माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 30 October 2022

दिशा ( प्रश्नावली )


प्रश्नांची एका शब्दात उत्तरे सांगा.
(१) मुख्य दिशा किती आहेत ?
उत्तर -- चार
--------------------------------
(२) उपदिशा किती आहेत ?
उत्तर  -- चार
--------------------------------
(३) मुख्य दिशांची नावे सांगा ?
उत्तर -- पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
--------------------------------
(४) उपदिशांची नावे सांगा ?
उत्तर -- ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य .
--------------------------------
(५) पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- ईशान्य
--------------------------------
(६) पूर्व आणि दक्षिण यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- आग्नेय
--------------------------------
(७) दक्षिण आणि पश्चिम यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- नैऋत्य
--------------------------------
(८) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
उत्तर -- वायव्य 
--------------------------------
 (९) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती?
उत्तर --  पूर्व 
--------------------------------
(१०) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ? 
उत्तर --  पश्चिम 
--------------------------------
(११) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्य उजव्या हाताकडे कोणती दिशा असते?
उत्तर ---  दक्षिण 
--------------------------------
(१२) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या हाताकडे कोणती दिशा असते? 
उत्तर -- उत्तर 
--------------------------------
(१३) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते? 
उत्तर --  पश्चिम 
--------------------------------
(१४) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
 उत्तर -- उत्तर 
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

महाराष्ट्र राज्य -- सामान्यज्ञान


(1) धुळे जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
उत्तर -- 4 ( चार)

(2) नंदुरबार जिल्ह्यस ......  म्हणून ओळखतात ?
उत्तर -- आदिवासी जिल्हा 

(3) ...... रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली ?
उत्तर --- 1 जुलै 1998

(4) धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर -- पांझरा 

(5) जळगाव जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर --  केळी 

(6) नाशिक जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- द्राक्षे

(7) महाराष्ट्रात दर बारा वर्षींनी कुंभमेळा कोठे भरतो ?
उत्तर -- नाशिक 

(8) चादरीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ?
उत्तर -- सोलापूर 

(9) मुल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक 

(10) गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर --- त्र्यंबकेश्वर 

(11) जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद

(12) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई 
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Saturday 29 October 2022

चौरे परिवार मेळाव्याला नक्की या !

चौरे परिवार मेळाव्यात आनंद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  उत्साह असतो.
चौरे परिवार मेळाव्यात प्रोत्साहन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात जिव्हाळा असते.
चौरे परिवार मेळाव्यात काळजी असते.
चौरे परिवार मेळाव्यात सुसंवाद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  सहकार्य मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात शक्ती मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात दिलासा मिळतो.
चौरे परिवार मेळाव्यात  प्रबोधन होते.
चौरे परिवार मेळाव्यात आदर मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात प्रेम मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात आपुलकी असते.
चौरे परिवार मेळाव्यात समन्वय असते.
चौरे परिवार मेळाव्यात सामंजस्य असते.
चौरे परिवार मेळाव्यात मार्गदर्शन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात समुपदेशन होते.
चौरे परिवार मेळाव्यात सामाजीकरण होते.
चौरे परिवार मेळाव्यात व्यक्तिमत्व विकास होते.
चौरे परिवार मेळाव्यात मनोबल वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात वक्तृत्व विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मीयता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात आपलेपणाची भावना असते.
चौरे परिवार मेळाव्यात अंतःकरण विशाल होते.
चौरे परिवार मेळाव्यात एकटेपणा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात  निराशा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मविश्वास वाढतो.
चौरे परिवार मेळाव्यात  विचार प्रगल्भ होतात.
चौरे परिवार मेळाव्यात मानसिक परिवर्तन घडून येते.
चौरे परिवार मेळाव्यात बौद्धिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात भावनिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात सकारात्मकता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात संवेदनशीलता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात कौशल्य विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात  संयम शिकता येते.
चौरे परिवार मेळाव्यात ज्ञानवृद्धी होते.
चौरे परिवार मेळाव्यात शिस्त लागते.

ज्याला चौरे परिवार मेळाव्याचे  महत्व कळते. तो मेळाव्याला नक्की येतो.
==============================
लेखन - शंकर सिताराम चौरे (प्रा.‌शिक्षक )
काकरपाडा  (चौपाळे) ता. साक्री जि.‌धुळे
9422736775

चौरे परिवार मेळाव्याला नक्की या !


चौरे परिवार मेळाव्यात आनंद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  उत्साह असतो.
चौरे परिवार मेळाव्यात प्रोत्साहन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात जिव्हाळा असते.
चौरे परिवार मेळाव्यात काळजी असते.
चौरे परिवार मेळाव्यात सुसंवाद असतो.
चौरे परिवार मेळाव्यात  सहकार्य मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात शक्ती मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात दिलासा मिळतो.
चौरे परिवार मेळाव्यात  प्रबोधन होते.
चौरे परिवार मेळाव्यात आदर मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात प्रेम मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात आपुलकी असते.
चौरे परिवार मेळाव्यात समन्वय असते.
चौरे परिवार मेळाव्यात सामंजस्य असते.
चौरे परिवार मेळाव्यात मार्गदर्शन मिळते.
चौरे परिवार मेळाव्यात समुपदेशन होते.
चौरे परिवार मेळाव्यात सामाजीकरण होते.
चौरे परिवार मेळाव्यात व्यक्तिमत्व विकास होते.
चौरे परिवार मेळाव्यात मनोबल वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात वक्तृत्व विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मीयता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात आपलेपणाची भावना असते.
चौरे परिवार मेळाव्यात अंतःकरण विशाल होते.
चौरे परिवार मेळाव्यात एकटेपणा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात  निराशा दूर होते.
चौरे परिवार मेळाव्यात आत्मविश्वास वाढतो.
चौरे परिवार मेळाव्यात  विचार प्रगल्भ होतात.
चौरे परिवार मेळाव्यात मानसिक परिवर्तन घडून येते.
चौरे परिवार मेळाव्यात बौद्धिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात भावनिक विकास होतो.
चौरे परिवार मेळाव्यात सकारात्मकता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात संवेदनशीलता वाढते.
चौरे परिवार मेळाव्यात कौशल्य विकसित होते.
चौरे परिवार मेळाव्यात  संयम शिकता येते.
चौरे परिवार मेळाव्यात ज्ञानवृद्धी होते.
चौरे परिवार मेळाव्यात शिस्त लागते.

ज्याला चौरे परिवार मेळाव्याचे  महत्व कळते. तो मेळाव्याला नक्की येतो.
==============================
लेखन - शंकर सिताराम चौरे (प्रा.‌शिक्षक )
काकरपाडा  (चौपाळे) ता. साक्री जि.‌धुळे
9422736775

सामान्यज्ञान प्रश्नावली


(1) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?
उत्तर -- देवनागरी 

(2) फेसबुकचे संस्थापक कोण आहे ?
उत्तर -- मार्क झुकरबर्ग

(3) भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद 

(4) वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी 

(5) महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तर -- नाशिक 

(6) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर -- बुध 

(7) 'साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक 

(8) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर -- कर्मवीर भाऊराव पाटील 

(9) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा 

(10) पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे ?
उत्तर -- नाथसागर 

(11) महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती ?
उत्तर -- सहा 

(12) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार 

(13)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
उत्तर -- महू (मध्यप्रदेश)

(14) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर -- यकृत 

(15)  भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा 
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

Wednesday 26 October 2022

आदर्शाचा झरा - मालतीबाई पवार

मालतीबाई म्हणजे दयेचा सागर,
मालतीबाई म्हणजे मायेने भरलेली घागर.


मालतीबाई म्हणजे प्रेमळ माता,
मालतीबाई  म्हणजे संस्काराची गाथा.

मालतीबाई  म्हणजे पवार परिवाचे भूषण,
मालतीबाई‌ म्हणजे पवार परिवाची शान

मालतीबाई म्हणजे दया क्षमा, 
मालतीबाई  म्हणजे विश्वासाची तमा.

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा आदर्शाचा झरा,
मालतीबाई म्हणजे पवार  परिवाराचा तारा

मालतीबाई  म्हणजे पवार परिवाराचा आधार, 
.मालतीबाई  म्हणजे पवार परिवाराचा साथीदार.

मालतीबाई म्हणजे आदर्शाचे स्वरुप, 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा हुरुप,

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची करूणा
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा दागिना

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची सावली,
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची माऊली,

मालतीबाई म्हणजे पवार  परिवाराचा शिल्पकार 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा हुंकार,

मालतीबाई म्हणजे सहिष्णुतेच उदाहरण,
मालतीबाई म्हणजे न्यायाचं अनुकरण,

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची माय
मालतीबाई  म्हणजे पवार परिवाराचा हृदय 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची एकता 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची ममता 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा अभिमान
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा सन्मान 

मालतीबाई म्हणजे नाही फक्त नाव
मालतीबाई म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची शक्ती 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची भक्ती 

मालतीबाई म्हणजे पवार परिवाराची धडपड 
मालतीबाई म्हणजे पवार परिवाराचा आधारवड
==============================
लेखन :- शंकर चौरे सर (पिंपळनेर )
९४२२७३६७७५

Saturday 22 October 2022

प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्रश्नावली )


(1) प्राण्यांपासून न मिळणारे खाद्यपदार्थ कोणते?

1) दुध 
2) अंडी
3) मध  ✓
4) मास
-----------------
(2) शरीरात रक्तपुरवठा ...... या अवयवामुळे होतो.

1) जठर
2) मेंदू
3) फुफ्फुसे
4) हृदय ✓
------------------------------------------
(3) शरीरातील बाह्यइंद्रिय कोणते ?
1) फुफ्फुसे
2) हृदय
3) डोळे ✓
4) मेंदू
------------------------------------------
(4) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
1) कार्डिओग्राफ
2) स्टेथोस्कोप ✓
3) थर्मामीटर
4) अल्टिमीटर
------------------------------------------
(5)मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

1 ) जठर
2) यकृत ✓
3) हृदय
4) मोठे आतडे
------------------------------------------
(6) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान .....  सेल्सियस असते ?

1) 27 सेल्सि. 
2) 47 सेल्सि.
3) 37 सेल्सिअस 
4) 43 सेल्सि.
------------------------------------------
(7) रक्त गटाचा शोध कोणी लावला?

1) रॉबर्ट कुक
2) एडीसन
3) कार्ल लँडस्टायनर  ✓
4) फॅरेडे
------------------------------------------
(8)डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे
सांगतात? 

1) कावीळ ✓
2) खोकला
(3) ताप
4) मलेरिया
------------------------------------------
(9) तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार
होतो?

1) सुवर्ण
2) पितळ ✓
3) पारा
4) यापैकी नाही
------------------------------------------
(10)निरोगी माणसाचा रक्तदाब ..... एवढा असतो.

1) 80/120
2) 120/80 ✓
3) 140/60 
4) यापैकी नाही
===========================
उत्तरे :- (1) मध  (2) ह्रदय  ‌(3)  डोळे (4)  स्टेथोस्कोप 
(5) यकृत (6) 37 सेल्सिअस (7)कार्ल लॅडस्टायनर
(8) कावीळ  (9) पितळ (10) 120 / 80
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
9422736775

Friday 21 October 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली


(1) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?
उत्तर -- 50 मिनिटे 
-----------------------
(2) सूर्य मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर -- गुरू 
----------------------
(3) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?
उत्तर -- सातपुडा 
------------------------------------------
(4) भूकंपमापक यंत्राला काय म्हणतात ?
उत्तर -- सिस्मोग्राफ 
------------------------------------------
(5) महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर -- पोरबंदर  (गुजरात)
------------------------------------------
(6) भारताचा स्वातंत्र्यदिन कोणाता ?
उत्तर --  15 ऑगस्ट 1947
------------------------------------------
(7) भारताचे तिन्ही सेवादलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तर -- राष्ट्रपती 
------------------------------------------
(8) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती  ?
उत्तर -- गंगा 
------------------------------------------
(9) कोणत्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात ?
उत्तर -- नारळाला
------------------------------------------
(10) 50 रूपयांच्या नोटेवर कोणाची सही असते ?
उत्तर -- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर 
------------------------------------------
(11) भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?
उत्तर -- महात्मा गांधी 
------------------------------------------
(12) भारतातील पहिल्या आधार कार्ड धारक महिलेचे नाव सांगा ?
उत्तर -- रंजना सोनवणे 
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 19 October 2022

सांगा पाहू मी कोण ?


(१) मी आहे जंगलाचा राजा,
 चाल तर ऐटबाज,
आयाळ माझी शान, 
चटकन तू जाण !
------------------------------
(२) दरवर्षी बदलतो पाने, 
पारंब्यांवर मुले खेळती, 
पक्षांना देतो आधार, 
धरतो तुम्हावर छाया.
-----------------------------
(३) शेताची, घराची करतो राखण, 
प्रामाणिक म्हणून माझी शान, 
वास, आवाजावरून ओळखतो,
 मिश्राहार घेतो.
------------------------------------------
(४) नाही दिसत डोळ्यांना, 
नाही लागत हाताला !
आहे आजूबाजूला सर्वत्र, 
ओळखा पाहू मला.
------------------------------------------
(५) नाहीत पाय, नाहीत हात,
 तरी पळतो वेगाने 
पाहून मजला भितात लोक, 
सांगा मी कोण ?
---------------------------------------------------
उत्तरे :- (१) सिंह  (२) वडाचे झाड 
 (३) कुत्रा(४) हवा (५)साप 
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 17 October 2022

महाराष्ट्र विशेष -- सामान्यज्ञान


(१) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई 
------------------------
(२) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
 उत्तर --  कळसुबाई 
----------------------
(३) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर 
------------------------------------------
(४) महाराष्ट्रातील क्षेत्राफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई शहर 
------------------------------------------
(५) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले 
------------------------------------------
(६) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि.मी. आहे ?
उत्तर -- ७२० कि. मी. 
------------------------------------------
(७) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नागपूर
------------------------------------------
(८) महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती  ?
उत्तर  -- मराठी 
------------------------------------------
(९) महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?
उत्तर -- नागपूर 
------------------------------------------
(१०) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता  ?
उत्तर -- औरंगाबाद 
------------------------------------------
(११) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- गोंदिया 
------------------------------------------
(१२) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर -- यशवंतराव चव्हाण 
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 13 October 2022

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले ( किल्ला आणि जिल्हा )


१)  'लळिंग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
----------------------------
२) 'शिवनेरी ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
----------‐-----‐-----------
३) 'जंजिरा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
----------‐-----‐-----------------------------------
४) 'सिंधुदुर्ग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
----------‐-----‐-----------------------------------
५)'अजिंक्यतारा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
----------‐-----‐-----------------------------------
६) 'तोरणा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
----------‐-----‐-----------------------------------
७) 'मुल्हेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक
----------‐-----‐-----------------------------------
८)' देवगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
----------‐-----‐-----------------------------------
९)'प्रतापगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
----------‐-----‐-----------------------------------
१०)'साल्हेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक
----------‐-----‐-----------------------------------
११) 'कंधार ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नांदेड
----------‐-----‐-----------------------------------
१२) 'करमाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सोलापूर
----------‐-----‐-----------------------------------
१३) 'नळदुर्ग ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- उस्मानाबाद
----------‐-----‐-----------------------------------
१४) माहुली ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- ठाणे
----------‐-----‐-----------------------------------
१४) 'वसई ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर
----------‐-----‐-----------------------------------
१५) 'रायगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
----------‐-----‐-----------------------------------
१६)'अर्नाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर
----------‐-----‐-----------------------------------
१७) 'कर्नाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
----------‐-----‐-----------------------------------
१८) 'हरिचंद्रगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अहमदनगर
----------‐-----‐-----------------------------------
१९) 'सज्जनगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
----------‐-----‐-----------------------------------
२०) 'विशाळगड ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
----------‐-----‐-----------------------------------
२१) 'दौलताबाद ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
----------‐-----‐-----------------------------------
२२)' थाळनेर ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
----------‐-----‐-----------------------------------
२३) ' सिंहगड ' (कोंढाणा) किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
----------------------------------------------------
२४) ' पन्हाळा ' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
 ========================
संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा 
केंद्र - रोहोड ता. साक्री, जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५

 

Wednesday 12 October 2022

सांगा सांगा उत्तर सांगा.


(१) चवीचे प्रकार किती ?

उत्तर -- चार
------------------------------------------
(२) चवीचे प्रकार कोणते ?
उत्तर -- गोड, कडू, आंबट, खारट.
------------------------------------------
(३) ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?
उत्तर -- ज्ञान देणारे अवयव.
------------------------------------------
(४) आपल्याला किती ज्ञानेंद्रिये आहेत ?
उत्तर -- पाच
------------------------------------------
(५) ज्ञानेंद्रियांची नावे सांगा ?
उत्तर -- डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा.
------------------------------------------
(६) डोळ्यांचा उपयोग कशासाठी होतो ?
उत्तर -- पाहण्यासाठी.
------------------------------------------
(७) कानाचा उपयोग कशासाठी होतो ?
उत्तर -- ऐकण्यासाठी
------------------------------------------
(८) नाकाने आपल्याला कोणते ज्ञान होते ?
उत्तर -- वास घेणे.
------------------------------------------
(९) शरीरावरील कातडीला काय म्हणतात ?
उत्तर -- त्वचा
------------------------------------------
(१०) त्वचेमुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे ज्ञान होते ?
उत्तर -- स्पर्शज्ञान
------------------------------------------
(११) दातांचा उपयोग कोणता ?
उत्तर -- अन्न चावून खाण्यासाठी.
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 9 October 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली .


(१) आकाशाचा रंग कोणता ?
उत्तर -- निळा
---------------------------------
(२) वाघिणीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा / बछडा
---------------------------------
(३) पोपटाचा रंग कोणता ?
उत्तर -- हिरवा
---------------------------------
(४) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे
---------------------------------
(५) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ
---------------------------------
(६) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा
---------------------------------
(७)  गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू
---------------------------------
(८) बैलाच्या मादीला काय म्हणतात ?
उत्तर -- गाय
---------------------------------
(९) कोकिळेने केलेला आवाज कोणता ?
उत्तर --  कुहूकुहू
---------------------------------
(१०) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो ?
उत्तर -- पिवळा
---------------------------------
(११) आवळ्याची चव कशी असते ?
उत्तर -- तुरट
---------------------------------
(१२)  लिंबाची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट
=======================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 6 October 2022

दोन - दोन नावे सांगा.(सामान्यज्ञान)


(१) दगडाच्या फटीत राहणारे प्राणी.
 ---- विंचू , साप.
---------------------------------
(२) बिळात राहणारे प्राणी.
---- उंदीर, घूस.
---------------------------------
(३) झाडांवर राहणारे प्राणी.
---- माकड, पोपट.
---------------------------------
(४) घरटी बांधणारे पक्षी.
---- सुगरण, चिमणी.
---------------------------------
(५)  सजीवांचे गट.
---- प्राणी , वनस्पती.
---------------------------------
(६) पातळ पदार्थ.
---- दूध, पाणी.
---------------------------------
(७) गोड पदार्थ.
---- साखर, गूळ.
---------------------------------
(८) आंबट पदार्थ.
---- चिंच, ताक.
---------------------------------
(९) खारट पदार्थ.
---- मीठ, समुद्राचे पाणी.
---------------------------------
(१०) पाण्यात चालणारी वाहने.
----- होडी, जहाज.
---------------------------------
(११) सणांची नावे.
----- होळी, दिवाळी.
---------------------------------
(१२) डाळींची नावे.
----- तूरडाळ, मगूडाळ.
---------------------------------
(१३) कंदभाज्यांची नावे.
----- मूळा, सुरण.
---------------------------------
(१४) वेलींची नावे.
----- कारल्याचा वेल, भोपळ्याचा वेल.
---------------------------------
(१५) पाय नसलेले प्राणी.
----- साप, गांडूळ.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 4 October 2022

मानवी आरोग्य -- सामान्यज्ञान


१)मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर -- खारट

(२) चवीचे प्रकार किती आहेत ?
उत्तर -- चार

(३) दर मिनिटाला मानवी हृदय किती वेळा धडधडते ?
उत्तर -- ७२ वेळा

(४) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रथी कोणती ?
उत्तर -- यकृत

(५) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
उत्तर -- कानाचे हाड

(६) प्रौढ मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
उत्तर -- २०६

(७) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
उत्तर --  मांडीचे हाड ( फिमर )

(८) मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते ?
उत्तर -- जबड्याचे

(९) मानवाच्या छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात ?
उत्तर -- २४

(१०) मानवी जिभेचा कोणता रंग त्याच्या उत्तम आरोग्याचे लक्षण दर्शवतो ?
उत्तर -- गुलाबी

(११) मानवाला आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर --  ५२

(१२) मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीरभर फिरत असते ?
उत्तर -- रक्तवाहिन्या

(१३) पाठीच्या मणक्यामध्ये किती हाडे असतात ?
उत्तर -- ३३

(१४) मानवाला एकूण किती दूध दात येतात ?
उत्तर --  २०

(१५) जन्मानंतर किती महिन्यांनी बाळाला दात येतात ?
उत्तर -- सहा
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 1 October 2022

' र ' ची करामत ( ' र ' ची साखळी ) /सामान्यज्ञान


(१ )पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर 
(२) लिहिता , वाचता येणारा-- साक्षर 
(३) लिहिता - वाचता न येणारा - निरक्षर 
(४ )बातमी आणून देणारा -- वार्ताहर 
(४) वनात राहणारे प्राणी -- वनचर 
(५) जमिनीवर राहणारे -- भूचर 
(६) धान्य साठवण्याची जागा -- कोठार 
(७) जमिनीखालून गेलेला रस्ता -- भुयार 
(८) कथा(गोष्ट ) लिहिणारा -- कथाकार 
(९) दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार 
(१०) जादूचे खेळ करून दाखवणारा -- जादूगार 
(११) नाटक लिहिणारा -- नाटककार 
(१२) चित्रे काढणारा -- चित्रकार 
(१३) खूप दानधर्म करणारा  -- दानशूर 
(१४) शत्रूला सामील झालेला  -- फितूर 
(१५) शत्रूकडील बातम्या काढणारा -- हेर 
(१६) भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर 
(१७  )एक पाळीव प्राणी -- मांजर 
(१८) पाण्यातील एक प्राणी -- मगर 
(१९) झाडावर सरसर चढणारा प्राणी -- खार 
(२०) सरपटणारा एक  प्राणी  -- अजगर 
(२१) मसाल्याचा एक पदार्थ  -- केशर 
(२२) मोराची मादी  --    लांडोर 
(२३) मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
(२४) लोखंडी वस्तू तयार करणारा -   लोहार 
(२५) सोन्या -चांदीचे दागिने बनवणारा - सोनार 
(२६) मातीची मडकी बनवणारा --  कुंभार 
(२७)आजारी लोकांना औषधे देणारा -  डाॅक्टर 
(२८) लाकडी वस्तू तयार करणारा --  सुतार  
(२९) चामड्याच्या चपला बनवणारा - चांभार 
(३०) केळ्यांचा (घड) समूह -- लोंगर 
(३१) महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर 
(३२) एक कडधान्य -- मसूर 
(३३) एक बी असणारे एक फळ --  बोर 
(३४) एक शेंग भाजी  --  गवार 
(३५) या वनस्पतीपासून कात काढतात -- खैर 
(३६) हातमागावर कापड विणणारा   -- विणकर 
(३७) एक गोड पदार्थ  -- साखर 
(३८) खा-या पाण्याचा मोठा साठा -- महासागर 
(३९) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक - मीटर 
(४०) पाण्याचा एक स्त्रोत  -- विहीर
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
 जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा. 
 केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
  ९४२२७३६७७५