माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 9 May 2022

महाराष्ट्र राज्य -- सामान्यज्ञान



(१) नाशिकजवळ मिग विमानांचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर -- ओझर

(२) महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय कोणता ?
उत्तर -- शेती

(३) जळगावाचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी

(४) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(५) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर

(६) नोटा व पोस्टाची तिकिटे महाराष्ट्रात कोठे छापली जातात ?
उत्तर --. नाशिक

(७) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(८) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपूर

(९) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ

(१०) महालक्ष्मीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर कोठे आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा‌. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment