माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 3 June 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) भारताचे कोणते राज्य सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे आहे ?
उत्तर -- राजस्थान 

(२) ' अग्निपंख ' हे कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ?
उत्तर -- ए. पी. जे.अब्दुल कलाम 

(३) 'हिराकुंड ' धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
उत्तर ‌-- महानदी

(४)  क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणते ?
उत्तर -- गोवा 

(५) महाराष्ट्रात कोणता दिवस  'वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर -- १५ ऑक्टोबर 

(६) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव काय आहे ?
उत्तर -- शिवनेरी 

(७) ' पानिपत ' हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- हरियाणा 

(८) ' दक्षिणेची गंगा ' म्हणून कोणत्या नदीस ओळखतात ?
उत्तर -- गोदावरी 

(९) ' अजिंठा आणि वेरुळ लेण्या ' कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद 

(१०)  येरवडा कारागृह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे 

(११) मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
उत्तर -- २७ फेब्रुवारी 

(१२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोयना धरण आहे ?
उत्तर -- सातारा 

(१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दिक्षा कोठे घेतली ?
उत्तर -- नागपूर 

(१४) एलिफंटा लेणी कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर -- महाराष्ट्र 
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment