माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Monday 12 June 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली (भौगोलिक)


(१) नारळाच्या झाडाला काय म्हणतात ?
उत्तर -- माड

(२) महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा

(३) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू

(४) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल 

(५) महाराष्ट्रातील कोणता पक्षी दुर्मिळ होत चालला आहे ?
उत्तर -- माळढोक

(६) कृष्णा नदी कोठून उगम पावते ?
उत्तर -- महाबळेश्वर

(७) महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिमवाहिनी नदी कोणती ?
उत्तर -- तापी 

(८) नर्मदा नदीची वाहण्याची दिशा कोणती ?
उत्तर -- पूर्वेकडून पश्चिमेकडे 

(९) महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र 

(१०) अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ?
उत्तर -- रायगड 

(११) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ

(१२) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर 
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  /  ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment