माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 10 July 2022

आपले शरीर आणि ज्ञानेंद्रिये



✓शरीराचे मुख्य अवयव : 
---- डोके, मान, छाती, पोट, हात आणि पाय हे आपल्या शरीराचे मुख्य भाग आहेत. त्यांना अवयव म्हणतात.

✓ ज्ञानेंद्रिये : 
डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही इंद्रिये, आपल्या शरीराला ज्ञान मिळवून देतात. त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. त्यांची कामे पुढीलप्रमाणे होत.

१. डोळे : 
डोळे पाहण्याचे काम करतात. वस्तूंचा आकार आणि रंग यांचे ज्ञान डोळ्यांमुळे होते.
----------------------------------------------
२. कान : 
कान ऐकण्याचे काम करतात. आवाजाचे ज्ञान कानांमुळे होते.
----------------------------------------------
३. नाक :
 नाकामुळे वासाचे ज्ञान होते.
----------------------------------------------
४. जीभ : 
जिभेमुळे पदार्थांची चव समजते. आंबट, खारट, तिखट, गोड, कडू अशा निरनिराळ्या चवींचे ज्ञान जिभेमुळे होते.
----------------------------------------------
५. त्वचा (कातडी) :
 वस्तू गरम की थंड, नरम की कडक याचे ज्ञान त्वचेमुळे होते.
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment