माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 1 July 2023

जाणून घेऊया वैशिष्ट्यपूर्ण माहिती ( सोने, सूर्यफूल, कमळ, फणस, मधमाशी)


(१) सोने 

सोने हा मऊ, चमकदार व मौल्यवान धातू आहे.  सोनं कधीच गंजत नाही व वातावरणातील रसायनांचा त्यावर परिणाम होत नाही. म्हणून त्याचे दागिणे तयार केले जातात. सोने हे उत्तम विद्यूतवाहक आहे. अंतराळात सोन्याचा पातळ थर दिलेली उपकरणे वापरतात.
---------------------------------

(२) सूर्यफूल 

सूर्यफुल हे पिवळ्या व केशरी रंगाचे असते. त्याची फुले सूर्याच्या उगवत्या म्हणजेच पूर्वेला कललेली असतात. हे फुल आकाराने सूर्यासारखे दिसते. त्यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. या बिया पक्षांना खूप आवडतात. या बियांपासून तेल काढतात. 
---------------------------------

(३) कमळ

कमळाचे फूल हे दिसायला सुंदर व आकर्षक आहे. कमळ ह्या फुलाला आपल्या राष्ट्रीय फुलाचा मान देण्यात आला आहे. कमळाच्या दांड्या ह्या पोकळ असतात. त्यामध्ये हवा असल्याने त्या पाण्यावर अलगद तरंगतात. कमळाची पाने मोठमोठी असतात. त्या पानावर तेलकट आवरण असल्याने ती पाण्यात राहून देखील सडत नाही.
---------------------------------

(४) फणस 

फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाला बाहेरून काट्यासारखी अनेक टोके असतात. फणसाच्या आत गरे असतात. एका गऱ्यामध्ये एक बी असते. फणसाची भाजीसुद्धा करतात. फणस पिकल्यावर त्याचे गरे मधूर व गोड लागतात.
---------------------------------

(५) मधमाशी 

मधमाशी हा एक कीटक आहे. मधमाश्या बाराही महिने मेणाचे पोळे बनवतात. त्यात फुलांमधून शोषलेला रस मधाच्या स्वरूपात साठवून ठेवतात, हा मध म्हणजे मधमाशांचा अन्नसाठा होय. हा एकमेव कीटक आहे ज्याने साठविलेले अन्न मानव खातो. राणी माशी, कामकरी माशी व सैनिक माशी असे मधमाशीचे प्रकार आहेत. मध आरोग्यास उपयूक्त आहे.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा ( रोहोड)
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment