- पुणे हे शहर शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. येथील राष्ट्रीय प्रबोधिनी, सैनिकी अभियांत्रिकी आणि सैनिकी विद्यालय, महाविदयालये विशेष प्रसिद्ध आहेत. अद्ययावत आणि नवीन तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा भारतात उपलब्ध करून देणाऱ्या 'सी-डॅक', 'आयुका' या शिक्षण संस्था येथे आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजी या संशोधन संस्था येथे आहेत.
----------------------------------------------
(५) नागपूर : 
----- नागपूर या शहराची स्थापना नाग नदीकाठी झाली म्हणून नागपूर हे नाव प्राप्त झाले. मुंबई आणि कोलकाता यांना जोडणारा लोहमार्ग नागपूर येथून गेला आहे.. त्यामुळे नागपूर हे शहर भरभराटीस आले. भारतातील मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर हे शहर वाहतूक मार्गाचे केंद्र बनले आहे.
----------------------------------------------
(६) चंदीगढ : 
------ चंदीगड या शहराची रचना नियोजनपूर्वक केलेली आहे. विस्तीर्ण जलाशय, गृहसंस्था व उदयाने यांमुळे या शहराचे सौंदर्य वाढलेले आहे. येथे 'रॉक गार्डन' तयार करण्यात आले आहे. पंजाव व हरियाणा या दोन राज्यांची राजधानी येथे आहे. वैशिष्ट्यपूर्ण शहररचनेमुळे हे शहर एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment