माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 18 April 2023

लाल फडकी

फडकीतच जन्मून मी
झाली मोठी बघता - बघता 
तीचं महत्त्व जाणते मी
कोकणी समाजात महानता 

आजी आली, आई आली
फडकीचं पावित्र्य जपते जगता जगता
लाल रंग आवडतो मज
पांढरे ठिपक्यांचे मोल मोजता मोजता 

फडकी लाल वटवृक्ष
देई वात्सल्य सावली
आमच्या संस्कृती जीवनावर
उभी कणसरा माऊली 

रूप सुंदर फडकीचे
ती आहे ममता
भेदभाव नाही मनी तिच्या
ती आहे समता 

फडकीचं सुंदर रान
झिजते होऊन चंदन
फुले सुंगधित होऊन
झेली लाल तुफान 

सुखदुःखात आधार देते
जीवन फुलवणारी लाडकी
कितीही असू द्या ऊन - थंडी
क्षणात सारं हलकं करते फडकी

कसे फेडावे ऋण फडकीचे
कोकणी संस्कृतीत लागला लळा 
फडकीच्या उबेत शिरता 
जुळून येतो जिव्हाळा 

फडकी आजीची ... फडकी आईची
फडकी अनोखी प्रेमळ खूप 
फडकी आमची ... संस्कृती जपते
फडकी असे हे संस्कृतीरूप 

लाल लाल फडकी माझी
उमटवून गेली ठसा
फडकी आहे या जगी
ऋण काय मोलू कसा 

फडकी म्हणजे जणू
संस्कृतीची तीन अक्षरे
फडकीचे ठिपके म्हणजे
वात्सल्याची तीन पाखरे

फडकी म्हणजे जणू
कोकणी संस्कृतींचा अथांग सागर
फडकी माय म्हणजे
सर्व सुखाचे आगर

फडकी म्हणजे जणू
आदिम संस्कृतीची माऊली
फडकी माय म्हणजे
कृपेची सावली

कवी / लेखक :- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
=====================
मार्गदर्शक :- श्री. महारू सिताराम चौरे ( मा. शिक्षक)

No comments:

Post a Comment