माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 27 June 2024

बुद्धिमत्ता ( स्पर्धा परीक्षा प्रश्नावली )


(1) एका रांगेत शंकर हा डावीकडून 6 वा आणि उजवीकडून 7 वा असल्यास त्या रांगेत एकूण लोक किती ‌?

उत्तर --- 12

---- स्पष्टीकरण --
      एकूण लोक = (6 + 7 ) - 1
                       ‌= 13 - 1 = 12
====================

(2) परवा पाऊस पडला होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडला होता ?

उत्तर --- बुधवार 

---- स्पष्टीकरण --
----- परवा -- बुधवार 
-----  काल -- गुरूवार 
----- आज -- शुक्रवार 
----- उद्या -- शनिवार 
=========================

(3) एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतराशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदा होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?

उत्तर --- 66

---- पार्टीत आलेले लोक × त्यामागील संख्या .
------ भागीले  2

--------- = 12  × 11 
         भागीले - 2
---------- = 66
=========================

(4) भिंतीवरील एका 12 तासी घड्याळामध्ये तास काटा व मिनीट काटा दोन्ही काटे एकमेकांवर येण्याची स्थिती किती वेळा घडते ?

उत्तर --- 11 

--- स्पष्टीकरण ---
✓ 12 तासात तास काटा व मिनिट काटा एकमेकांवर येण्याची स्थिती = 11 वेळा
✓ तसेच 180° (सरळ रेषेत) येण्याची स्थिती = 11 वेळा.
✓ 90° म्हणजेच काटकोनात येण्याची स्थिती = 22 वेळा
 ---- = 11 
==========================

(5) ‌5, रु.  10 व रु.  20 रू . या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास रु. 735 होतील?

उत्तर --- 21

स्पष्टीकरण -- 
✓ नाटांची संख्या =  एकूण रूपये ÷ प्रत्येक एका नोटेची बेरीज.
✓ 735 ÷  5 + 10 + 20
✓ = 735 ÷ 35
---- = 21
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
9422736775  / 7721941496

No comments:

Post a Comment